आम्लपित्त-किंवा-Acidity-होण्याची-याची-9-कारणे
Posted in: आरोग्य टिप्स (Health tips)

पित्त का होते? किंवा Acidity होण्याची 9 कारणे (Acidity symptoms and reasons marathi)

आम्लपित्त-किंवा-Acidity-होण्याची-याची-9-कारणे

मित्रांनो तुम्ही अनेक वेळा पित्त (Acidity) झाल्यावर छातीत होणारी जळजळ अनुभवलेली असेल. तुम्हाला असा प्रश्न नक्कीच पडत असेल की आम्लपित्त का होते? काही लोकांना तर अस झाल्यावर घ्यायच्या गोळ्यांचे नाव पण पाठ आहेत. आणि काहीजणांना तर इतका त्रासही होत असेल की कधी होते माझी यातून सुटका?

काहिजणांचा असा गोड गैरसमज आहे की कांदेपोहे, मग ते किती का टेस्टी असोत, खाल्ले की मला ऍसिडिटी होणार. मग काही लोक स्वतःच्या कांद्यापोह्यांच्या कार्यक्रमात देखील कमी पोहे खातात. आणि कदाचित काही लोक तुम्ही असेही पाहिले असतील की त्यांना 3 वेळा कंटाळा येईपर्यंत पोहे दिले तरी खातील आणि ‘ऍसिडिटी झाली’ अशी तक्रार सुद्धा करणार नाहीत. आणि आपल्याकडे लोकांचे एक पित्त होण्याचे सामान्य कारण आहे अति चहा पिणे. आणि कोणतीही गोष्ट अति झाली की त्याचा दुष्परिणामच होतात.

हे ही वाचा: पित्त लक्षणे आणि पित्तावर घरगुती उपाय

जास्त चहा पिण्यावर तर आपण नियंत्रण ठेऊ शकतो. आम्लपित्तावर घरगुती उपाय पण खूप आहेत. पण तुम्ही कधी विचार केलाय का, काय कारणे असतील ऍसिडिटी किंवा पित्त होण्यामागे?

पित्त म्हणजे काय? What is acidity?

आम्लपित्त-किंवा-Acidity-होण्याची-याची-9-कारणे

तर चला आधी पाहूयात काय असते पित्त किंवा ऍसिडिटी.
आपण जे अन्न खातो ते अन्ननलिकेतून आपल्या पोटात जाते. आपल्या पोटातील गॅस्ट्रिक ग्रंथी पाचक आम्ल तयार करतात, जे अन्न पचविण्यासाठी आवश्यक असते. जेव्हा गॅस्ट्रिक ग्रंथी पाचन प्रक्रियेसाठी आवश्यकतेपेक्षा जास्त आम्ल तयार करतात तेव्हा आपल्या छातीत जळजळ जाणवते. या स्थितीस सामान्यत: पित्त होणे किंवा ऍसिडिटी असे म्हणतात.

आम्लपित्त कसे होते किंवा वाढते


जठरातील ग्रंथींद्वारे पोटात पाचक रसाचे जास्त उत्पादन झाल्यामुळे ऍसिडिटी होतो. खाली दिलेले घटक ऍसिडिटी होण्यास कारणीभूत आहेत:

खाण्याच्या काही चुकीच्या सवयीमुळे होणारे आम्लपित्त

अनियमित वेळी जेवण वगळणे किंवा खाणे
आपल्या जेवणाच्या वेळा निश्चित हव्यात. उदाहरणार्थ, समज तुम्ही सकाळचा नाश्ता किंवा जेवण सकाळी 9 वाजता, दुपारचे जेवण 1 वाजता, आणि रात्रीचे जेवण रात्री 8 वाजता घेता. आणि याचबरोबर तुमच्या पोट साफ होण्याच्या वेळाही निश्चि असतील आणि नियमितपणे तुम्ही जेवणासाठी याच वेळा पाळत असाल तर तुम्हाला ऍसिडिटी होण्याची शक्यता कमी असते

जेवण झाल्यानंतर लगेच झोपणे

आपल्यापैकी अनेक लोकांना किंवा रात्रीचे जेवण झाल्या झाल्या झोपायला जायची सवय असते. किंवा असेही होते की समजा रविवारी आपल्याला सुट्टी आहे आणि मग आपण दुपारी मस्त जेवण करतो आणि लगेच सुट्टीचा फायदा घेण्यासाठी ताणून देतो. नेमके हेच कारणीभूत ठरते ऍसिडिटी होण्यासाठी. दुपारी झोपुच नये असे तर मी म्हणत नाही. तर काय करावे जेवण झाल्यानंतर किमान 1 तास झोपू नये. काय होतं झोपेत असताना जठर जास्त प्रमाणात पाचक रस तयार करते. पण आपण तेवढया प्रमाणात जेवण घेतलेले नसते. मग हा जास्तीचा पाचक रस आपल्या छातीत दाह निर्माण करतो. त्यामुळे जेवल्यानंतर लगेच झोपणे टाळावे आणि एक तासानंतर झोपावे.

जास्त किंवा कमी खाणे


आपल्या जेवणाचे प्रमाण पण ऍसिडिटी होण्यासाठी कारणीभूत असते. आपल्या शरीराला रोज आपल्या जेवणाच्या प्रमाणात पाचक रस तयार करण्याची सवय असते. समजा आपण काही कारणामुळे नेहमीपेक्षा कमी जेवलो पण शरीर तर तेवढाच पाचक रस तयार करेल. आणि समजा आपण जास्त जेवलो तर पाचक रस कमी पडेल. त्यामुळे पोट खराब होण्याची शक्यता असते.

मसालेदार अन्नाचे सेवनामुळे आम्लपित्त वाढते

काहीजणांना जास्त मसाले किंवा तिखट घातलेल्या भाज्या आवडतात. पण त्यामुळे ऍसिड तर वाढतेच शरीराची उष्णता पण वाढू शकते.

आहारातील फायबरचा (तंतूमय पदार्थ) कमी समावेश

तंतुमय पदार्थ म्हणजे रोजच्या आहारातील एक अविभाज्य घटक. याच्याशिवाय पचनक्रिया सुरळीत चालू शकत नाही. तंतुमय पदार्थ आपल्याला बऱ्याच अन्नघटकांपासून मिळतात. विविध प्रकारची धान्ये व त्यांचा कोंडा, कडधान्ये किंवा मोड आलेली कडधान्ये, सर्व प्रकारच्या भाज्या विशेषत: हिरव्या पालेभाज्या इत्यादी. हे पदार्थ आहारात असल्यास पोट भरल्याची जाणीव लवकर होते त्यामुळे जास्त अन्न खाल्ले जात नाही. आणि हीच पोट भरल्याची जाणीव ही योग्य प्रमाणात पाचक रस निर्माण करण्यात कारणीभुत ठरते.

विशिष्ट अन्नाचा जास्त प्रमाणात वापर

चहा, कॉफी, कार्बोनेटेड पेये, सॉफ्ट ड्रिंक्स सारखी पेये
यांचे जास्त सेवन आणि पिझ्झा, डोनट्स आणि तळलेले पदार्थ यासारखे फॅट म्हणजे चरबी जास्त असणारे पदार्थ यामुळेही शरीरातील ऍसिड वाढते.

जेवताना किंवा खाताना अति घाई करणे

भरभर जेवल्याने आपल्या तोंडात लाळ टायर होण्याची प्रक्रिया मंदावते. आणि ही लाळ ऍसिडिटी कमी करणारा मुख्य घटक आहे. आणि जेवताना घाई केल्याने ते अन्न नीट चावले जात नाही पोटाचे प्रॉब्लेम वाढतात आणि त्यामुळे ऍसिडिटी वाढते.

तर मित्रानो वर दिलेले नियम आपण आपल्या रोजच्या जीवनात पाळले तर ऍसिडिटी मुळे होणारा त्रास आपण टाळू शकतो. आणि आपली lifestyle अजून फिट बनवू शकतो. तर या सवयी आपल्या रुटीन मध्ये जरुर लावा. पुढच्या पोस्ट मध्ये पाहूया पित्त झाल्यानंतर गोळ्या घेण्या ऐवजी काय उपाय करावेत. धन्यवाद!

Comment (1) on "पित्त का होते? किंवा Acidity होण्याची 9 कारणे (Acidity symptoms and reasons marathi)"

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to Top