1day Trekking places pune
Posted in: जीवनशैली (Lifestyle)

पुणे शहराच्या सीमेजवळ निसर्गाच्या पाऊलखुणा: दिघी टेकडी, बाणेर टेकडी आणि दुर्गा टेकडी, 3 छोटे पिकनिक ट्रेकिंग पॉइंटस (Nature’s Footsteps near Pune city: Dighi and Baner Hill | one day picnic trekking points Near Pune)

नमस्कार निसर्ग प्रेमी मित्रानो! पावसाळा जवळ येत आहे. ट्रेकिंग प्लॅन्स चे वेध लागत आहेत. उन्हाळ्यातील उकाड्याने खूप हैराण केले आहे. आपण सगळेच पावसाळ्याची नेहमी आतुरतेने वाट पाहत असतो. कारण पावसाळ्यानंतर सगळ्या डोंगरदऱ्या हिरव्यागार होतात. वातावरण सुसह्य होते. पावसाळ्यानंतरचा काळ आपल्यासारख्या फिरस्ती प्रेमी, ट्रेकिंग साठी उत्साही, निसर्ग आणि पर्यावरण प्रेमी आणि डोंगरदऱ्या नेहमी जवळ करणाऱ्यांसाठी पर्वणीच असते.

आज आपण असेच काही पुणे शहराच्या सीमेजवळ असणारे ट्रेकिंग पॉइंट किंवा पिकनिक स्पॉट यांची माहिती घेणार आहोत. ते म्हणजे दिघी टेकडी, दुर्गा आणि बाणेर टेकडी. दोन टेकड्या खूपच जवळ आहेत आणि निसर्गसौंदर्याने नटलेल्या आहेत. एक दिवसाची डोंगरदऱ्या मधील पिकनिक करण्यासाठी अगदी योग्य आहेत. छोट्या मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना सोयीस्कर अशी ही ठिकाणे आहेत.

या तीन ठिकाणांची खास गोष्ट म्हणजे हे ट्रेकिंग किंवा पिकनिक स्पॉट पुणे आणि पिंपरी-चिंचवड या शहरांच्यआ अगदी जवळ आहेत. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या टेकड्या आहेत. या ठिकाणाची सहल करण्यासाठी जास्त वेळ जाणार नाही. अर्ध्या दिवसात किंवा काही तासात या टेकड्यांवर फिरून येऊ शकतो.

दिघी टेकडी ट्रेक पॉइंट (Dighi Hills trecking point)

दिघी टेकडी ही आळंदी जवळ दिघी भागात स्थित सह्याद्री पर्वतरांगेत वसलेली एक टेकडी आहे. डोंगरदऱ्या चढणे ट्रेकिंग ज्यांना आवडते अशा अनेक उत्साही लोकांचए आवडते आणि जवळचे ठिकाण छोटे ट्रेकिंग ठिकाण म्हणजे दिघी टेकडी.

दिघी टेकडी पुण्यापासून 21 किलोमीटर वर आळंदी जवळ आहे. टेकडीवर चढण्यासाठी सर्व बाजूंनी अनेक रस्ते आहेत. अनेक जवळ राहणाऱ्या लोकांचे जॉगिंग चे ठिकाण आहे. टेकडीवरून सूर्योदय आणि सूर्यास्त अतिशय सुंदर पाहायला मिळतो. त्यामुळे पहाटे आणि संध्याकाळची वेळ भेट देण्यासाठी योग्य आहे.

या टेकडीवरून तुम्ही जवळपासच्या गावांचा पनोरामिक (Panaramic) दृश्य, हिरवीगार शेतं आणि नयनरम्य दिघी तलावाचे चित्तथरारक विहंगम दृश्य पाहू शकता. सूर्यास्त आणि सूर्योदय या फोटोग्राफी करणाऱ्यासाठी उत्तम वेळा आहेत.

या पूर्ण पुण्याजवळील छोट्या ट्रेक पॉइंट साठी 2 ते 3 तासांचा वेळ लागेल. डोंगर चढणे थोडेसे काही ठिकाणी अवघड आहे. बाकी ठिकाणी रस्ता आहे. वरती विठ्ठलाचे सुंदर मंदिर आहे.

बाणेर टेकडी ट्रेक पॉइंट (Baner hill trecking point)

बाणेर टेकडी पश्चिम घाटाचा एक भाग आहे. ही टेकडी बाणेर-पाषाण जैव विविधता उद्यान (Baner-Pashan Biodiversity Park) म्हणूनही ओळखली जाते. आणि ही बाणेर टेकडी जगातील आठ जैव विविधता केंद्रांपैकी Biodiversity Hotspots) एक आहे. ही खरच पुणेकरांसाठी आणि महाराष्ट्रातील लोकांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. अजून एक म्हणजे बाणेर टेकडी ही UNESCO जागतिक वारसा (UNESCO World Heritage sites) स्थळांमध्ये येते.

या टेकडीवर वसुंधरा फाउंडेशन नावाची पर्यावरण NGO 2006 पासून कार्यरत आहे. बाणेर टेकडीवरील वृक्षारोपण आणि संवर्धन, मृदा संवर्धन आणि पावसाचे पाणी साठवण उपक्रम राबवणे आणि शहरी पर्यावरणास मदत करणे यामधे वसुंधरा फाउंडेशन चा सिंहाचा वाटा आहे. बाणेर टेकडीची सुंदरता खरे तर या NGO मुळे टिकून आहे. बरेच बालकांपासून वृद्धांपर्यंत स्वयंसेवक वृक्ष लागवड आणि संवर्धन मध्ये भाव घेतात. आपणही तेथे जाऊन या उपक्रमामध्ये सहभागी होऊ शकतो.

बाणेर टेकडी वरून पुणे शहराचे विहंगम दृश्य दिसते. बऱ्याच लोकांचा हा योग, व्यायाम, जॉगिंग करण्याचा आवडता पॉइंट आहे. बरेच नेचर फोटोग्राफर येथे येऊन फोटोग्राफी करतात. पक्षिनिरीक्षक सुद्धा येतात. छोट्या अर्ध्या दिवसाच्या ट्रेकिंग साठी बाणेर टेकडी हे योग्य ठिकाण आहे. वसुंधरा फाउंडेशनच्या उपक्रमात तिथे जाऊन सहभागी होऊन पर्यावरणाला हातभार लावता येईल.

येथे बऱ्याच प्रकारची जैवविविधता आढळते. अनेक पक्षी आणि प्राणी यांचे सौंदर्य पाहायला मिळते.

भेट देण्यासाठी योग्य वेळ: पहाटे किंवा संध्याकाळी कधीही भेट देऊ शकता. पावसाळा आणि हिवाळा भेट देण्यासाठी एकदम चांगले ऋतू आहेत.

दुर्गा टेकडी उद्यान, निगडी (Durga Tekdi park, Nigdi)

निगडी मध्ये अप्पू घर जवळ दुर्गा टेकडी हे जैवविविधतेची छान दक्षता घेतलेले एक उद्यान आहे.टेकडीच्या माथ्यावर दुर्गादेवीचे सुंदर मंदिर आहे. त्यामुळे दुर्गा टेकडी असे नाव आहे. हे एक राखलेले उद्यान आहे. या उद्यानाची सर्व देखभाल पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन पाहते.

दुर्गा टेकडीवर जॉगिंग ट्रॅक पण आहे. पहाटे हे उद्यान जॉगिंग आणि व्यायाम करणाऱ्या व्यक्तींसाठी खुले असते. जवळ राहणारे लोक दुर्गा टेकडी वरील निसर्गरम्य वातावरणात व्यायाम, योग करण्याचा आनंद घेतात.

दुर्गा देवीचे मंदिर देवी भक्तांचे प्रमुख आकर्षण असते. मंदिरामुळे हा परिसर अगदी पवित्र वरदान लाभलेला वाटतो. नवरात्रीला या मंदिरात उत्सव असतो. निसर्ग, मंदिर, व्यायामासाठी उत्तम ठिकाण या गोष्टीमुळे दुर्गा टेकडी हे प्रमुख आकर्षण असते.

वरती बसण्याची व्यवस्था आहे. हिरवळ असणारे झाडे आहेत. एक छोटे तळे आहे त्यामुळे बरेच पक्षी येथे असतात. स्वच्छ हवा, निसर्ग आणि निसर्गरम्य दृश्य मनाला प्रसन्न करतात. शहराच्या गजबजाटा पासून दूर जाऊन स्वच्छ मोकळ्या हवेत श्वास घ्यायचा असेल तर दुर्गा टेकडी हे सर्वात जवळ असलेले एक उत्कृष्ट ठिकाण आहे.

दुर्गा टेकडी हे उद्यान पहाटे 5 ते मॉर्निंग वॉक आणि व्यायाम साठी जवळ राहणाऱ्या लोकांसाठी खुले असते. नंतर पर्यटकांसाठी 11 ते 6 ही खुले ठेवण्यात येते. पायथ्याला खाद्य पदार्थ यांची दुकाने आहेत. नाममात्र तिकीट आहे. कुटुंबासोबत किंवा जोडीदारासोबत भेट देण्यासाठी अगदी योग्य उद्यान आहे.

अजून एका अशाच पुण्याजवळील उत्कृष्ट ट्रेकिंग आणि पिकनिक पॉइंट हवा असेल तर हे वाचाअगदी जवळ पुण्यातील पर्यटन स्थळ | एक दिवस सहल – घोरवडेश्र्वर मंदिर डोंगर आणि घोरवडेश्र्वर लेणी

Comments (3) on "पुणे शहराच्या सीमेजवळ निसर्गाच्या पाऊलखुणा: दिघी टेकडी, बाणेर टेकडी आणि दुर्गा टेकडी, 3 छोटे पिकनिक ट्रेकिंग पॉइंटस (Nature’s Footsteps near Pune city: Dighi and Baner Hill | one day picnic trekking points Near Pune)"

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to Top