भयकथा-लेखक-नारायण-धारप-books-narayan-dharap
Posted in: जीवनशैली (Lifestyle)

भयकथा लेखक नारायण धारप यांच्या नक्की वाचाव्यात अशा मराठी कादंबरी यादी – Horror stories writer Narayan Dharap books must read -1

मित्रांनो ज्यांना नारायण धारप (Narayan Dharap books) हे नाव माहीत असेल त्यांना याबद्दल जास्त काही सांगायची गरज नाही. पण सगळयांनि ‘तुंबाड’ हा चित्रपट पाहिला असेलच. एक ‘Best Horror Movie’ म्हणून ओळखला जातो तो हाच तुंबाड चित्रपट. बरेच लोक बॉलीवूड आणि हॉलीवूड मधील Horror Movies पाहण्यात धन्यता मानत असतील. जसे की Annabelle, The conjuring, Mama, Paranormal activity इत्यादी. ज्यांना आशा भयपटांची आवड आहे तेच या गोष्टींचा नादी लागतात. पण जे नादी लागलेत त्यांना असच काहीतरी गूढकथा, रहस्यमय कथा, काळजाचा ठाव घेणाऱ्या गोष्टी पाहायला आणि त्यातून मनोरंजन करायला आवडतात.

भयकथा-लेखक-नारायण-धारप-पुस्तक-best-narayan-dharap-books

नारायण धारप यांची मराठी कादंबरी पुस्तके (Narayan Dharap books online)

आणि आता ज्यांना नारायण धारप हे नाव माहिती नाही त्यांच्यासाठी. जर तुम्ही भयकथा, रहस्यकथा, गूढकथा, Suspense – Thriller movies किंवा कथा प्रेमी असाल आणि तुम्ही अजून नारायण धारप यांचे साहित्य किंवा पुस्तके वाचली नसतील तर तुम्ही खूप मोठे या सगळ्या गोष्टी असलेले साहित्याला मुकत आहेत असं मी म्हणेल.

मी पण आधी भयकथा शोधयचो वाचायला. पण एक लिमिट च्या वर त्यात काही नसायचं. चित्रपटामध्ये तर बऱ्याच गोष्टी कॉमेडी वाटायच्या. काही गोष्टी त्यात बळंच घुसवून कथा लांबवली आहे असं वाटायचं. हॉलिवूड मध्येही तेच. आणि या गोष्टींबद्दल कुतुहलवतर सगळ्यांना असत. मग मी काही भयकथा साहित्य शोधू लागलो. कारण ते वाचताना मजा यायची. पण ते फार कमी होते.

तुंबाड हा चित्रपट तर तुम्ही पहिलाच असेल. यातील भयानक आजीची गोष्ट ही नारायण धारप ‘अनोळखी दिशा भाग ३’ या कथासंग्रहातील एक ‘आजी’ नावाची कथा आहे. तो वाडा, ती नायकाची आई, त्याचा भाऊ, आणि ‘झोप नाहीतर हस्तर येईल’ हा डायलॉग इथपर्यंत अगदी सेम कथा आहे. फक्त नंतर जो खजिना आणि हस्तर चा भाग वेगळ्या कथेतील आहे.

नारायण धारप (Narayan Dharap) यांच्याबद्दल

मी जेव्हा पहिल्यांदा नारायण धारप यांची चेटकीण ही कादंबरी वाचली आणि थक्क झालो. मी विचार केला आपल्या मराठी साहित्य अशा उत्कृष्ट लेखनाने भरलेले असताना आपण हॉलिवूड गोडवे गातो. मग नंतर नारायण धारप यांची पुस्तके वाचण्याचा सपाटाच लावला. जे जे मिळतील ते वाचले. काही तर हुडकून काढून वाचले. मग कळले या सगळ्या इतक्या उत्कृष्ट कादंबरी आहेत की यावर एक एक चित्रपट काढला तर हॉलिवूडचे हॉरर पट यासमोर फिके पडतील. नारायण धारप पुस्तके मराठीतील सर्वोत्तम मराठी हॉरर स्टोरीस आहेत असं मी म्हणेल.

मराठी लेखन किंवा मराठी पुस्तके असूनही आणि भयकथा असूनही यात वैज्ञानिक गोष्टींचे संदर्भ दिले आहेत. त्यामुळे अस वाटतच नाही की ही कथा काल्पनिक आहे. आणि जवळपास सर्वच नारायण धारपांच्या कादंबऱ्या आणि त्यांचे भयकथा संग्रह वाचकाला ती प्रतिकृती पूर्ण वाचण्यास प्रवृत्त करतात.

त्यामुळे मी खाली काही ‘नारायण धारप पुस्तक’ या सदरात मराठी पुस्तकांचा रिविव्ह (Marathi Books review) देत आहे. काळजी करू नका मी अजिबात सस्पेन्स फोडणार नाही. मराठी पुस्तकांची नावे आणि फक्त इन्ट्रो देत आहे कथेचा.

1. चेटकीण

नाव जरी चेटकीण असलं तरी कोकणात घडलेली आणि आजच्या टेक सॅव्ही तरुणांनाही आवडेल अशी कथा आहे. लेखक जुने आहेत कथा जुनी आहे पण अस वाटत की आजच्याच काळातील कधीतरी घडलेली कथा आहे.

कथेची नायिका सोनाली या परदेश रिटर्न पुण्यातील तरुणीच्या आयुष्यातील परदेशातून पुण्यात आणि मग त्यांच्या गावी कोकणातील श्रीवर्धन जवळ समुद्रकिनारी असलेल्या सोनालीच्या आजीच्या वाडीत कथा चालू होते. जिथं सोनालीला तिच्या आजीने कधीच येऊ दिलेले नसते. पण ती म्हणजे आजी गेल्यावर तिला तिथं घेऊन यायला सांगितलेलं असतं. ते का सांगितलं? अस काय होत त्यांच्या समुद्र किनाऱ्यावरील वाडीत. काय गोष्टी घडल्या होत्या की परदेशी राहणाऱ्या तरुणीला आजीने इथे येण्यास आधी प्रतिबंध केला पण नंतर घेऊन यायला सांगितलं.

असे बरेच प्रश्न वाचताना पडतील आणि जसे कथानक पूढे जाईल तशी उत्तरेही मिळत जातील. पुस्तक थोडं जरी वाचलं तरी पूर्ण केल्याशिवाय सोडावे वाटणार नाही. ही नारायण धारपांची कादंबरी माझी सर्वात आवडती आहे. मी 3-4 वेळा वाचली आहे.
कारण यातील चेटकीण ही संकल्पनाच वेगळी आहे. हे तुम्हाला पूर्ण वाचल्यानंतर कळेल. कथेचं नाव जरी चेटकीण असलं तरी पांढरी साडीवाली बाई आणि तिचा घाणेरडा चेहरा असलं काही नाही त्यामुळे वाचायला नक्किच मजा येते.

2. शोध – एक भयावह कादंबरी

अशीच एक दुसरी कथा. जेव्हा जेव्हा या पृथ्वीतलावर वाईट शक्ती जन्म घेतात तेव्हा विधाता त्या शक्तींपासून निष्पाप लोकांना वाचवण्यासाठी काहितरी सोय करून ठेवत असतो. असाच या कथेतील नायक बळवंत चाफेकर याला ‘शोध’ घेण्यास प्रवृत्त करणारी ही वाईट शक्ती.

काही अशा घटना बळवंताच्या आयुष्यात घडतात की ज्यामुळे एक अघोरी शक्ती जन्म घेते आणि बाळवंताला घाबरून असते. असे का याचा शोध घेत असताना ही अघोरी शक्ती बळवंताला जे लोक मदत करतात त्यांचा जीव घेते. मग बळवंतमध्ये असे काय असते की त्याच्या जीवाला ही शक्ती काहीच इजा करू शकत नाही. याचा शोध घेणारा बळवंत त्या शक्तीचा नायनाट कसा करतो हे जाणून घेण्यासाठी नक्कीच वाचायला हवी अशी ही कथा.

3. कुलवृत्तांत

एक सामान्य नोकरदार माणूस. ज्याच्या नौकरिवर त्याच्या कुटुंबाचा भार आहे आणि त्याच्या कुटुंबाचे दुसरे कुठलेच उदरनिर्वाहाचे साधन नसताना त्याच्या डोक्यात नौकरी सोडून स्वतःच्या कुळाचा ‘कुलवृत्तांत’ लिहिण्याचे खूळ कसे घुसते आणि का घुसते. आणि या कुलवृत्तांत च्या वाटेवर आशा काही रहस्यमय आणि भयावह गोष्टी घडतात. की ज्यामुळे असे वाटते की हा कुलवृत्तांत लिहिण्याचे खूळ नसून एक दैवी योजना आहे आणि त्या वाटेवर बऱ्याच निष्पाप लोकांचे जीवनाचे रक्षण आहे. या मार्गावर चालताना कोणत्या वाईट शक्तींशी सामना होतो आणि त्यांच्याशी लढण्यासाठी या सामन्य माणसाला शक्ती कशी प्राप्त होते. याबद्दल ही कादंबरी आहे.

हे ही वाचा : लग्नाआधी मुलीला विचारावेत हे प्रश्न

4. लुचाई (मराठी ड्रॅकुला हॉरर कांदबरी)

मराठी वॅम्पायर कथा. जयदेव हा तरुण लेखक त्याच्या बायको मुलाचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर त्याच बालपण गेलेल्या गावी हवापालटसाठी दुर्गापूरला येतो. खरतर त्यालाही कळलेलं नसत की त्याची पावलं दुर्गापूरकडे का वळली आहेत. आणि नाईकांची हवेली एक त्या गावात असते. लेखक असल्यामुळे नाईक पतीपत्नीचा झालेले रहस्यमय मृत्यु आणि त्यांच विचित्र राहणीमान याबद्दल कुतूहल जागृत होत. आणि गावात एक एक रहस्यमय मृत्यूची रांग चालू झालेली असते. आणि प्रत्येकाच्या गळ्यावर दोन सुळ्या दातांचा व्रण असतो. जयदेव त्यांचा मित्र रामदास आणि गावातील लहान व समजूतदार मुलगा एकनाथ हे या वाम्पायर संकटला कसं तोंड देतात आणि त्यांना कोणत्या दिव्यातून जावे लागते त्याबद्दल ही कथा आहे.

5. अनोळखी दिशा भाग 1, 2 , 3

हे नारायण धारपांच्या कथासंग्रहाचे तीन भाग आहेत. कथा लहान लहान आहेत. पण एक एक मास्टरपीस आहे. नाहीतर तुंबाड या चित्रपटात यातील कथा का घेतली असती? नक्की वाचावेत असे नारायण धारपांचे कथासंग्रह आहेत.

मित्रानो पूढील पोस्ट मध्ये नारायण धारपांच्या अजून काही अफलातून पुस्तकांची चर्चा करूया. धन्यवाद.

Comments (3) on "भयकथा लेखक नारायण धारप यांच्या नक्की वाचाव्यात अशा मराठी कादंबरी यादी – Horror stories writer Narayan Dharap books must read -1"

  1. धारपांचे काळ्या कपारी, ईक्माई , माटी कहे कुम्हारको हे कथासंग्रह आवर्जून वाचा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to Top