Trekking guide for rainy season
डोंगरदऱ्यात फिरण्यासाठी सतत अतुर असणाऱ्या ट्रेकिंग प्रेमी मित्रांनो आपला आवडता ऋतू पावसाळा आला आहे. आणि ट्रेकिंग स्पॉट्स, डोंगरदऱ्या, घाटमाथा, धबधबे यांवरची गर्दी वाढत आहे. पावसाळ्यात सर्व तरुणाई गडकिल्ल्यांची आणि वॉटरफॉल्स ची सैर करायला आतुर असते. तुम्हीही असालच.
अद्भुत निसर्गसौंदर्याने नटलेल्या जागांवर जाऊन आपल्या डोळ्यांची पारणे फेडणारा अनुभव घ्यायला कोणाला नाही आवडणार? आणि अंगातील सळसळणारे रक्त साहस केल्याशिवाय स्वस्थ कसे बसू देईल. आणि असे निसर्गसौंदर्य पाहण्याची आणि साहस करण्याची आवड असणाऱ्यांनी तर बिलकुल स्वस्थ बसू नये. पावसाळ्यात डोंगरदऱ्या मध्ये फिरण्याची मजा काही औरच आहे.
आणि ट्रेकिंग या इंग्रजी शब्दाचा मराठी अर्थ हाच आहे की निसर्गातील किंवा धर्तीवरील दुर्गम भागांचा प्रवास करणे. तर हाच ट्रेकिंग किंवा ॲडव्हेंचर चा अनुभव अविस्मरणीय होण्यासाठी आणि काही अडचण येऊ नये यासाठीच हा ब्लॉग आहे. या टीप्स तुम्हाला तुमचा ट्रेक प्लॅन करायला नक्की मदत करील.
चला तर पाहूया काय टिप्स आहेत नवीन ट्रेकर्ससाठी ट्रिप प्लॅन करताना.
Table of Contents
- ट्रेकिंग साठी चांगले पर्यटन स्थळ निवडा (Choose a good destination for trekking)
- ट्रेकिंग स्पॉटच्या हवामानाचा अंदाज घ्या (Get info of the weather of the trekking spot)
- पावसासाठी तयार रहा (Be prepared for rain while planning for trekking)
- ट्रेकिंग स्पॉट संभावित धोक्यांची जाणीव ठेवा (Be aware of the risks of the trekking spot)
- आपल्या आहाराची काळजी घ्या (Take care of your diet and meals while trekking)
- ट्रेकिंगला जाताय याची कुटुंबियाना कल्पना द्या (Inform your family about trekking plan)
- पावसाळ्यात ट्रेकिंगला जाताना आणखी काय काय काळजी घ्याल ? (What else should you take care of while trekking in monsoon?)
- हे ही वाचा
ट्रेकिंग साठी चांगले पर्यटन स्थळ निवडा (Choose a good destination for trekking)
सर्वच पर्यटन स्थळे पावसात जाण्यासारखी नसतात. तुम्ही नवीन ट्रेकर असाल तर खूप साहसी ट्रेकिंग स्पॉट निवडू नका. सुरुवातील कमी अवघड किंवा कमी साहस असलेले लोकेशन्स वर ट्रेक करा. ज्यामुळे जास्त अडचणी येणार नाहीत.
ट्रेकिंग स्पॉटच्या हवामानाचा अंदाज घ्या (Get info of the weather of the trekking spot)
तुम्ही ज्या ठिकाणी जात आहात तिथे कसे वातावरण आहे याची माहिती घ्या. पाऊस तर असणारच. पण खूप मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने सांगितली असेल तर त्या ठिकाणी जाणे शक्यतो टाळावे. अडकून पडावे लागू शकते.
अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही जात आहात त्या पर्यटन स्थळी दरड कोसळण्याची शक्यता असेल तर असे धोके नसलेली जागा निवडा.
पावसासाठी तयार रहा (Be prepared for rain while planning for trekking)
ट्रेकिंग स्पॉट वर जाऊन भिजण्याची मजा काही औरच आहे. एक दिवसाचा ट्रेक असेल तर भिजणे योग्य आहे. आपण घरी येऊन परत आराम करून शकतो. पण जर तुमच्या शरीराला भिजण्याची सवय नसेल तर सोबत पावसापासून बचाव करण्यासाठी काही गोष्टी सोबत ठेवल्या पाहिजेत जसे रेनकोट, पोंचो किंवा छत्री आणि वॉटर प्रूफ शूज. आणि आपण किती वेळासाठी जातोय हे नियोजन करून सोबत वॉटर प्रूफ बॅग मध्ये एक्स्ट्रा कपडे पण ठेवावेत. जेणेकरून पावसामुळे त्रास कमी होईल.
पण ट्रेक्कर ने थोड्या प्रतिकूल वातावरण साथी नेहमी तयार असले पाहिजे. सगळी सोय जिथे असेल तो कसला ट्रेक.
पाऊस तर असणार याची कल्पना आहे. पण आपण सोबत कॅमेरा, स्मार्टफोन, पॉवर बँक इत्यादि ईलेक्ट्रॉनिक उपकरणे सोबत नेतो ते पाण्यात भिजून खराब होणार नाहीत यामुळे त्यासाठी वॉटरप्रूफ बॅग मिळतात त्या वापराव्या. आपल्या उपकरणांची योग्य ती काळजी घ्यावी नाहीतर ट्रेकिंग महागात पडू शकते.
ट्रेकिंग स्पॉट संभावित धोक्यांची जाणीव ठेवा (Be aware of the risks of the trekking spot)
इतर ऋतूतील ट्रेकिंगपेक्षा पावसाळी ट्रेकिंग जास्त धोकादायक ठरू शकते. भूस्खलन, अचानक पूर आणि निसरड्या पायवाटांच्या जोखमींबद्दल जागरूक रहा. तुम्ही ज्या ठिकाणी ट्रेकिंगला जात आहात त्या ठिकाणी अलीकडे दरड कोसळणे किंवा पुर अशी काही घटना घडली आहे का याची माहिती ठेवा.
याबरोबर जाण्यासाठी रास्ते, तिथे खाण्याची सोय आहे की नाही किंवा खाण्यासाठी खाद्यपदार्थ आणि पिण्यासाथी पानी सोबत ठेवावे लागेल का याचीही माहिती घेऊन तयारी करावी.
आपल्या आहाराची काळजी घ्या (Take care of your diet and meals while trekking)
आपण ट्रेकिंगला जातो तेव्हा खूप शारीरिक क्रिया होतात. म्हणजे चालणे, डोंगर चढणे-उतरणे, जंगलाची सफर इत्यादि. या आपल्या दैनंदिन जीवनात रोज होणाऱ्या शारीरिक हालचाली पेक्षा नक्कीच जास्त असतात. त्यामुळे आपल्या शरीराला ट्रेकिंग मध्ये होणारी झीज भरून काढण्यासाठी जास्त आहार आणि पोषण लागते . आणि पाणीही जास्त लागते. यामुळे ट्रेकिंग स्थळाच्या ठिकाणी खाण्याची काय व्यवस्था आहे ते पहावे आणि नसेल तर आपल्यासोबत आपल्याला पोषण देतील असे खाद्यपदार्थ जसे सुकामेवा, ड्राय फ्रूटस , चिक्की, शक्य असेल तर पोळी भाजी सोबत ठेवावे. किंवा खाण्याचे नियोजन करून जावे.
खूप शारीरिक क्रिया झाल्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासू शकते. त्यामुळे ट्रेकिंग करताना भरपूर पानी प्याल याची काळजी घ्या.
ट्रेकिंगला जाताय याची कुटुंबियाना कल्पना द्या (Inform your family about trekking plan)
दुर्गम ट्रेकिंग स्पॉट वर कधी कधी दुर्घटना घडू शकते. अडकून पडावे लागू शकते. आशा ठिकाणी फोन ला नेटवर्क किंवा बॅटरी डाउन आशा समस्या होऊ शकतात. त्यामुळे आपल्या घरी कल्पना देऊन ठेवा. म्हणजे उशीर जरी झाला तरी चालू शकेल. घरी कुटुंब काळजीत पडण्याची वेळ येणार नाही.
पावसाळ्यात ट्रेकिंगला जाताना आणखी काय काय काळजी घ्याल ? (What else should you take care of while trekking in monsoon?)
- पावसाळ्यात ट्रेकिंग करताना सुरक्षित आणि आरामदायी राहण्यासाठी येथे काही अतिरिक्त टिपा आहेत:
- सुटसुतील, आरामदायी कपडे घाला. सुती कपडे टाळा, जे ओलावा टिकवून ठेवू शकतात आणि तुम्हाला थंड करू शकतात. त्याऐवजी, सिंथेटिक किंवा लोकरीचे कपडे घाला जे ओलावा काढून टाकतील. शक्यतो फूल स्लीव कपडे घाला. जेणेकरून किटकांचा त्रास होणार नाही.
- गरज असेल तर सनस्क्रीन आणि कीटकांना दूर ठेवणारी क्रीम वापरा. पाऊस सनस्क्रीन धुवून टाकू शकतो, म्हणून ते नियमितपणे पुन्हा लावा. पावसाळ्यात डास जास्त सक्रिय असल्याने कीटकनाशक देखील महत्त्वाचे आहे.
- प्रथमोपचार किट किंवा बँडेज, वेदानाशमक स्प्रे, पट्टी इत्यादि प्रथमोपचार समान बॅग मध्ये ठेवा. कोणत्याही ट्रेकसाठी प्रथमोपचार किट आवश्यक आहे, परंतु पावसाळ्यात ते विशेषतः महत्वाचे आहे. तुम्हाला कट, खरचटणे आणि फोडांवर उपचार करावे लागतील.
- चिखलासाठी तयार रहा. पावसाळ्यात पायवाटा चिखलाच्या असतील, त्यामुळे घाण होण्याची तयारी ठेवा. ओले आणि चिखलात काही हरकत नाही घसरणार नाहीत असे शूज घाला.
- मजा करा! पावसाळ्यात ट्रेकिंग हा एक आव्हानात्मक पण फायद्याचा अनुभव असू शकतो. निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद घ्या आणि जेव्हा तुम्ही ट्रेकिंग स्पॉटला पोहोचाल तेव्हा तुम्हाला जाणवेल. की हा अनुभव खूप काही निसर्गातील आठवणी देऊन जातो.
मला आशा आहे की या टिप्स तुम्हाला पावसाळ्यात सुरक्षित आणि आनंददायक ट्रेकिंगचा अनुभव घेण्यास मदत करतील
हे ही वाचा
पुण्यातील पर्यटन स्थळ | एक दिवस सहल – घोरवडेश्र्वर मंदिर डोंगर आणि घोरवडेश्र्वर लेणी