हरिहरेश्वर बीच - Harihareshwar beach info marathi
Posted in: जीवनशैली (Lifestyle), पर्यटन

श्री क्षेत्र हरिहरेश्वर – दक्षिण काशी, रायगड जिल्ह्यातील नैसर्गिक सौंदर्याने नटलेले आध्यात्मिक आश्रयस्थान (Shri Kshetra Harihareshwar – A spiritual heaven surrounded by natural beauty called as Dakshin Kashi, Raigad District – 2023)

श्री क्षेत्र हरिहरेश्वर विषयी माहिती Shri Kshetra Harihareshwar information in Marathi

श्री क्षेत्र हरिहरेश्वर हे महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील नैसर्गिक सौंदर्याने नटलेले एक महत्त्वाचे आध्यात्मिक आश्रय स्थान, तीर्थक्षेत्र, पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. हरिहरेश्वर हे कोकणातील निसर्गरम्य तसेच पवित्र तीर्थस्थान म्हणून प्रसिद्ध आहे.हरिहरेश्वरला दक्षिण काशी ह्या नावाने देखील संबोधिले जाते. श्री हरिहरेश्वर हे आपल्या भारत देशातील एक अत्यंत महत्वाचे तीर्थस्थळ मानले जाते.

Sri Kshetra Harihareshwar temple - dongardarya.com Sri Kshetra Harihareshwar beach

श्री क्षेत्र हरिहरेश्वर ऐतिहासिक आणि भौगोलिक माहिती (Sri Kshetra Harihareshwar Historical Information)

पेशव्यांचे कुलदैवत म्हणून ओळखले जात असलेल्या ह्या शिवस्थानास, तीर्थस्थळाला पांडवांनी देखील भेट दिली होती असे पुराणात सांगितले गेले आहे. श्री हरिहरेश्वराचे मंदिर हे फार जुने अणि शिवकालीन असल्याचे सांगितले जाते. पण ह्या मंदिराचे बांधकाम नक्की कोणत्या कालखंडात झाले असावे याबाबत कुठलाही खुलासा झालेला नाहीये. इसवी सन 1723 मध्ये श्रीमंत पहिले बाजीराव पेशवे यांच्या हस्ते ह्या मंदिराचा प्रथमतः जीर्णोद्धार करण्यात आला होता असे अनेक पुराव्यांच्या आधारे समोर आले आहे.

महाराष्ट्र राज्यात सावित्री नदी ज्या ठिकाणी अरबी समुद्रास येऊन मिळते तिथेच मुखावर एक गाव आहे त्या गावाचे नाव हरिहरेश्वर असे आहे. हरिहरेश्वर नावाचे हे गाव शिवगिरी, ब्रम्हगिरी, विष्णुगिरी, पार्वती ह्या अशा एकुण चार टेकड्यांच्या कुशीमध्ये हे गाव वसलेले दिसुन येते. तसेच नदीच्या दुसरया काठावर श्रीवर्धन नावाचे गाव असलेले आपणास दिसून येते. ही दोन्ही रायगड जिल्ह्यातील पर्यटन स्थळे आहेत.

श्री क्षेत्र हरिहरेश्वर देवस्थान आणि पर्यटन स्थळाचे आध्यात्मिक महत्व (Spiritual Significance of Sri Kshetra Harihareshwar Temple and Tourist Place)

हरिहरेश्वर गावाच्या उत्तर दिशेस समुद्रकिनारी हरिहरेश्वराचे मंदीर आहे. असे म्हणतात की ह्या क्षेत्रास भगवान विष्णू यांचे वरदान प्राप्त आहे. त्यामुळेच याला देवघर तसेच देवाचे देवस्थान असे सुद्धा म्हटले जाते.

येथे आपणास एके बाजुस हिरवागार गर्द वनश्रीने नटलेला डोंगर पाहावयास मिळतो. आणि दुसऱ्या बाजुने आपणास नयनरम्य असा स्वच्छ निळा समुद्र दिसुन येतो.

नारळी पोफळीच्या बागांची साक्ष घेत डोंगर दर्याच्या कुशीमध्ये विसावलेले हे एक अत्यंत पवित्र तीर्थस्थान आहे.

हरिहरेश्वर क्षेत्रात काळभैरव, योगेश्वरी, हनुमान, सिद्धीविनायक, हरिहरेश्वर, अशी एकुण चार ठिकाणे, मंदिरे येथे आपणास पाहावयास मिळतात.

यातील योगेश्वरी अणि कालभैरव मंदिर अत्यंत महत्वाचे देऊळ म्हणून ओळखले जाते. हरिहरेश्वर मधील सर्वं मंदिरांना कोकणी पद्धतीचे छपरे बसविण्यात आलेली आहेत.

हरिहरेश्वर मधील अत्यंत महत्वपूर्ण क्षेत्र काळभैरव मानले जाते.हया ठिकाणा बाबद दोन आख्यायिका अत्यंत प्रसिद्ध आहे ज्यातील पहिली आख्यायिका अशी आहे की बळी राजाकडुन तीन पाऊले इतकी जमीन घेत असताना वामनाने ज्या ठिकाणी त्याचे दुसरे पाऊल ठेवले त्याचा आरंभ हरिहरेश्वर पासुन झाला होता.

ह्या क्षेत्राबाबदची दुसरी आख्यायिका अशी आहे की जेव्हा अगस्ती मुनी हे शांततेचा शोध घेत इकडे तिकडे भटकत होते.अशा परिस्थितीत हरिहरेश्वर ह्या क्षेत्रातील चार स्वयंभु लिंगाचे दर्शन घेतल्यानंतर अगस्ती मुनी ह्यांचे अशांत मन शांत झाले होते.

याचसोबत समुद्राच्या काठी विष्णू तीर्थ, विष्णु पद, सुर्यतीर्थ, वक्रतीर्थ, यज्ञकुंड अशी अनेक ठिकाणे आपणास येथे पाहावयास मिळतात.

हरिहरेश्ववरला जायचे कसे? श्रीहरिहरेश्वरला जाण्याचा मार्ग कोणता आहे? (How to travel to Harihreshwar? What is the route to Sri Harihareshwar?)

श्री क्षेत्र हरिहरेश्वर हे रायगड पासुन साधारणतः 85 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. पुणे पासून हरिहरेश्वर अंतर 180 किलोमीटर आहे. हरिहरेश्वर येथे जाण्यासाठी मुंबई -गोवा महामार्गावरील दासगाव ह्या ठिकाणाहून फाटा फुटतो. श्री वर्धनच्या रस्त्यास माणगाव ह्या ठिकाणाहून आरंभ होतो. श्री वर्धन वरून होडीने हरिहरेश्वरला आपणास जाता येईल. माणगाव‌ वरूनही आपण हरिहरेश्ववरला जाऊ शकतो.

हरिहरेश्ववर हे ठिकाण मुंबई ह्या शहरापासून २३० किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. मुंबई पासुन हरिहरेश्ववरला जाण्यासाठी सुमारे तीन ते चार तास इतका कालावधी लागतो.

मुंबई वरून पर्यटक छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ ह्या ठिकाणाहून विमानात बसून हरिहरेश्ववरला हवाई मार्गाने जाता येईल.

अणि पुणे ह्या शहरापासून सुमारे १८० किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.पुण्यापासुन हरिहरेश्ववरला जाण्यासाठी तीन तास इतका कालावधी लागु शकतो.

पुण्याहुन विमानाने हरिहरेश्ववरला जाण्यासाठी पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ एक चांगला पर्याय आहे.

याचसोबत माणगाव हे हरिहरेश्ववर जवळील सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन असल्याने आपणास माणगावला उतरून ऑटो बुक करून देखील हरिहरेश्ववरला जाता येईल.

हरिहरेश्ववरला भाविक पर्यटक एसटी बसने किंवा एखादी टॅक्सी करून,स्वताच्या चारचाकी फोर व्हीलर वाहनाने देखील रस्ते मार्गाने श्री हरिहरेश्वर येथे जाऊ शकतात.

पुण्याहुन श्रीहरिहरेश्वरला जाण्यासाठी एकुण तीन मार्ग आहेत. मुळशी ,तसेच वाई वरून महाबळेश्वर मार्गाने अणि भोरवरून महाड मार्गाने देखील जाता येईल.

हरिहरेश्ववरला एसटी बस तसेच इतर खाजगी वाहने देखील जातात.सर्व हरिहरेश्ववर क्षेत्रातील प्रमुख पर्यटन स्थळांना एक्सप्लोर करण्याकरिता दोन तीन तास इतका कालावधी लागतो.

थोडक्यात सांगायचे म्हटले तर हरिहरेश्ववर येथे पर्यटक हवाई मार्गाने, रेल्वे द्वारे तसेच रस्ते मार्गाने देखील जाता येते.

श्री हरिहरेश्ववर येथे पाहण्यासारख्या आणि करण्यासारख्या गोष्टी | मुख्य पर्यटक आकर्षणे (Harihareshwar top tourist attractions and landmarks.)

नजीक असलेला समुद्र किनारा येथे आलेल्या सर्व पर्यटकांचे लक्ष वेधुन घेण्याचे काम करतो.समुद्रातील लाटांचे विहंगम दृष्य येथे पर्यटकांना पाहावयास मिळते.

ज्या पर्यटकांना सकाळचा सुर्योदय अणि संध्याकाळच्या सुर्यास्ताचे प्रत्यक्ष दर्शन प्राप्त करायचे आहे अशा पर्यटकांनी एकदा तरी ह्या समुद्र किनारयाला नक्की भेट द्यायला हवी.

ह्या समुद्रात स्पीड बोट राईड,वाॅटर स्कुटर राईड असे अनेक वाॅटर स्पोर्ट्स ॲक्टीव्हीटी देखील होतात. हया सर्व ॲक्टीव्हीटी आपणास येथे करावयास मिळतील.

हा समुद्र किनारा अत्यंत स्वच्छ निर्मळ असल्याचे सांगितले जाते.म्हणुन ह्या स्वच्छ प्रदुषण मुक्त समुद्रकिनारी पर्यटक आपल्या कुटुंबासोबत देखील वेळ घालवू शकतात.

आजुबाजुला येत असलेला पक्ष्यांच्या किलबिलाटीचा आवाज,आजुबाजुला विस्तारलेली दाट अशी वनराई मनास सुखावते.येथे आल्यावर सर्व चिंता ताणतणाव नाहीसा होऊन आपणास अत्यंत सुखद अनुभव प्राप्त होतो.

Near Harihareshwar scenery beach

कर्नाटक येथील गोकर्ण ते ठाणे ह्या जिल्ह्यात असलेले निर्मळ हे पाचशे मैल इतके असलेले अंतर तसेच सुमारे ४८ मैल रूंद इतका असलेला भव्य परिसर हा श्री हरिहरेश्वरचा परिसर म्हणून ओळखला जातो.

हरिहरेश्वर मधील दक्षिण व उत्तर दिशेस बारा ज्योतिर्लिंग देखील आहेत. हरीहरेश्र्वर हे देशात १०८ तीर्थस्थळे असताना देखील सर्व तीर्थांमध्ये अत्यंत प्रमुख तीर्थ म्हणून ओळखले जाते.

श्री हरिहरेश्वरचा श्री हरिहरेश्वर महात्म पोथीमध्ये महापवित्र क्षेत्र ह्या नावाने उल्लेख देखील केला गेला असल्याचे आपणास दिसून येईल.

सगळ्यात पहिले काळभैरवाचे दर्शन घ्यायचे. मग हरिहरेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर पुन्हा काळभैरवाचे दर्शन घ्यायचे अशी येथील प्रथा परंपरा आहे.

श्रीहरिहरेश्वर येथील मंदिरांच्या गाभार्यात ब्रम्हा, विष्णू तसेच शिव पार्वती यांच्या लिंगाच्या आकार असलेल्या मुर्ती दिसुन येतात.

हरिहरेश्ववरला पर्यटकांची राहण्याची सोय कोठे आहे?

सर्व भाविक तसेच पर्यटक यांची हरिहरेश्ववर येथे उत्तम राहण्याची सोय करण्यात आली आहे. महाराष्ट राज्य पर्यटन महामंडळाच्या विश्राम गृहात सर्व पर्यटकांच्या राहण्याची सोय करण्यात आली आहे.

हरिहरेश्ववरला पर्यटकांची राहण्याची सोय

एवढेच नव्हे तर येथे अनेक खासगी तसेच घरगुती हाॅटेल्स देखील आहेत जिथे पर्यटक वाजवी दरात राहु शकतात. आणि कोकणी पाहूणचाराचा लाभ प्राप्त करू शकतात. तुम्ही ऑनलाइन सर्च करून या हॉटेल्स ला संपर्क करून सर्व माहिती विचारून आपल्या नियोजनाप्रमाणे बुकिंग करू शकता. हे सर्वात सोपे पडते.

हरिहरेश्ववर जवळची कोणकोणती स्थळे निसर्गरम्य तसेच पाहण्यासारखी आहेत?

हरिहरेश्ववर क्षेत्रात पर्यटकांना पाहण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत.

श्री हरिहरेश्वर येथे काळभैरव मंदिर तसेच पर्यटकांसाठी बाणकोट किल्ला,श्री हरिहरेश्वर बीच, बागमंडला बीच, अशी अनेक ठिकाणे पाहण्यासारखी आहेत.याचसोबत पर्यटकांना हिम्मत गड किल्ल्याला देखील भेट देता येईल. इथे पर्यटकांना फेरीने पोहोचावे लागते.

बागमंडला बीच हे पर्यटकांना भेट देता येईल असे एक प्रेक्षणीय स्थळ आहे. हे बीच हरिहरेश्वर स्वच्छ समुद्रकिनारा असलेले ठिकाण आहे.

ह्या किनार्यावर वाहताना दिसणारे पांढरे शुभ्र पाणी बघितल्यावर आपले मन अगदी प्रसन्न होऊन जाते.

याचसोबत बाणकोट हा किल्ला देखील ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचा किल्ला आहे ज्याला पर्यटक भेट देऊ शकतात.

सर्व पर्यटक बाणकोट ह्या किल्ल्यावर बागमंडला खाडी मधील बोटीदवारे भेट देण्यासाठी जातात.

पुणे शहराच्या सीमेजवळ 3 छोटे पिकनिक ट्रेकिंग पॉइंटस

पुण्यातील पर्यटन स्थळ | एक दिवस सहल – घोरवडेश्र्वर मंदिर डोंगर आणि घोरवडेश्र्वर लेणी

Comments (2) on "श्री क्षेत्र हरिहरेश्वर – दक्षिण काशी, रायगड जिल्ह्यातील नैसर्गिक सौंदर्याने नटलेले आध्यात्मिक आश्रयस्थान (Shri Kshetra Harihareshwar – A spiritual heaven surrounded by natural beauty called as Dakshin Kashi, Raigad District – 2023)"

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to Top