भारतातील अद्भुत मंदिरे आणि त्यांची रोचक तत्थे (10 Amazing Temples in India and their interesting facts)
Posted in: जीवनशैली (Lifestyle), पर्यटन

भारतातील अद्भुत मंदिरे आणि त्यांची रोचक तत्थे (10 Amazing Temples in India and their interesting facts)

भारतातील १० अद्भुत मंदिरे आणि त्यांची रोचक तत्थे (Amazing Temples in India and their interesting facts)

आपला भारत देश येथील रूढी परंपरा यांमुळे संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे.आज आपल्या भारत देशातील मंदिरे ही सर्व जगभरात प्रसिद्ध असल्याचे आपणास दिसून येते.

प्राचीन काळामध्ये जेव्हा एखाद्या मंदिराची निर्मिती केली जात असे तेव्हा सर्वप्रथम वास्तुशास्त्र अणि खगोलीय विज्ञान या दोघांचे अध्ययन करण्यात यायचे.मगच कुठल्याही मंदिराच्या निर्मितीचे कार्य हाती घेतले जायचे.

पुर्वीच्या काळात सर्व राजे महाराजे आपला खजिना भुगर्भात लपवुन ठेवायचे अणि मग त्यावर मंदिर बांधायचे.अणि आपल्या लपवलेल्या खजिन्यातपर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळे मार्ग बनवुन ठेवत होते. पण आपल्या भारत देशात काही अशीही मंदिरे अस्तित्वात आहेत ज्यांचा खजिना,वास्तू खगोलीय विज्ञान यांच्यासोबत संबंध तर आहेच.याचसोबत ह्या मंदिरांमध्ये अनेक गुप्त रहस्य दडलेली आहेत.

ह्या मंदिरांमध्ये असे अनेक रहस्यमयी घटना तसेच प्रसंग घडुन येताना दिसतात ज्यांचा अर्थ लावणे आजही अशक्य आहे.

आजच्या लेखात आपण भारतातील अशाच काही १० अद्भुत रहस्यमयी मंदिरांविषयी अणि त्यांच्या रोचक तथ्यां विषयी माहिती जाणून घेणार आहोत. अशीच नवनवीन रोचक माहिती वाचण्यासाठी डोंगरदऱ्या.com या वेबसाइट ल भेट देत रहा

भारतातील अद्भुत रहस्यमयी मंदिरे कोणकोणती आहेत?

१) कन्याकुमारी मंदिर

कन्याकुमारी हे मंदिर आपल्या भारत देशातील सर्वात रहस्यमय मंदिर म्हणून ओळखले जाते. हे पर्यटन स्थळ धार्मिक आणि अध्यात्मिक रित्या महत्वाचे आहे.

.Kanyakumari-amman-mandir

कन्याकुमारी देवीचे मंदिर हे समुद्राच्या किनारी आहे.हया मंदिरात देवी पार्वती ह्यांच्या कन्या रूपाचे पुजन करण्यात येते.

इथे एक प्रथा आहे की कन्याकुमारी मंदिरात प्रवेश करण्यासाठी सर्व पुरूष वर्गाला आपल्या कमरेच्या वरील वस्त्र काढावे लागते.मगच त्यांना मंदिराच्या आत दर्शनासाठी प्रवेश दिला जातो.

कन्याकुमारी मंदिराच्या समुद्र किनारी बारीक दगड आपणास आढळुन येतात हे दगड तांदळाप्रमाणे बारीक आहेत.

असे म्हटले जाते की देवी पार्वतीचा विवाह संपन्न न झाल्याने राहीलेले तांदूळ बारीक दगड बनुन गेले हेच बारीक दगड कन्या कुमारी येथील समुद्र किनारी आज आढळून येतात.

कन्याकुमारी पर्यटन स्थळाचे प्रमूख आकर्षण म्हणजे कन्याकुमारी येथे बेटावर कन्याकुमारी देवीचे श्री पद (Shri Patham of Goddess Kanyakumari)मंदिर आणि स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियल (Swami Vivekananda rock memorial) आहे. इथेच स्वामी विवेकानंद ध्यान केंद्र पण आहे.

त्याच्याच बाजूला एका मोठ्या दगडावर प्रसिद्ध तमिळ कवि तिरूवल्लूर यांचे भव्य शिल्प आहे.

swami Vivekananda rock memorial and Thiruvallur statue swami Vivekananda rock memorial and Shri patham of Kanyakumari mandir swami Vivekananda rock memorial and Thiruvallur statue

२) सोमनाथ मंदिर –

सोमनाथ हे मंदिर गुजरात राज्यातील वेरावळ बंदराच्या जवळ आहे.सोमनाथ मंदिराला एक हिंदु धर्मियांचे महत्वाचे तीर्थस्थळ तसेच पर्यटन स्थळ म्हणून देखील ओळखले जाते.

सोमनाथ मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी पहिले ज्योर्तीलिंग आहे म्हणून सोमनाथ मंदिराचे धार्मिक आणि अध्यात्मिक महत्त्व खूप आहे. हे प्रसिद्ध आणि प्राचीन मंदिर आहे.

सोमनाथ मंदिराला एक रहस्यमयी मंदिर म्हणून ओळखले जाते ह्या मंदिराला आतापर्यंत परकीय आक्रमणादवारे अनेकदा तोडुन उद्ध्वस्त केले गेले तरी देखील हे मंदिर पुन्हा नव्याने निर्माण करून उभारण्यात आले आहे.

सोमनाथ मंदिर हे शंकराचे भारतातील एक महत्वाचे हिंदु मंदिर मानले जाते.दरवर्षी लाखो भाविक ह्या मंदिरात भगवान सोमनाथ ह्यांच्या दर्शनासाठी येतात. सोमनाथ मंदिराच्या वेबसाईट वर live दर्शन करू शकतो

३) शनि शिंगणापूर मंदिर

भगवान शनि देव ह्यांना सुर्यपुत्र म्हणून ओळखले जाते.

shani shingnapur mandir

तसे पाहायला गेले तर शनि देवाची अनेक मंदिरे आपणास भारतातील विविध राज्यांत आढळुन येतात.

पण महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यात स्थित असलेले शनि शिंगणापूर मंदिर हे शनि देवाचे एक अत्यंत प्रमुख मंदिर आहे.हे मंदिर महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात तसेच जगभरात अत्यंत प्रसिद्ध आहे.

शनी शिंगणापूर येथील ह्या शनिदेवाच्या मंदिराचे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे.

ह्या मंदिरात शनिदेवाची एक पाषाण मूर्ती ठेवलेली आहे.ही मुर्ती कुठल्याही छत्र तसेच घुमटाशिवाय खुल्या आकाशाच्या खाली एका संगमरावर विराजमान झालेली आपणास दिसून येते.

शिंगणापूर ह्या शहरामधील घरांना दरवाजे तसेच खिडक्या देखील बसवण्यात आलेल्या नाहीये.घरांच्या प्रवेशद्वारावर काही पडदे लावलेले आपणास दिसून येतात.इथे चोरी देखील होत नाही.

कारण असे म्हटले जाते की ह्या शहरातील घरांमध्ये जो व्यक्ती चोरी करतो त्याला स्वता शनिदेव शिक्षा करतात म्हणून येथील घरे उघडी असुनही येथे कधीही चोरी होत नाही.

शनिच्या क्रोधापासुन साडेसातीपासुन आपला बचाव करण्यासाठी दरवर्षी लाखोंच्या संख्येत भाविक इथे शनि महाराजांच्या दर्शनासाठी येतात.

४) भगवान महाकालेश्वर मंदिर

भगवान कालभैरव ह्यांचे मंदिर भारतातील मध्य प्रदेश राज्यातील उज्जैन येथे स्थित आहे.हे मंदिर उज्जैन शहरापासून आठ ते नऊ किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.

Shri-Mahakaleshwar-mandir-Ujjain. Shri-Mahakaleshwar-mandir-Ujjain.

असे म्हटले जाते की ह्या मंदिरात परंपरेनुसार मद्य अपर्ण करण्यात येते.आश्चचर्याची बाब म्हणजे भगवान कालभैरव ह्यांच्या मुर्तीच्या तोंडाला दारूचा ग्लास लावल्यास तो दारूचा ग्लास काही क्षणांतच गायब देखील होतो.

हे कसे घडुन येते यामागचे मुळ रहस्य काय आहे ह्या रहस्यायाबाबद अद्याप कुठलाही विशेष खुलासा करण्यात आलेला नाहीये.

श्री महाकालेश्वर यांच्या ऑफिशियल वेबसाइट वर लाईव्ह दर्शन करू शकता

५) करणी माता मंदिर –

करणी मातेचे मंदिर हे भारतातील सर्वांत रहस्यमयी मंदिरांपैकी एक मानले जाते.

Karni Mata Mandir

हे मंदिर राजस्थान राज्यातील बिकानेर येथील देशनोक येथे हे मंदिर आहे. हया मंदिरात जवळपास अडीच हजार उंदीर आहेत.त्यामुळे हे मंदीर उंदीरांचे मंदीर म्हणून प्रचलित आहे.

ज्यात काळया रंगाच्या अणि सफेद रंगाच्या उंदीरांचा देखील समावेश होतो

करणी मातेच्या मंदिरात काळे उंदीर फार अधिक प्रमाणात आढळून येतात.अशी मान्यता आहे की ज्या भाविकांना सफेद उंदीर दिसतो त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात

ह्या मंदिरात सफेद उंदीर हे फारच तुरळक प्रमाणात आपणास दिसून येतात.हया मंदिरात इतके उंदीर आहे की चालताना भक्तांच्या पायाखाली एखादा उंदीर येईल ह्या भीतीने भक्तांना व्यवस्थित चालता देखील येत नाही.

पण ह्या मंदिरामधील उंदीरांविषयी असे देखील म्हटले जाते की हे उंदीर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या कुठल्याही भक्ताला कुठलीही इजा पोहोचवत नाही.

६) ज्वालामुखी मंदीर –

ज्वालामुखी हे मंदिर हिमाचल प्रदेशातील कांग्रा जिल्ह्यात स्थित आहे.

असे म्हटले जाते की ह्या ठिकाणी सती मातेची जिभ पडली होती ह्या मंदिरात निघणारी ज्योत ह्याचेच प्रतीक म्हणून ओळखली जाते.

ही ज्योत एकुण ९ रंगाची असल्याचे सांगितले जाते.हया मंदिरातील निघत असलेल्या ज्वाला कुठून उगवतात अणि ह्यांच्या रंगांमध्ये बदल कसा घडुन येतो हे रहस्य अद्याप कोणालाही आजपर्यंत समजलेले नाहीये.

७) मेहंदीपुर बालाजी मंदिर –

मेहंदीपुर बालाजी हे मंदिर भारत देशातील राजस्थान राज्यातील दवसा ह्या जिल्ह्यात आहे.

हे मंदिर हनुमानाच्या दहा महत्वाच्या सिदध पिठांमध्ये देखील समाविष्ट होते.हया मंदिराबाबद अशी मान्यता आहे की हनुमान ह्या मंदिरात स्वता जागृत अवस्थेत विराजमान आहेत.

ज्या व्यक्तींना भुतबाधा झाली आहे अशा व्यक्तींचा ह्या मंदिरात भुत पिशाच्चाच्या बाधा,वाईट प्रेत आत्मयांचा त्रास इत्यादी दूर केला जातो.

ह्या मंदिरात कुठल्याही भाविकाला रात्रभर मुक्कामी थांबु दिले जात नाही तसेच मंदिरात घेतलेला प्रसाद भाविकांना मंदिरातच खावा लागतो तो कुठल्याही भाविकाला घरी देखील घेऊन जाता येत नाही.

८) कामाख्या देवीचे मंदिर –

आसामची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुवाहाटी नजीक हे कामाख्या देवीचे मंदिर आहे.

हे कामाख्या देवीचे मंदिर महाभगवती देवीच्या ५१ शक्ती पिकांपैकी एक मानले जाते.पण आश्चर्यकारक बाब म्हणजे ह्या प्राचीन काळापासून सुरू असलेल्या मंदिरामध्ये भगवती देवीची एक सुद्धा मुर्ती आढळुन येत नाही.

ह्या कामाख्या देवी मंदिरात सती मातेच्या अंगाचे पुजन करण्यात येते.हया मंदिरात दर्शनासाठी आलेल्या सर्व भाविकांच्या मनोकामना पूर्ण होतात.म्हणुन ह्या मंदिरांचे नाव कामाख्या असे ठेवण्यात आले आहे.

कामाख्या देवीच्या ह्या मंदिराचे विभाजन एकुण तीन भागात केले गेले आहे.

कामाख्या मंदिरा विषयी आणखी एक आश्चर्याची बाब म्हणजे ह्या मंदिरात दगडातुन पाणी वाहते.

कधी कधी तर ह्या दगडातुन रक्ताच्या धारा देखील वाहताना दिसुन येतात.हे कसे काय घडते यामागचे मुख्य रहस्य नेमकी काय आहे हे अद्याप कोणालाही कळलेले नाहीये.

९) तिरूपती बालाजी मंदिर –

भारत देशातील आंध्र प्रदेश राज्यात स्थित असलेले तिरूपती बालाजी मंदिर हे तिरूपती व्यंकटेश्वर मंदीर म्हणून देखील प्रचलित आहे.

हे मंदिर भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक मानले जाते.भगवान विष्णु ह्यांना समर्पित करण्यात आलेले हे मंदिर भारतातील एक चमत्कारिक अणि रहस्यमयी मंदिर म्हणून ओळखले जाते.

तिरूपती बालाजी मंदिरात ठेवलेला दिवा हा यात तेल किंवा तूप टाकले नाही तरी देखील नेहमी जळत राहतो.हे कस काय घडते यामागच्या रहस्याचा अद्याप कुठलाही उलगडा झालेला नाहीये.

१०) पद्मनाभस्वामी मंदीर –

केरळ राज्यातील तिरूअनंतपुरम येथे स्थित असलेले पद्मनाभ स्वामी मंदिर हे देखील भारतातील एक रहस्यमयी मंदिर म्हणून ओळखले जाते.

पद्मनाभ स्वामी मंदिरचा देखील भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांमध्ये समावेश होतो.

पद्मनाभ स्वामी मंदिरातील गुप्त जागेवर धन गाडण्यात आले असल्याचे सांगितले जाते.आजपर्यत हया मंदिराच्या सहा गुप्त दरवाजांमधुन करोडोंचे धन प्राप्त झाले आहे.

इथे अजुन एक सातवा दरवाजा देखील आहे पण हा दरवाजा एक शापित दरवाजा असल्याने कधीही उघडला जात नाही असे म्हटले जाते की जो व्यक्ती हा दरवाजा उघडतो त्याचा मृत्यू निश्चित आहे.

भारतातील मंदिरे रहस्यमय भरण्यामागचे कारणे म्हणजे अध्यात्मिक ज्ञान जतन करणे अध्यात्मिक वाढीस प्रोत्साहन देणे भक्त आणि परमात्मा यांच्यातील संबंध अधिक दृढ करणे ही असतात. वास्तुकला शिल्पकला अध्यात्म आणि विज्ञान या सगळ्या गोष्टींचा वेळ साधण्यासाठी कदाचित ही मंदिरे एवढी रहस्यमय आणि गुढ बनवली असावीत.

हे ही वाचा

अगदी जवळ पुण्यातील पर्यटन स्थळ | एक दिवस सहल – घोरवडेश्र्वर मंदिर, डोंगरदऱ्या आणि घोरवडेश्र्वर लेणी

पुणे शहराच्या सीमेजवळ निसर्गाच्या पाऊलखुणा: दिघी टेकडी, बाणेर टेकडी आणि दुर्गा टेकडी, 3 छोटे पिकनिक ट्रेकिंग पॉइंटस

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to Top