Qualities to look for in your life partner
Posted in: जीवनशैली (Lifestyle)

होणार्या जोडीदारामध्ये पाहावेत हे गुण (10 Qualities to look for in a life partner)

Qualities to look for in a life partner : “माझे लग्न” असा विचार लग्नाळू तरुणीच्या मनात येतो किवा “तुझे लग्न करायचे आहे मुलगा पाहावा लागेल आता.” असं विषय घरात आपल्या लग्नाबद्दल निघतो तेव्हा काही मुली लाजतात, काही मुला बॉयफ्रेंड किवा प्रियकर असतो त्यांना धडकी भरते, भीती वाटते. काहीं मुलींच्या मनात लाडू फुटत असतील, आनंद होत असेल. टेन्शन ही येत असेल काही तरुण तरुणींना स्वाभाविकच आहे.त्यासाठीजोडीदारामध्ये पाहावेत हे गुण (Qualities to look for in your life partner)

जेव्हा पहिल्यांदा घरात ही चर्चा चालू होते आपल्या मनात एक आपल्या होणार्या जोडीदाराचे एक चित्र तयार होते. कि “कसा असावा माझा नवरा?” तुम्ही जोडीदारामध्ये पाहावेत हे गुण त्यावर अवलंबुन ही जोडीदाराची छबी असते. प्रत्येक माणूस वेगळा असतो. त्यानुसार प्रत्येकाच्या अपेक्षा वेगळ्या असतात. मुलींच्या बाबतीत तर आई वडिलांच्या पण अपेक्षांची एक वेगळी लिस्ट असते. आपल्या होणारा नवरा किवा जोडीदार मध्ये आपण कल्पना केलेले गुण आहेत हे जाणण्यासाठी आपण लग्नाआधी योग्य प्रश्न विचारून त्या मुलाबद्दल माहिती घेतली तर निर्णय घेण्यास सोपे नकीच जाईल .

त्यासाठी आपल्या जोडीदारामध्ये कोणते गुण पाहावेत. त्याच्याबद्दल या लेखात आपण चर्चा करूया. वाचा आणि कमेंट करा.

होणार्या जोडीदारामध्ये हे गुण पाहावेत (Qualities to look for in a life partner)

साधरणतः मुली आपली होणार्या नवर्यात पुढील गुण पाहतात

परिपक्वता (Maurity – Qualities to look in your life partner)

परिपक्वता म्हणजे जेव्हा आपण आपल्या कुटुंबियांची जबाबदारी घेतो. स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घेतो. आपली जबाबदार्या पार पडतो. विनाकरण रागीटपणा किवा चिडचिड करणे आपण बंद करतो. एखादा निर्णय घेताना आपण विचार करून निर्णय घेतो जेणेकरून कुणी नाराज होणार नाही किवा नुकसान होणार नाही. असे बरेच गुण परिपक्वता या शब्दाखाली येतात.

विश्वास (Trust)

नात्यामध्ये विश्वास असला तर आणते टिकेल. एखाद्याला कीव आख़ःआडीळा कळले कि आपला पार्टनर धोका देऊ शकतो तर ती व्यक्ती आपल्या पार्टनर किवा जोडीदारावर सुधा विश्वास ठेवयला पण विचार करतो. विश्वास नसेल तर नाते टिकत नाही. आणि विश्वास संपादन करावा लागतो. एखद्याला किवा एखादीला तुम्ही जबरदस्तीने विश्वास ठेवायला लाऊ शकत नाही. तो योग्य रीतीने संपादन करावा लागतो. हा बसला तर नाते उत्तरार्धापर्यंत टिकते. नाहीतर विश्वासाच्या अभावामुळे नाते तुटणारी नाती आपण आजूबाजूला पाहतोच.

प्रेमळपणा (Love and affection)

या ठिकाणी प्रत्येक लग्नाळू व्यक्तीने प्रेम म्हजे काय याचे व्याख्या समजून घेण्याची गरज पडते. प्रेम म्हणल कि ते दुसर्याने आपल्यावर कराव आपण फक्त जोडीदारावर अधिकार गाजवावा आणि गृहीत धरावं. तर ही प्रेमाची व्याख्या चुकीची आहे. प्रेमाचे दुसरे नाव आहे त्याग, साथ, मन जाणणे. प्रेम असेल तर नात्यांतील मजा आयुष्यभर कायम राहते.

Qualities to look in your life partner

विनोदबुद्धी (Sense of Humor)

प्रत्येक माणूस विनोदी असेल असे नाही.’व्यक्ती तितक्या प्रवृत्ती’ या उक्तीप्रमाणे प्रत्येक माणूस विनोद करील अस नाही. काही गंभीर, अंतर्मुख , शांत लोकही चांगले असतात. पण जर एकमेकांसोबत जेव्हा जास्त वेळ घालवतो तेव्हा आपल्या वर्तुळात आपण विनोद करायला शिकतो. विनोद कोणाला नाही आवडणार? काहीना ह दैवी देणगी असते. काही जन शिकतात.

भावना जाणून घेणे (Empathy)

ही फार महत्वाची कला आह ही सगळ्यांचा मध्ये असते अस नाही पण काही जण संयमी लोक ही कालांतराने आत्मसात करतात. काहीना कळतच नाही. इम्पाथी म्हणजे दुसर्याच्या मनात शिरून त्याच्या अंतरंगाचा ठाव घेणे. आणि हा ठाव जर दोघांनी घेतला तरच फायदा आहे नाहीतर त्याला अर्थ नाही म्हणून आपले मन स्वच्छ असावे आणि आपल्या जोडीदाराच्या मनात काय चालू आहे हे मैत्रीपूर्ण बोलण्याने जाणून घेतल्याने नाते अधिक सुधारते

हे पण वाचा : लग्नाआधी पहिल्या भेटीत मुलीला विचारावेत हे प्रश्न

(Qualities to look in your life partner)

आदर (Respect)

आदर हा मुद्दा सगळ्यांना माहितच आहे. बर्याच लोकांची इथ गफलत होते त्यांना थोडीसुद्धा चेष्टा केलेली जमत नाही. आणि चेष्टा मस्करी नसेल तर नाते खुलणार कसे. आणि आपण जी परिपक्वता बद्दल बोलत होतो ती कुठे गेली. आदर करावा याचा अर्थ तुम्ही दोघे सोडून जेव्हा तिसरे माणूस तिथे उपस्थित असेल तेव्हा आपल्या जोडीदाराचा मान ठेवून बोलावे. म्हणजे तिसरा माणूस पण तसेच करतो. नाहीतर तिसरा जो कोणी असेल घराचा बाहेरचा माणूस विचार करेल कि याचा नवरा किवा बायको अशी बोलते याची काय इज्जत आहे. त्यामुळे आपल्या माणसाला वाईट वाटेल अशा गोष्टी सोडून चेष्टा करावी ती पण आवडणार असेल तर. आणि परक्या लोकांसमोर एकमेकांचा आदर करावा.

प्रामाणिकपणा (Honesty)

नात्यामध्ये प्रामाणिकपणा फार महत्वाचा आहे. अर्थात सगळ्याच बाबतीत. आपण जोडीदाराशी प्रामाणिकम्हणजेच एकनिष्ठ असावे.म्हणजे लग्नानंतर आपल्या जोडीदाराच्या आयुष्यात आपल्याशिवाय दुसरा व्यक्ती असणार नाही हेच प्रत्येक लग्नाळू व्यक्तीला हवे असतो.

मनमोकळेपणा (Openness)

समोरच्या माणसाच्या भावना जाणून घेण्यासाठी मनाची कवाड उघडी ठेवावी लागतात. तेव्हाच आपण समोरच्या माणसाच्या भावना समजून घेउ शकतो. त्या भावना असण्यामागे आपल्या जोदिदारचे विचार काय आहेत ते समजून घेणे म्हणजे मनमोकळेपण.

समजूतदारपणा (Mutual Understanding)

समजूतदारपणा या शब्दाची प्रत्येकाची अथवा प्रत्येक मुलीची व्याख्या वेगळी येऊ शकते. समोरच्याने आपण म्हणेल ते ऐकणे किंवा आपली इच्छा पूर्ण करणे आपण म्हणतो ते बरोबर म्हणणे याला समजूतदार म्हणत नाही. तुमच्या चुकीच्या गोष्टी पोटात घालणे म्हणजे समजूतदारपणा नव्हे. शांतपणे संवाद साधून मनातील गोष्टीना वाट करून देणे आणि त्यामधील चुकीच्या गोष्टी दाखवून आपल्या वागणुकीत बदल करणे म्हणजे समजुतदारपणा. त्यासाठी वादमुक्त संभाषण खूप महत्वाचे आहे. जर वाद न होता संभाषण होत असेल तर एकमेकाला समजून घेणे अवघड नाही.

मैत्रीपूर्ण संभाषण (Friendly conversation)

जर तुमच्यापैकी कोणीही दुसऱ्या व्यक्तीशी मैत्रीपूर्ण संभाषण करू शकत नसेल तर ते नाते जास्त दिवस टिकत नाही. आपणही आपल्या जोडीदाराशी किंवा होणार्या जोडीदाराशी वाद न घालता संभाषण करू शकत असू तरच एकमेकाना समजून घेणे आणि भावना जाणून घेणे सोपे जाते. थोडक्यात सांगायचे झाले तर दोघांमध्ये मैत्री असावी. दोघांना एकमेकांसोबत वेळ घालवायला आवडले पाहिजे.एकमेकांसोबत बोलायला किवा गप्पा मारायला आवडले पाहिजे. त्यामुळे आपण जेव्हा जोडीदार निवडतो त्यावेळी आपले आणि त्या व्यक्तीचे मैत्रीपूर्ण संभाषण होते आहे का हे तपासावे.

Comment (1) on "होणार्या जोडीदारामध्ये पाहावेत हे गुण (10 Qualities to look for in a life partner)"

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to Top