Ola s1 pro
Posted in: आरोग्य टिप्स (Health tips), जीवनशैली (Lifestyle), समीक्षण (Reviews)

15 ऑगस्ट, ओला इलेक्ट्रिक स्कूटर ने केली Ola S1 Pro स्कूटर लाँच, वाचा सर्व वैशिष्टे (15 Aug Ola Electric launches Ola S1 Pro, read all specifications)

आज 75व्या स्वातंत्र्य दिना दिवशी ओला इलेक्ट्रिक ने ही Ola S1 Pro नवीन स्कूटर लॉन्च केली आहे. या लाँच मध्ये फक्त 1947 युनिट्स म्हणजे स्कूटर विक्रीस काढल्या आहेत. शहरातील रस्त्यांवर ओलाच्या Ola S1 या इलेक्ट्रिक स्कूटर फिरताना दिसत आहेत. याचा अर्थ लोक इलेक्ट्रिक स्कूटर पसंत करत आहेत आणि त्या सर्रास वापरतही आहेत. पण सध्या फक्त हे चित्र शहरातील नसून इतर भागातही तुरळक प्रमाणात लोक इलेक्ट्रिक बाईक आणि स्कूटर वापरण्यास सुरुवात करीत आहेत.

ओला इलेक्ट्रिक ने 15 ऑगस्ट 2022 पासून या नवीन Ola S1 Pro स्कूटरची बुकिंग घ्यायला सुरुवात केली आहे. या ओला इलेक्ट्रिक स्कूटर बुकिंग प्राईस फक्त 499 रुपये आहे. ही बुकिंग विंडो 15 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट पर्यंत सुरू राहणार आहे. कदाचित सर्व 1947 युनिट्स त्याआधीच बुक होण्याची शक्यता आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर One of the best electric scooter of India मानली जात आहे.

ओला S1 प्रो ची सर्व माहिती (Ola S1 Pro Specifications )

Ola S1 Pro टॉप स्पीड (Ola S1 Pro)

Ola S1 Pro मध्ये तीन ड्रायव्हिंग मोड आहेत. इको, नॉर्मल आणि रेसिंग मोड किंवा टॉप स्पीड मोड. इको मोड मध्ये 0 ते 40 km/hr स्पीड मिळते. नॉर्मल मोड मध्ये 40 ते 80 km/hr आणि टॉप स्पीड मोड मधे 80 ते 116 किमी प्रती तास हो स्पीड मिळते.

Ola S1 Pro True Range आहे 170 किलोमीटर. म्हणजे ही स्कूटर एका चार्ज मध्ये 170 किलोमीटर जाऊ शकते. एक सरासरी 70 किलो वजन असलेली व्यक्ती नॉर्मल मोड वरती 170 किलोमीटर अंतर प्रवास करू शकते. पण एक महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की 170 ही रेंज एको मोड मध्य मिळते. पण आपण साधारणतः नॉर्मल मोड मधे चालवतो. नॉर्मल मोड मधे 135 किलोमीटर रेंज मिळते.

क्रुझ कंट्रोल (Cruise control)

क्रुझ कंट्रोल म्हणजे एक बटन दिलेले आहे ते दाबलेले असताना आपण ठरवलेल्या स्पीड मधे किंवा मोड मधे स्कूटर चालत राहते. ही स्कूटर सगळ्या प्रकारच्या रोड वर चालण्यासाठी डिझाईन केली गेलेली आहे. याबरोबरच हील होल्ड हे फीचर पण समाविष्ट आहे.

रिव्हर्स मोड (Ola S1 Pro reverse mode)

या स्कूटर ला कार प्रमाणे रिव्हर्स म्हणजे मागे घेता येण्याची तजवीज केलेली आहे. जेव्हा बाईक मागे घेताना चढ असतो किंवा एखादा उंचवटा असतो तेव्हा जास्तीचा जोर लावावा लागल्याचे आपण सर्वांनी अनुभवले असेलच. ती समस्या Ola S1 Pro मधे नाही येणार. हे फीचर नवीन आहे.

ब्रेक आणि सस्पेशन

डिस्क ब्रेक आणि मागच्या चाकाला मोनो सस्पेंशन दिलेले. त्यामुळे स्कूटर थांबवणे आणि ओबडधोबड रस्त्यावर चांगल्या प्रकारे चालण्याची व्यवस्था स्कूटर मध्ये आहे. यामधे 12 इंचाचे आलोय व्हील आहेत.

डिजिटल फीचर्स

Ola S1 Pro मध्ये असलेले आपल्या सर्वांसाठी नवीन आणि जबरदस्त फीचर म्हणजे मुझिक (Ola Music on the go). हो आपण गाडी चालत असताना आपल्या आवडीचे गाणे ऐकू शकतो. आहे की नाही भारी.

दुसरे म्हणजे ओला स्कूटर चा ड‌‍ॅशबोर्ड डिजिटल आहे. त्यामधे नेवीगेशन सुविधा दिलेली आहे. आधी आपल्याला गाडी चालू असताना मॅप पाहण्यासाठी साईड का थांबावे लागत होते पण Ola S1 Pro बरोबर आपण मॅप डायरेक्ट डॅशबोर्ड वर नजर टाकून रस्ता पाहू शकतो. ट्रॅफिक बद्दल माहिती पण त्यात मिळेल. यात व्हॉईस असिस्टांस हे फीचर पण आहे.

Ola s1 pro display 7 inch

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गाडी लॉक अनलॉक कशी होते. ओला इलेक्ट्रिक ने यात नवीन शक्कल काढली आहे. त्यांनी यासोबत चावी रिमोट किंवा असले काहीही न देता सरळ आपल्या फोन मधे अक्सेस दिला आहे. जो त्या स्कूटरचा आपल्या कुटुंबियांना आणि मित्रांना ॲप द्वारे देऊ शकतो. म्हणजे गाडी अनलॉक करण्यासाठी चावीची किंवा रीमोटची गरज नाही.

एक महत्वाची गोष्ट म्हणजे या सर्व डिजिटल फीचर्स ला जे इंटरनेट लागेल ते आपण आपल्या स्मार्टफोन द्वारेच देऊ शकतो. Ola S1 Pro Electric Scooter दहा रंगांमध्ये उपलब्ध आहे.

हे ही वाचा: इलेक्ट्रिक बाईक आणि इलेक्ट्रिक स्कूटर बद्दल पडणारे प्रश्न आणि उत्तरे

मोटर पॉवर आणि टॉर्क (Ola S1 Pro motor power and torque details)

Ola S1 Pro मोटर ची पीक पॉवर 8.5 Kw आहे. आणि जास्तीत जास्त टोर्क 58 Nm आहे. जो टेकडी किंवा घाट असलेल्या भागात चढाई करण्यास पुरेसा आहे.

बॅटरी आणि चार्जर (Ola S1 Pro battery capacity and charging)

या स्कूटर मध्ये 3.97 Kw/h ची बॅटरी आहे. आणि सोबत चार्जिंग साठी 750W चे चार्जर आहे. ही बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी 6 तास लागतात.

Ola S1 Pro किंमत (Ola S1 Pro on road price)

Ola S1 Pro ची किंमत एक लाख बेचाळीस हजार (१,४२,००० )च्या जवळपास जाते. ओला इलेक्ट्रिक ने EMI फायनान्स चा पर्याय पण उपलब्ध करून दिलेला आहे. ज्यामधे सगळ्या बँकमार्फत EMI 12% दराने करून दिले जाते. तीन इन्सुरन्स पर्याय पण ओळ इलेक्ट्रिक कंपनीने दिले आहेत. अर्थात आपण आपल्या मर्जीप्रमाणे स्वताचा इन्शुरन्स पण निवडू शकतो.

Ola S1 Pro colors available

OLA S1 Pro मध्ये दहा उपलब्ध असलेले कलर्स आहेत. पांढरा, हिरवा(खाकी), आकाशी, पिवळा गुलाबी, मॅट काळा, गडद काळा, चकचकीत लाल, गुलाबी, सिल्वर, निळा.

Comment (1) on "15 ऑगस्ट, ओला इलेक्ट्रिक स्कूटर ने केली Ola S1 Pro स्कूटर लाँच, वाचा सर्व वैशिष्टे (15 Aug Ola Electric launches Ola S1 Pro, read all specifications)"

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to Top
How to cure acidity at home? 5 acidity remedies at home…. Top protein rich veg foods must have at home Moringa powder powerful health benefits for males and females How breakfast habits linked to Mental health? प्रधानमंत्री आवास योजना शहरी (PMAY-U)