दिवाळी 2022 मध्ये ओला इलेक्ट्रिकने Ola S1 Air लॉन्च केली आहे. आपण ओला S1 आणि ओला S1 प्रो या दोन ओला इलेक्ट्रिक च्या स्कूटर पहिल्या. आज त्या रस्त्यावर दिसत आहेत. वापरणारे लोक त्याबद्दल ओला स्कूटर्स रिव्हिवस दिले आहेत. ओला इलेक्ट्रिक या कंपनी बद्दल सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या कंपनीची सेवा इतर इलेक्ट्रिक स्कूटर कंपनी पेक्षा तत्पर आहे आणि वेळेवर आहे असे ऐकण्यात मिळत आहे.
आता नवीन एक स्वस्त किंमत असलेले ओला स्कूटर ओला इलेक्ट्रिक ने लॉन्च केली आहे. ती आहे ओला S1 एअर. या स्कूटर ची किंमत कमी आहे आणि सगळे फीचर्स जे ओला S1 प्रो मध्ये आहेत ते Ola S1 Air मध्ये पण आहेत. फक्त किंमत कमी केल्यामुळे रेंज मध्ये फरक आहे. म्हणजे शहरातल्या शहरात फिरण्यासाठी ही गाडी उत्तम आणि स्वस्त पर्याय ठरणार आहे. चला तर पाहूया या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये काय फीचर्स आणि स्पेक्स आहेत.
ओला S1 एअर किंमत (Ola S1 air price)जसे आपण आधीच वाचले आहे की ही ओला इलेक्ट्रिक ची आतापर्यंतच्या ओला स्कूटर पैकी स्वस्त किमतीतील स्कूटर असणार आहे. त्यामुळे या इलेक्ट्रिक स्कूटर ची सुरुवातीची किंमत (Intro price) 85000 रुपये ठेवली आहे. तसेच प्री बुकिंग करून रिझर्व्ह करून ठेवता येणार आहे. 999 रुपये मध्ये Pre book करता येणार आहे.
ओला S1 एअर वैशिष्टे आणि Ola S1 Air features and specifications
ओला S1 एअर टॉप स्पीड
जसे ओला S1 प्रो मध्ये चार मोड आहेत तसेच ओला S1 एअर मध्ये तीन मोड आहेत. किंमत कमी करण्यासाठी बॅटरीचा आकार कमी करून तीन मोड मधे S1 एअर ही स्वस्तातली इलेक्ट्रिक स्कूटर ओला इलेक्ट्रिक ने आणली आहे.
खरी रेंज Ola S1 Air True Range आहे
Ola S1 Air ची True Range आहे 101 किलोमीटर. ही रेंज इको मोड मधे मिळते. इको मोड म्हणजे शून्य ते चाळीस ताशी किलोमीटर स्पीड चा आहे. ओला स्कूटर च्या इको मोड हा ट्रॅफिक असलेल्या रस्त्यांवर कामाला येतो. पण रस्ते चांगले असतील तर सामान्यतः आपण 40 kmph च्या स्पीड ने आरामात गाडी चालवतो. त्यामुळे नॉर्मल मोड जास्त वापरला जातो. नॉर्मल मध्ये 0 ते 60 km/hr ची स्पीड मिळते. आणि स्पीड वाढल्यामुळे रेंज 76 पर्यंत मिळते. 76 किलोमीटर ही शहरातल्या शहरात स्कूटर वर फिरण्यासाठी योग्य आहे. जास्त लांब जाण्यास वापरण्यासाठी Ola S1 Air ही स्कूटर नाही. पण गावातल्या गावात वापर करण्यासाठी योग्य आहे असे म्हणता येईल.
Ola S1 Air ड्रायव्हिंग मोड्स (Ola S1 Air driving modes)
या स्कूटर मध्ये तीन मोड दिलेले आहेत. ते म्हणजे इको मोड, नॉर्मल मोड आणि स्पोर्ट मोड. इको मोड मधे 0 ते 40 km/hr स्पीड पर्यंत चालवू शकतो. नॉर्मल मोड मध्ये 60 km/hr आणि स्पोर्ट मोड मधे 85 km/hr स्पीड मिळते. ही स्पीड आपल्याला शहरातल्या शहरात इलेक्ट्रिक स्कूटर वापरण्यासाठी पुरेशी आहे. तरीही असे म्हणता येईल की हे प्रत्येकाच्या स्कूटर वापरण्यावर अवलंबून आहे.
इलेक्ट्रिक बाईक बद्दल हेही वाचा – इलेक्ट्रिक बाईक आणि स्कूटर बद्दल माहिती असायला हव्यात या सर्व गोष्टी
बॅटरी आणि चार्जिंग साठी लागणारा वेळ (Ola S1 Air Battery and charging time)
या इलेक्ट्रिक स्कूटरला फुल चार्जिंग साठी 4.5 तास लागतात. म्हणजे 0 ते 100% पर्यंत चार्जिंग साठी लागणारा हा वेळ आहे. जर तुम्ही 50% बॅटरी वापरली असेल तर यापेक्षा अर्धा वेळ लागेल.
या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये 2.5 किलोवॉट तास (Kwh) कपॅसिटी ची बॅटरी आहे.
ओला इलेक्ट्रिक स्कूटर्स साठी Ola electric देत असलेल्या सुविधा (facilities being provided by Ola electric for Ola scooter owners)
तुम्हाला जर ओला स्कूटर घ्यायची असेल तर त्या आधी टेस्ट राईड घेता येते. ओला इलेक्ट्रिक क्या वेबसाईटवर ही टेस्ट राईड बुक करता येते. मग कंपनीचा अधिकारी तुमच्या पत्त्यावर येऊन तुम्हाला स्कूटर बद्दल माहिती देतो आणि टेस्ट राईड करता येते.
ओला इलेक्ट्रिक स्कूटर गाडी घेताना इन्शुरन्स पण काढता येतो किंवा तुम्ही स्वतःचा वेगळा पण काढू शकता.
ओला इलेक्ट्रिक स्कूटर सोबत रोड साईड असिस्टांस पण देतात. म्हणजे जर काही प्रॉब्लेम झाला किंवा स्कूटर चार्जिंग संपून बंद पडली. तर तुम्ही सपोर्ट ला कॉल करून असिस्टँस मागवू शकता. मग कंपनीचे लोक येऊन तुम्हाला चार्जिंग करून देतील किंवा तुमची स्कूटर रिपेअर करून देतील.
दोन हेल्मेट ओला स्कूटर बरोबर आता कम्पल्सरी आहेत. ते स्कूटर डिलिवरी क्या वेळी मिळतात. आणि स्कूटर मध्ये एक छोटी प्रथमोपचार पेटी (First Aid kit) आणि टूलकिट मिळते.
ओला स्कूटर स्टोरेज किंवा बुट स्पेस (Ola electric scooter boot space)
सगळ्या ओला स्कूटर मध्ये बुट स्पेस किंवा सीट खाली सामान ठेवण्याची जागा किंवा डिक्की आपण मराठीत म्हणतो ती इतर स्कूटर पेक्षा खूप मोठी दिलेली आहे. म्हणजे सीट खालील जशी इतर स्कूटर मध्ये अर्धी जागा असते. तीच ओला स्कूटर मध्ये पूर्ण रिकामी आहे. ओला एस वन एअर मध्ये ही 34 लिटर आहे. ओला एस वन आणि ओला एस वन प्रो मध्ये 36 लिटर आहे. हा या स्कूटरचा खूप मोठा फायदा आहे.
ओला S1 एअर – ब्रेक आणि सस्पेन्शशन(Ola S1 Air brajes and suspension)
यामध्ये पुढच्या बाजूला ट्वीन फोर्क सस्पेंशन आहे आणि मागील बाजूला डबल शॉक अप आहेत. पुढच्या आणि मागच्या दोन्ही बाजूला ड्रम ब्रेक दिले आहेत.
ओला एस वन एअर कुणी घ्यावी?
आपण जर या स्कूटर ला ओलाच्या इतर स्कूटर सोबत तुलना केली तर दिसून येते की यामधे बऱ्याच गोष्टी कमी केल्या आहेत. डिझाईन वेगळे आहे. आणि बॅटरी आणि मोटर कपॅसिटी कमी करून किंमत कमी केली आहे. पण तरीही ही इलेक्ट्रिक स्कूटर मार्केट मधल्या स्कूटर का तोड देत आहे. किंमत कमी असल्यामुळे जास्त खर्च पण होणार नाही.
महत्वाची अजून एक गोष्ट म्हणजे रेंज आणि स्पीड कमी आहे. पण सामान वाहण्यासाठी जागा भरपूर आहे. रेंज कमी असल्यामुळे दूर नेता येणार नाही. घराच्या जवळ किंवा आपल्या स्वतःच्या चार्जिंग पॉइंट जवळ 20-30 किलोमीटर च्या सर्कल मध्ये वापरण्यास योग्य स्कूटर आहे.