Pimpri Chinchwad
Posted in: जीवनशैली (Lifestyle)

Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवड मधील भेट द्यावी अशी सर्वोत्तम पर्यटन स्थळे

पिंपरी चिंचवड मधील भेट देण्यासारखी सर्वोत्तम पर्यटन स्थळे (Best Tourist Places to Visit in Pimpri Chinchwad)

पिंपरी चिंचवड हे पुणे शहरातील एक महत्वाचे औद्योगिक क्षेत्र आहे.हे पुण्याच्या आसपासच्या एरियाला एकत्र करून बनविण्यात आले होते. पिंपरी चिंचवड हे शहर आॅटोमोबाईल मोठ्या प्रमाणातील क्षेत्र,उत्पादन युनिटस व्यतीरीक्त आयटी क्षेत्रात देखील खुप वेगाने पुढे जात आहे.  पिंपरी चिंचवड ह्या शहराला पीसी एम सी ह्या नावाने देखील ओळखले जाते. महाराष्टातील पश्चिम विभागात पुणे शहरापासून जवळपास १५ किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. ज्याचा एरिया १८१ किलोमीटर इतका आहे. पिंपरी चिंचवड मधील अधिकतम लोक मराठी भाषेत बोलतात. हया शहरातील रस्ते रहदारी सुविधेप्रमाणे येथील लोकांची जीवनपद्धत खुप फास्ट वेगवान आहे.

 

पिंपरी चिंचवड ह्या शहराला स्मार्ट सिटी मिशनच्या मध्ये देखील निवडण्यात आले आहे. या शहरात शाॅपिंग खरेदी करण्यासाठी खुप माॅल्स अणि मार्केट उपलब्ध आहेत. पिंपरी चिंचवड शहरात अनेक प्रसिद्ध जेवणाचे ठिकाण देखील आहेत. येथील स्पेशालिटी मिसळ पाव,वडा पाव,पिठले भाकरी,भेळ आहे. पिंपरी चिंचवड शहरात तीन नदया वाहतात याचसोबत आजुबाजुला पर्यटकांना पाहण्यासाठी पर्यटन स्थळ देखील आहेत. इथे आपल्याला सुंदर बगीचे देखील पाहायला मिळतात.

Pimpri Chinchwad

आजच्या लेखात आपण पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) मध्ये पाहण्यासारखी पर्यटनस्थळे कोणकोणती आहेत हे थोडक्यात जाणुन घेणार आहोत.

 

१) अप्पु घर

अप्पु घर पुण्यातील पिंपरी चिंचवड येथील प्रसिद्ध असे लहान मुलांचे मनोरंजन पार्क आहे.अप्पु घर दुपारी बारा ते रात्री आठ वाजेपर्यंत सुरू राहते. अप्पु घरला पुण्यातील छोटे डिजनीलॅड असे देखील म्हटले जाते.इथे पार्किंगची देखील उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. अप्पु घर मध्ये ज्या मुलांची साडेतीन फुटापर्यंत आहे त्यांना प्रवेश फी ५० रूपये अणि ज्या मुलांची उंची साडेतीन फुटपेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी १०० रूपये इतकी प्रवेश फी ठेवण्यात आली आहे. पार्क मध्ये ज्या राईडस तसेच गेम्स आहेत ते पुर्ण आपण खेळलो तर सुमारे पाचशे रुपये इतका खर्च आपल्याला करावा लागतो.पण याचठिकाणी आपण पॅकेज घेतले तर आपल्याला ५० रूपये इतका डिस्काउंट भेटतो. याचसोबत आपण फक्त गेम्सच्या दिलेल्या यादीपैकी आपल्याला हव्या त्या निवडक गेम्सचे सिलेक्शन करून तेवढेच चार्ज देखील खेळण्यासाठी इथे भरू शकतात.

 

अप्पु घर मध्ये कोणत्या राईडची किंमत किती आहे ?

यात अप्पु एक्स्प्रेस ह्या राईडची किंमत ६० रूपये इतकी आहे.ही राईड लहान मुले आणि मोठी माणसे दोघांसाठी आहे. माय फेअर लेडी ह्या राईडची किंमत ५० रूपये इतकी आहे. प्रत्येक राईडच्या बाहेर एक बोर्ड लावलेला असतो जिथे दिलेले असते की ही राईड किती वयोगटातील मुलांसाठी आहे. यात काही राईड ह्या फक्त ३.५ फुटपेक्षा जास्त उंची असलेल्या व्यक्तींसाठी आहे.तर काही राईड फक्त साडे तीन फुट इतकी उंची असलेल्या छोट्या मुलांसाठी आहे. धडक गाडी ही राईड ३.५ फुटपेक्षा जास्त उंची असलेल्या मुलांसाठी आहे.याची किंमत ६० रूपये इतकी आहे. रोलर कोस्टर ह्या राईडची किंमत ८० रूपये इतकी आहे. अप्पु कोलंबस ही राईड ३.५ फुटपेक्षा जास्त उंची असलेल्या मुलांसाठी आहे.याची किंमत देखील ८० रूपये इतकी आहे. गाईडेड कार ह्या राईडची किंमत ६० रूपये इतकी आहे.फ्लाईग बलुन ह्या राईडची किंमत ६० रूपये इतकी आहे. १२ डी सिनेमॅटीकाची किंमत १५० रूपये इतकी आहे.टेलिकाॅम्बॅट ह्या राईडची किंमत ६० रूपये इतकी आहे.स्लॅम बाॅब ह्या राईडची किंमत ६० रूपये इतकी आहे. ज्यांना सर्व राईड न करता फक्त निवडक राईड करायच्या आहेत त्यांनी शंभर रुपयाचे तिकिट घेऊन जी राईड आपल्याला करायची आहे तिथे जाऊन तिचे तिकिट घेऊन घ्यायचे आहे.

हे वाचा – Marriage : लग्नाआधी आपल्या भावी पतीला जाणून घ्यायचे 7 प्रश्न

लहान मुलांसाठी कोणकोणत्या राईडस अप्पु घर मध्ये आहेत ?

लहान मुलांसाठी अप्पु घर मध्ये जिराफ राईड आहे ज्याची किंमत ५० रूपये इतकी आहे.मेरी गो राउंड तसेच गम्मत गिरकी,हेलिकाॅप्टर राऊंड आहे ज्याची किंमत देखील ५० रूपये आहे अशा लहान मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या राईडस अप्पु घर मध्ये उपलब्ध आहेत.

२) बर्ड व्हॅली उद्यान

बर्ड व्हॅली हे पिंपरी चिंचवड मधील गार्डन आहे.गार्डनच्या गेटच्या बाहेर छोटीशी चौपाटी आहे जिथे वडा पाव,पाणीपुरी इत्यादी खाण्याच्या वस्तू उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याचसोबत लहान मुलांसाठी खेळणी देखील इथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.बर्ड व्हॅली गार्डन मध्ये दुचाकी अणि चारचाकी दोन्ही वाहने लावण्यासाठी जागा आहे. बर्ड व्हॅली गार्डन मध्ये फिरण्यासाठी आपल्याला दहा रूपयाचे तिकिट विकत घ्यावे लागते.लाईट शो करीता अलग २० रूपयाचे तिकिट संध्याकाळी ५.३० मिनिटांनंतर चालु होते. बर्ड व्हॅली गार्डन मध्ये आपल्याला बोटींगची सुविधा आहे.मुलांना खेळण्यासाठी प्ले ग्राउंड देखील आहे.इथे आपल्या मित्र मैत्रिणींसोबत फॅमिली सोबत पिकनिक साजरा करता येईल असे स्पाॅट देखील बनविण्यात आले आहेत.इथे जाॅगिंग ट्रॅक देखील आहेत.

३) बटरफ्लाय ट्रेम्पोलिन पार्क

बटरफ्लाय ट्रेम्पोलिन पार्कमध्ये प्रवेश करत आत गेल्यावर सर्व औपचारिक माहीती रिसेप्शन एरिया मध्ये दिली जाते.इथे कोणकोणते विभाग आहेत अणि आपण किती वेळ आनंद लुटु शकतो हे देखील सांगितले जाईल. इथे वाॅम अप सेक्शन मध्ये फॅमिली सोबत वाॅम अप करू शकतो.लहान मुले तसेच वृद्ध व्यक्ती देखील इथे वाॅम अप करू शकतात. याचसोबत बास्केटबॉल,बॅक ड्राॅप,फोम पीट,अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अॅक्टीव्हीटी इथे आपल्याला करायला मिळतात.

४) दिघी टेकड्या

दिघी हिल्स ही ट्रेकिंग करण्यासाठी उत्तम ठिकाण आहे.ज्या पर्यटकांना डोंगरदरी चढणे ट्रेकिंग करणे आवडते अशा पर्यटकांना भेट देण्यासाठी दिघी टेकडी हा एक उत्तम पर्याय आहे.दिघी टेकडी पुण्यापासून साधारणतः २१ किलोमीटर एवढ्या अंतरावर आळंदी येथे आहे.हया टेकडीवर चढण्यासाठी सर्व बाजूंनी मार्ग आहेत.हया टेकडीवरून आपणास सुर्यास्त अणि सुर्यास्त हे दोघेही पाहावयास मिळतात.त्यामुळे ह्या ठिकाणाला पहाटे किंवा संध्याकाळी भेट देणे अधिक उत्तम ठरेल. दिघी टेकडीवर उभे राहुन आजुबाजुच्या परिसरातील गावांचे,तेथील शेत तसेच तलावांचे विहंगम दृश्य दिसुन येते.

५) दुर्गा टेकडी उद्यान

दुर्गा टेकडी हे उद्यान अप्पु घराच्या जवळपास असलेले आपणास पाहावयास मिळते.इथे टेकडीच्या माथ्यावर दुर्गा देवीचे मंदिर असल्याने ह्या उद्यानाला दुर्गा टेकडी असे नाव पडले. ह्या राखलेल्या उद्यानाची देखभाल करण्याचे काम पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडुन केले जाते.दुर्गा टेकडीवर आपल्याला रोज सकाळी जाॅगिंग करण्यासाठी ट्रॅक देखील आहे.

हे उद्यान व्यायाम करण्यासाठी जाॅगिंग करण्यासाठी पहाटे उघडण्यात येते.येथील आसपासच्या परिसरात वास्तव्यास असणारे व्यक्ती इथल्या निसर्गरम्य वातावरणात योग तसेच व्यायाम करण्यासाठी ह्या उद्यानात येतात. येथील दुर्गा देवीचे मंदिर भक्तजणांसाठी प्रमुख आकर्षणाचा विषय ठरते.दरवर्षी नवरात्रीत इथे सण उत्सव साजरा करण्यात येत असतो. शहरातील घाई गोंधळाच्या वातावरणापासून लांब जाऊन स्वच्छ मोकळ्या वातावरणात ज्यांना श्वास घ्यायचा आहे त्यांच्यासाठी देखील हे ठिकाण उत्तम पर्याय आहे.

६)घोरावडे श्वर महादेव मंदिर  घोरावडेश्वर महादेव मंदिर ह्या ठिकाणी पर्यटकांना ट्रॅकिंगचा देखील अनुभव प्राप्त होतो.पर्वतावर जाण्यासाठी दोन तीन रस्ते इथे आहेत. पण वर जाण्यासाठी आपण शिडयांचा देखील वापर करू शकतो.वर जाण्यासाठी आपल्याला दोनशे पेक्षा जास्त शिड्या चढाव्या लागतात. पुणे मुंबई जुन्या महामार्गाच्या जवळ हे ठिकाण आहे.इथे वाहने पार्क करण्यासाठी पार्किंगची देखील सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. येथे आपणास बौदध धर्मातील केनिआन पंथियांनी तयार केलेल्या विविध गुफा पाहावयास मिळतात.हया गुफांमध्ये आपल्याला बौद्ध गुफेप्रमाणे विहार,चैत्यगृह पाहायला मिळतात.येथील विहार चैत्यगृह यांची रचना अत्यंत सर्वसाधारण पद्धतीने करण्यात आली आहे. हे ठिकाण आज विशेषतः घोरावडेश्वर महादेव मंदिर म्हणून ओळखले जाते.इथे महादेवाचे मंदिर आहे.महाशिवरात्रीत इथे खुप मोठी यात्रा भरताना दिसुन येते.येथील पर्वतीय गुफांमध्ये पाण्याचे छोटे छोटे तळे देखील बनविण्यात आले आहेत.

७) कासारसाई धरण

कासारसाई धरण हे ठिकाण पुण्याच्या खुप नजीक आहे.इथे आपणास वेगवेगळ्या अॅक्टीव्हीटी करायला मिळतात. इथे बोटींग तसेच बंजिग जंपिगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.हे पुण्यातील एकमेव बंजिग जंपिग म्हणून देखील ओळखले जाते.इथे बंजिग जंपिग करण्यासाठी ३५०० रुपये इतका चार्ज घेतला जातो. कासारसाई धरण येथे पुण्यातील एकमेव स्काय डायनिंगची सुविधा सुदधा आहे.हे स्काय डायनिंग नुकतेच एक वर्षापुर्वी सुरू करण्यात आले आहे. याचसोबत येथे स्पेस पार्क आहे.भारतातील पहिले लवर्स पॅराडाईज प्रेमींचे स्वर्ग देखील इथे आहे.बाहेरगावाहुन आलेल्या पर्यटकांसाठी मुक्काम करण्यासाठी इथे उत्तमोत्तम रिसोर्टस देखील आहेत.

८) गुफेतील माता वैष्णोदेवी मंदिर

धार्मिक व्यक्तींसाठी,भक्तजणांसाठी पुण्यातील पिंपरी चिंचवड येथील माता वैष्णोदेवीचे मंदिर हे भेट देण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. इथे आपणास सुंदर असे एक मंदिर पाहावयास मिळते मंदिरात गुफा देखील आहे.गुफेमध्ये जाताना खाली पाणी आहे ज्याने आपले पाय स्वच्छ होतात.गुफेमध्ये सौम्य प्रकाशाची देखील सुविधा आहे. इथे वेगवेगळे दुकान आहेत जिथे आपणास पुजेचे ताट तसेच पुजेशी देवधर्माशी संबंधित सर्व साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. मंदिराच्या आत धबधबा बनविण्यात आला आहे.नवरात्रीत ह्या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची खुप गर्दी पाहायला मिळते.

९) मोरया गोसावी गणपती मंदिर

पवना नदीच्या काठी बांधण्यात आलेले हे गणपतीचे सुंदर मंदिर आहे.दर महिन्याच्या संकष्टीला भाविक इथे दर्शनासाठी येतात. इथे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वेगवेगळी दुकाने आपणास पाहावयास मिळतात.इथे मंदिराच्या आवारात पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी दुकाने आहेत. मंदिरात दर्शनासाठी भाविकांना रांगेत उभे राहावे लागते.मंदिरातुन दर्शन घेऊन बाहेर आल्यावर जवळच जिजाऊ पर्यटन केंद्र आहे.इथे आपणास निरनिराळ्या प्राण्यांच्या प्रतिकृती दिसुन येतील. वेगवेगळ्या मगरी सुसरींच्या प्रतिकृती देखील इथे आपणास पाहावयास मिळतात.सायंकाळी लहान मुलांना खेळण्यासाठी इथे सुंदर ठिकाण आहेत. इथे लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी जंगली प्राण्यांच्या प्रतिकृती देखील ठेवण्यात आल्या आहेत.उद्यानात स्केटिंग राऊंडची देखील सुविधा आहे.जिथे मुले स्केटिंगचा सराव करण्यासाठी येतात.

१०) पिंपरी चिंचवड सायन्स पार्क

पिंपरी चिंचवड सायन्स पार्क-मध्ये आपल्याला विज्ञानाशी संबंधित निरनिराळ्या गोष्टी छायाचित्रे पाहावयास मिळतात. सायन्स पार्क-मध्ये प्रवेश घेण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला तिकिट खरेदी करावे लागते.इथे तारामंडल शो तसेच थ्रीडी शो करीता आपणास वेगवेगळे तिकिट घ्यावे लागते.  सायन्स पार्क मध्ये प्रवेश करताच आपल्याला एम आयजी २३ फाईव्ह जी एअरक्राफ्ट दिसुन येईल. हे एअरक्राफ्ट रशिया मध्ये १९७० मध्ये बनविण्यात आले होते हे कारगील युद्धात वापरण्यात आले होते.हे ३० वर्ष भारतीय हवाई दलासाठी वापरण्यात आले होते. इथे एक छोटेसे सायन्स शाॅप देखील आहे जिथे वेगवेगळ्या प्रकारचे सायन्स संबंधित गेम्स एक्सपिरीमेंट आपणास पाहावयास मिळतात.न आॅटोमोबाईल गॅलरी मध्ये जुन्या काळात वाहन कशी तयार केली जायची हे सांगितले गेले आहे.आॅटोमोबाईल सेक्टर मध्ये जुन्या काळातील वाहने आपणास पाहावयास मिळतात.

Balaji Temple, Ketkawla, Pune, Maharashtra
Pimpri Chinchwad

११) प्रति बालाजी मंदिर

प्रती बालाजी मंदिरला व्यंकटेश्वर मंदिर असे देखील म्हटले जाते.हे मंदिर पुणे जंक्शन पासुन ४३ किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. हे मंदिर एकदम खुल्या मोकळ्या वातावरणात स्थापित करण्यात आले आहे.मंदिराच्या आजुबाजुला रस्त्यावर छोट छोटी वृक्ष लावलेली आपणास दिसून येतात. हे मंदिर वर्षभर दर्शनासाठी खुले असते पण मान्सुन मध्ये येथे भेट देण्याची मजा वेगळीच असते.हया मंदिरात दर्शनासाठी भाविकांची लांबलचक रांगा पाहायला मिळतात. इथे मंदिरात जाताना आपल्याला सुरक्षेच्या हेतुने मोबाईल तसेच कुठलेही इलेक्ट्रॉनिक साधन आत घेऊन जाण्यास मज्जाव केला जातो.मंदिराच्या मध्ये आपल्याला फोटो काढण्यास सक्त मनाई आहे. मंदिरातुन दर्शन करून बाहेर आल्यावर आपल्याला खिचडीचा प्रसाद वाटप केला जातो.हे मंदिर दिसायला तिरूपती बालाजी मंदिराची ट्रू काॅपी देखील वाटते.म्हणुन याला तिरूपती बालाजी मंदिर असे म्हटले जाते.

१२) प्रति शिर्डी

प्रती शिर्डी हे ठिकाण मुख्य शिर्डीची प्रतिकृती म्हणून ओळखले जाते.हे पुण्यातील एका छोट्याशा गावात आहे. प्रति शिर्डी पुण्यातील शिरगाव येथे आहे.इथे जाण्यासाठी आपल्याला जुन्या पूणे महामार्गावरून जावे लागते.पुण्यापासुन हे ३५ किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. प्रति शिर्डी येथे पर्यटकांना वाहने पार्क करण्यासाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिरात प्रवेश करण्यासाठी आपल्याला पैलवान वस्ताद नामदेवराव काची मार्ग ह्या मुख्य प्रवेशद्वारावरून आत यावे लागते.हया मुख्य दवाराच्या समोरच भाविकांना दर्शनासाठी आत जाताना चप्पल बुट काढायला चप्पल स्टॅड देखील आहे. मुख्य दवारावरून प्रवेश करताच डाव्या बाजूला पाय धुण्यासाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रति शिर्डी मध्ये आपल्याला गुरूस्थान हे ठिकाण पाहावयास मिळते.इथे एक पिंपळाचे झाड आहे असे म्हटले जाते की साईबाबा इथे विश्रांती घ्यायचे.म्हणुन ह्या जागेला गुरूस्थान असे नाव देण्यात आले आहे. दर्शन घेतल्यानंतर आपण समाधी स्थळी मुख्य मंदिरात जाऊ शकतो.हे मंदिर शिर्डी मधील मुख्य मंदिराची प्रतिकृती आहे.हे मंदिर २००३ मध्ये प्रकाश देवले यांनी बांधले होते . ह्या मंदिरात दर्शनासाठी सकाळी पाच वाजेपासून दहा वाजेपर्यंत भाविकांना जाता येते.

मुख्य मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर आपण दारकामाईला भेट देऊ शकतात.इथे लोक आपला नवस बोलण्यासाठी येत असतात. दारकामाईला भेट देऊन झाल्यावर आपण मोठ्या राजवाडा प्रमाणे दिसत असलेल्या अन्नछत्र येथे महाप्रसाद घेण्यासाठी जाऊ शकतो.महाप्रसाद घेण्यासाठी सर्व भाविकांना कुपन घेणे गरजेचे आहे. महाप्रसादाचा वेळ दुपारी बारा ते तीन अणि संध्याकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत असतो.यानंतर आपण साईबाबा विश्रांती घ्यायचे झोपायचे ह्या ठिकाणी भेट देऊ शकतो ज्याचे नाव चावडी असे आहे.

१३) संत तुकाराम महाराज गाथा मंदिर

संत तुकाराम महाराज गाथा मंदिर देहु मध्ये आहे.देहु हे गाव संत तुकाराम महाराज यांच्या नावाने प्रसिद्ध आहे.संत तुकाराम महाराज यांचा जन्म ह्याच गावी झाला होता. देहु हे गाव मुंबई पासुन १३४ किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.इथे जाण्यासाठी रोड अणि रेल्वे दोन पर्याय आहेत. मंदिराच्या गेटातुन प्रवेश केल्यावर आपणास संत तुकाराम महाराज यांचे मंदिर दिसुन येईल मंदिराच्या आजुबाजुला मुलांना खेळण्यासाठी पटांगण आहे. मंदिराच्या समोरील बाजुस हत्तीचे दोन मोठे पुतळे आपणास पाहावयास मिळतात.हया मंदिराच्या मागील बाजूस शांत अणि सुसंथ गतीने वाहणारी इंद्रायणी नदी आहे. पायरया चढुन वर मंदिरात आल्यावर आपल्याला समोरच संत तुकाराम महाराज यांची मुर्ती दिसुन येईल.हया मुर्तीत संत तुकाराम महाराज यांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केलेले हातात विना घेतलेली दिसुन येईल.ही मुर्ती मंदिराच्या एकदम मधोमध ठेवण्यात आली आहे.

१४) थेरगाव बोट क्लब

थेरगाव बोट क्लब हे पिंपरी चिंचवड मधील खुप प्रसिद्ध गार्डन आहे.लहान मुलांना खेळण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे . बोटींग क्लबच्या बाहेर नदीवर एक छोटासा बांध बांधण्यात आला आहे. इथे उन्हाळ्यात मुले अंघोळ करण्याचा आनंद लुटतात. बोटींग क्लबच्या मध्ये जाण्यासाठी आपल्याला काही चार्जेस द्यावे लागतात.बोटींग क्लबच्या मध्ये एक सुंदर अणि हिरवागार असा एक बगीचा आहे. लहान मुलांना खेळण्यासाठी इथे झोका सुरकुंडी असे वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. गार्डन मध्ये एक नॅनो ट्रेन आहे ज्यात बसुन मुले पुर्ण गार्डनला चक्कर मारू शकतात.

बोट क्लबमध्ये मध्ये वाॅटर गेम्स देखील पाहायला मिळतात.इथे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच पाण्यात भिजण्याचा आनंद घेता येतो. याचसोबत इथे आपणास बोटींगची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.इथे बोटींग करताना आवश्यक असलेल्या सर्व सुरक्षेची तजवीज करण्यात आली आहे. आपल्या आवश्यकतेनुसार बोट निवडून आपण पाण्यात बोटींग करण्याचा आनंद प्राप्त करू शकतो.इथे वेगवेगळ्या डिझाईन असलेल्या बोट बोटींगसाठी उपलब्ध आहेत.

१५) डायनासोर उद्यान

पिंपरी चिंचवड महापालिकेजवळ डायनासोर उद्यान आहे.रविवारच्या दिवशी सुट्टी असल्याने भरपूर संख्येत लोक इथे आनंद लुटण्यासाठी आपल्या लहान मुलांना घेऊन येत असतात. गार्डन मध्ये प्रवेश केल्यावर आपल्याला एक मोठा डायनासोरचा पुतळा पाहायला मिळतो.उद्यानात लहान मुलांना खेळण्यासाठी स्टेडियम सारखी एक जागा बनवण्यात आली आहे. उद्यानामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वृक्षांची रोपटे लावलेली आपणास दिसून येतात.

 

१६) गजानन महाराज मंदिर भक्त निवास

गजानन महाराज भक्त निवास हे आळंदी मधील ठिकाण आहे.इथे दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या राहण्याची सोय भक्त निवास मध्ये केली जाते.इथे चोविसतास बुकिंग सुरू असते. भक्त निवासाच्या बाहेर वाहने पार्क करण्यासाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.रुममध्ये राहण्यासाठी आलेल्या भाविकांच्या जेवणाची व्यवस्था देखील सकाळी ९ ते संध्याकाळी ८ वाजेपर्यंत इथे केली जाते.

१७) बिर्ला गणपती मंदिर

बिर्ला गणपती मंदिर हे पुण्यापासून जवळपास ३० किलोमीटर इतक्या अंतरावर राष्ट्रीय महामार्ग ४ वर स्थित आहे. बिर्ला मंदिरात प्रवेश करण्यासाठी आपल्याला एकुण १८९ पायरया चढाव्या लागतात.पायरया चढता चढता दम लागल्यावर विश्रांती घेण्यासाठी जागोजागी बसण्याची तहान लागल्यास पिण्याच्या पाण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. बिर्ला गणपती मंदिरात असलेली भगवान श्रीगणेशाची मुर्ती ही एक हजार टन इतकी आहे.हया मुर्तीची उंची ५४ फुट इतकी आहे.ही मुर्ती सिमेंट स्टील अणि काॅपर पासुन बनविण्यात आली आहे. ही मुर्ती ज्या प्लॅटफॉर्मवर ठेवण्यात आली आहे त्याची लांबी अठरा फुट इतकी आहे.अणि रूंदी ४५ फुट इतकी आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to Top