काय आहे समानतेचे शिल्प (Statue of equality) ?
स्टॅच्यु ऑफ इक्वॅलिटी – श्री रामानुजाचार्य यांचे शिल्प हैदराबाद येथील स्टॅच्यु ऑफ इक्वॅलिटी हे हैदराबाद जवळील मुच्छिंतल येथे स्थित असलेले सुंदर पर्यटन स्थळ आहे. बैठ अवस्थेत असलेली ही जगातील दुसरी सर्वात उंच प्रतिमा (The second tallest statue in the world) म्हणून ओळखली जाते.

कोण होते रामानुजाचार्य ?
रामानुजाचार्य हे अकराव्या आणि बाराव्या शतकातील वैदिक तत्वज्ञ, धर्मशास्त्रज्ञ आणि समाजसुधारक होते. ते विशिष्ट अद्वैत वेदांत तत्वज्ञानाचे समर्थक होते जे अद्वैतवादाच्या कल्पनेचे समर्थन करते.
अद्वैत म्हणजे अ + द्वैत म्हणजे दोन नाही तर एकच म्हणजे परमात्मा एक आहे. आत्मा आणि परमात्मा सुद्धा एकच आहे. जेव्हा आत्मा परमात्म्याशी एकरूप होतो तेव्हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होऊन मोक्षाला जातो.
Statue of Equality बद्दल काही आकर्षक तथ्ये
- सोने, चांदी, तांबे, पितळ, जस्त अशा पाच धातुंपासुन ही मुर्ती तयार करण्यात आली आहे. ही जगातील एक अतिशय भव्य आणि सुंदर स्वर्णमूर्ती आहे.
- सुमारे ५४ फुट आधार भवनावर ही मुर्ती बांधण्यात आली आहे. या मुर्तीला भद्रवेदी असे नाव देखील देण्यात आले आहे.
- श्री रामानुजाचार्य यांची मुर्ती ही तब्बल दोनशे सोळा फुट इतक्या लांबीची मुर्ती आहे.
- बैठ अवस्थेत असलेली ही जगातील दुसरी सर्वात उंच प्रतिमा (The second tallest statue in the world) म्हणून ओळखली जाते.
- श्री रामानुजाचार्य यांच्या समानता आणि सामाजिक न्याय या क्षेत्रातील महान कार्यासाठी हा उंच पुतळा श्रद्धांजलि अर्पण करण्यासाथी उभारण्यात आला आहे.
- ही मुर्ती तयार करण्यासाठी तब्बल अठराशे टन इतक्या पंचधातुंचा वापर करण्यात आला आहे.
- तब्बल दोनशे एकरपेक्षा जास्त जागेवर स्टॅच्यु ऑफ इक्वॅलिटीचा परिसर असलेला आपणास पाहावयास मिळतो.
- रामानुजाचार्य यांची ही प्रतिमा तयार करण्यासाठी सुमारे एक हजार करोड इतका खर्च आला होता.
- हा स्टॅच्यु दिसायला इतका आकर्षक आहे की देश तसेच विदेशातील पर्यटक देखील हा स्टॅच्यु पाहण्यासाठी येथे भेट देण्यासाठी येतात.
या ब्लॉग मध्ये काय वाचाल?
स्टॅच्यु ऑफ इक्वॅलिटीची ऐतिहासिक पार्श्वभूमी (Historical Background of the Statue of Equality)
स्टॅच्यु ऑफ इक्वॅलिटी म्हणून रामानुजाचार्य यांचेच शिल्प का आहे? हा प्रश्न सर्वांना पडला असेल. त्याचे कारण म्हणजे रामानुजाचार्यांच्या मुख्य तत्वांपैकी एक तत्व म्हणजे सर्व आत्मे ईश्वराच्या दृष्टीने समान आहे. प्रत्येक जिवामध्ये अध्यात्मिक अनुभूती घेण्याची क्षमता आहे. प्रत्येकात परमात्याशी एकरूप होण्याची योग्यता असते.
रामानुजाचार्य यांनी आस्था, जात, धर्म ह्या सर्वच बाबतीत जगासमोर समानतेचा विचार मांडण्याचे कार्य केले होते. त्यांचा हाच विचार घेऊन स्वामी रामानुजाचार्य यांची ही मुर्ती साकारण्यात आली आहे.
Statue of Equality या पर्यटन स्थळाची माहिती
ह्या परिसराच्या चारही बाजूंनी वेगवेगळ्या प्रकारची भगवान विष्णूची १०८ मंदिर पाहावयास मिळतात. परिसरात पुरेशी कार तसेच बाईक पार्क करण्यासाठी जागा देखील आहे.
ह्या मुर्तीचा इतिहास हा एक हजार वर्षांपेक्षा अधिक जुना आहे. हया मुर्तीमध्ये ज्या स्वामी रामानुजाचार्य यांची प्रतिमा आहे त्यांचे पार्थिव देह हे एक हजार वर्षांनंतर देखील संरक्षित करुन एका मंदिरात ठेवण्यात आले आहे.
स्वामी रामानुजाचार्य यांनी जगाला दिलेली शिकवण अणि त्यांचे विचार संपुर्ण जगभरात पोहोचण्यासाठी हे मैलाचा दगड ठरेल. या स्थळाचे याचे बांधकाम २ मे २०१४ मध्ये सुरू झाले होते. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ फेब्रुवारी २०२२ रोजी ह्या शिल्पाचे अनावरण करण्यात आले होते.

भारतातील एक महान संत म्हणून ओळखले जाणारया स्वामी रामानुजाचार्य यांच्या हजाराव्या जयंतीनिमित्त हा पुतळा साकारण्यात आला होता.
रामानुजाचार्य यांचे स्मारक Statue of Equality म्हणजेच समानतेचे शिल्प हे भारतातील हैदराबाद तेलंगणामधील सर्वोत्तम आणि महत्त्वाचे पर्यटन स्थळ तसेच भारतातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. अधिक जाणून घेण्यासाठी हा video पहा Exploring the Majestic Statue of Equality in Hyderabad
ह्या स्टॅच्युच्या अवतीभोवती असलेले सौंदर्य देखील पाहण्यासारखे आहे.
हे ही वाचा :
श्री क्षेत्र हरिहरेश्वर – नैसर्गिक सौंदर्याने नटलेले आध्यात्मिक आश्रयस्थान
पुणे शहराच्या सीमेजवळ निसर्गाच्या पाऊलखुणा: 3 छोटे पिकनिक ट्रेकिंग पॉइंटस
मंदिरात दर्शनासाठी प्रवेश करताना आपल्याला मोबाईल पर्स इत्यादी सर्व वस्तू काऊंटरवर जमा कराव्या लागतात. किंवा आपण आपल्या गाडीत देखील मोबाईल पर्स ठेवून येऊ शकता.
इंट्री गेटवर आल्यावर सर्वांना कपाळाला टिळा लावला जातो. आपल्या जवळील सर्व वस्तू काऊंटरवर जमा कराव्या लागतात मग टिकिट घेऊन परिसरात प्रवेश दिला जातो.
इथे नो कॅमेरा नो सेल फोन नो व्हिडिओ असा बोर्ड देखील लावण्यात आला आहे म्हणजे इथे मोबाईल घेऊन जाणे व्हिडिओ काढणे अलाऊड नाहीये.
काऊंटरवर तिकिट घेण्यासाठी आल्यावर पर्यटकांना आपले सर्व सामान जमा करावे लागते.
या पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी गेल्यावर १०८ म़ंदिरांना भेट देण्यासाठी आपल्याला सुमारे दोन तीन तास इतका कालावधी लागु शकतो.
यानंतर आपण फाऊंटन शो बघायला जाऊ शकतात फाऊंटन शो बघुन झाल्यावर आपण येथील छोटा गोल्ड स्टॅच्यु बघु शकतात.
Statue OF Equality हैदराबाद विमानतळापासून किती दुर आहे?
स्टॅच्यु ऑफ इक्वॅलिटी हे हैदराबाद विमानतळापासून 15 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. हे स्थळ हैदराबाद विमानतळ रोडाच्या पुढे आहे.
पर्यटन स्थळाला भेट देण्याची वेळ –
स्टॅच्यु ऑफ इक्वॅलिटी ह्या पर्यटन स्थळाला भेट देण्याची वेळ सोमवार ते शनिवार पर्यंत सकाळी सहा वाजेपासून साडे अकरा वाजेपर्यंत अशी आहे. आणि संध्याकाळी चार वाजेपासुन साडेपाच वाजेपर्यंत उघडे असते.
रविवारच्या दिवशी हे पर्यटन स्थळ पुर्ण दिवस चालु असते. रविवारच्या दिवशी ह्या पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी लोकांची खुप गर्दी असते.
भेट देण्यासारखी इतर जवळची पर्यटन स्थळ –
येथे भेट दिल्यानंतर आपण याच्या जवळील रामोजी फिल्म सिटी, नेहरू झू लॉजीकल पार्क, गोलकोंडा किल्ला, चारमिनार, मुरगवानी नॅशनल पार्क, हिमायत सागर लेक, नानाजीपुर धबधबा, दिव्या संकेतम, चिलकुर बालाजी मंदिर इत्यादी स्थळांना भेट देऊ शकतात.
तिकिटाची किंमत – स्टॅच्यु ऑफ इक्वॅलिटी ह्या पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी १५० रूपये इतकी तिकिटाची किंमत ठेवण्यात आली आहे.
स्वामी रामानुजाचार्य यांचे सामाजिक कार्य आणि योगदान
स्वामी रामानुजाचार्य हे आपल्या भारत देशातील एक महान संत होते ज्यांनी आस्था धर्म जात इत्यादी सर्व बाबतीत जगासमोर समानतेचा विचार मांडला होता.
स्वामी रामानुजाचार्य यांचा जन्म तामिळनाडू मधील श्रीपेरमबुतुर येथे एका तामिळ ब्राह्मण कुटुंबात झाला होता. १०१७ मध्ये रामानुजाचार्य यांचा जन्म झाला होता. त्यांच्या आईचे नाव कांतीमती अणि वडिलांचे नाव केशव असे होते.
स्वामी रामानुजाचार्य यांनी अद्वैत पंडितांच्या अधिन राहुन वेदांताचे शिक्षण प्राप्त केले. त्यांनी अद्वैत विचार धारेची व्याख्या केली. आणि मंदिरांना धर्माचे केंद्र बनवले.
ज्ञान प्राप्त केल्यानंतर रामानुजाचार्य यांना मंत्राची गोपनीयता ठेवण्यास सांगितले गेले. पण रामानुजाचार्य यांना जाणीव झाली की मोक्ष हा फक्त काही विशिष्ट लोकांपर्यंत मर्यादित नाही ठेवायला हवा.
म्हणुन पुरूष अणि महिला यांना समानतेने पवित्र मंत्र देण्यासाठी ते श्रीरंगममंदिर गोपुरम येथे गेले.
रामानुजाचार्य हे पहिले असे आचार्य होते ज्यांनी हे सिद्ध केले की सर्वशक्तिमान समोर आपण सर्व जण समान आहोत.
त्यांनी स्पृश्य अस्पृश्य उच्च नीच्च तसेच समाजातील अशा अनेक वाईट गोष्टींना काढुन फेकले. स्वामी रामानुजाचार्य यांनी सर्वांना देवाची आराधना पुजा करण्याचा समान अधिकार दिला.
स्वामी रामानुजाचार्य यांनी तथाकथित अस्पृश्य लोकांना तिरोकुलहार दिव्य जन्म असे म्हणत त्यांना मंदिरात घेऊन गेले. स्वामी रामानुजाचार्य यांनी भक्ती आंदोलनाचा विडा उचलला अणि तत्वज्ञानाचा पुरस्कार केला. हे अनेक भक्ती आंदोलनाचा आधार देखील बनले.
श्री रामानुजाचार्य यांनी लिहिलेले संस्कृत ग्रंथ
रामानुजाचार्य यांनी वेदांतसंग्रह, वेदांतसार, वेदांत दीपिका, श्रीभाष्य असे ग्रंथ लिहिले. ‘गीता भाष्य’ या पुस्तकात त्यांनी भक्तिमार्ग सांगितला आहे
स्वामी रामानुजाचार्य यांनी १२० वर्ष अथक परिश्रम करून हे सिदध केले की भगवान श्रीकृष्ण हे सर्व आत्माच्या कर्म बंधनातुन मुक्ती देणारे मुक्ती दाता आहेत.
वर्ष ११३६ मध्ये श्रीरंगम मध्ये स्वामी रामानुजाचार्य यांनी १२० वर्षाचे असताना आपल्या देहाचा त्याग केला. स्वामी रामानुजाचार्य यांनी केलेल्या ह्याच सर्व कार्याची आठवण ठेवत ह्या मुर्तींचे अनावरण करण्यात आले आहे.