नवरी साठी उखाणे, मुलींसाठी उखाणे, सौभाग्यवतीसाठी मराठी उखाणे
लग्नात नाव घेण्यासाठी मराठी उखाणे
मंगल माते मंगल देवी वंदिते मी तुला _______ रावांना आयुष्य घालून सौभाग्य दे मला
हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशि _______ रावांचं नाव घेते हळदी-कुंकवाच्या दिवशी
मनी मंगळसूत्र सौभाग्याची खून _______ रावांचं नाव घेते _______च्या कुटुंबाची सून
जय जवान जय किसान कर्ज तो सारा देश _______रावांच्या जीवा करता घातला सौभाग्याच्या वेश
वडिलांचा आशीर्वाद मातेची माया _______ रावांची पती मिळाले ही ईश्वराची दया
दत्तात्रय शोभे गाय, महादेवाला शोभे नंदी_______ रावांच्या जीवनावर मी आनंदी
माहेरच्या ओढीने डोळे भरून _______ रावांच्या संसारात मन घेते वळून
राम लक्ष्मण हनुमान तात्यांचा दास_______रावांच नाव घेते तुमच्यासाठी खास
सागराच्या हृदयी अंतरंग लपले_______ रावांसाठी जीवन सर्वस्व अर्पिले
पानाच्या अंड्यावर फुलांचे झाकण_______रावांच्या हातात सोन्याचे कंकण
महादेवाच्या पिंडीला बेल वाहिला हिरवागार आणि _______ रावांच्या जीवासाठी केला संसार
सौभाग्यवतीचा अलंकार म्हणजे काचेचे चूडे _______ रावांचे नाव घेते मंगळागौरी पुढे
अलंकार अलंकार श्रेष्ठ मंगळसूत्र _______रावांच्या हाती माझे जीवन सूत्र
मंगळसूत्राच्या वाटीत संगम सासर माहेरचा _______ रावांचे नाव घेऊन मान राखते सर्वांचा
हृदय रुपी शिंपल्यात प्रीतीचे पाणी _______ रावांच्या नावाने बांधले मंगल मनी
कण्वमुनीच्या आश्रमात शकुंतलेचे माहेर _______ रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर
गौतमाची गौतमी वसिष्ठांच्या अरुंधती _______ रावांची मी सौभाग्यवती
दया-क्षमा-शांती हेच तिचे माहेर _______ रावांच्या चरणावर केला पंचप्राणांच्या आहेर
रातराणीच्या सुगंधाने नीशिगंध झाला मोहित मागते आयुष्य _______ रावांच्या सहित
शिवाजी राजा जिजाई होती माता_______ रावांचे नाव घेऊन येते मी आता
अमृत मूर्तीला स्वरूप देतो कलाकार_______ रावांचे सद्गुन हेच माझे अलंकार
हळद लावते किंचित कुंकु लावत ठसठशीत_______ रावांचे पती मिळाले हेच माझे पूर्व संचित
रुसलेला राधेला कृष्ण म्हणतो हास_______ रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास
साडे झाले समूह झाले आता निघाली वरात_______ रावांचे नाव घेते लक्ष्मी आली घरात
राधे च्या मनात कृष्ण चिंतन _______ रावांचे नाव घेऊन बांधते मी कंकण
लग्नाचे बंधन जन्माच्या गाठी _______ रावांचे नाव घेते तुमच्यासाठी
गर्व नसावा पैशाचा अभिमान नसावा रूपाचा _______ रावांना घालते वरण भात तूपाचा
परमेश्वराचे सोबती सुख-दुःखाचे भागीदार, _______ रावांच्या जीवनात मी आहे साथीदार
शुभमंगल प्रसंगी अक्षता पडतात माथी_______ राव माझे जीवन साथी
शुभमंगल प्रसंगी गणेशाची साथ _______ रावांच्या नावाने आज केली सुरुवात
हेही वाचा : लग्नाआधी मुलीला विचारावेत हे प्रश्न
देवरूपी निरंजनात प्रेमरुपी बात_______ रावांचे नावाला आज केली सुरुवात
जन्म दिला मातेने पालन केले पित्याने _______ रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने
यमुनेच्या तीरावर ताजमहालाची सावली _______ रावांना जन्म देणारी धन्य ती माऊली
सोन्याची घागर अमृताने भरावे _______ रावांची सेवा मी जन्मभर करावी
सत्यभामेने श्रीकृष्णाची केली सुवर्णतुला _______ रावांचे नाव घेते अशिर्वाद द्यावा मला
दारात अंगण, अंगणात काढलेली रांगोळी _______ रावांचे नाव घेऊन बांधते मुंडावळी
शंकर पार्वतीच्या पोटी जन्मले गणराज _______ रावांचे नाव घेते गौरी बसली आज
गजाननाची कृपा गुरूचा आशीर्वाद _______ रावांचे नाव घ्यायला आज करते सुरुवात
आई-वडील सोडताना पाऊल होतात कष्टी _______ रावांच्या संसारात मी करीन सुखाची सृष्टी
आकाशाच्या स्वर्गात ब्रह्मा विष्णू आणि महेश _______रावांचे नाव घेऊन करते हो घरात प्रवेश
महादेवाला बेल विष्णूला तुळस_______ रावांचे नाव घ्यायला कसला हो आळस
मंगळसूत्र आहे सासरची प्रीती,_______ रावांचे नाव घेऊन समाधान चित्ती
नाही मोठेपणाची अपेक्षा नाही दौलतीची इच्छा _______ रावांच्या संसारी आपणा सर्वांच्या शुभेच्छा
शंकराच्या पिंडीवर बेलाची पार,_______ रावांचे नाव घेते सर्वांचा मान
सौभाग्य चालेना काळी पोत, _______ रावांच्या जीवनात उजळीन जीवन ज्योत
चंदनाच्या झाडा बसला मोर _______राव यांच्या जीवावर मी आहे थोर
सर्व देवांमध्ये श्रेष्ठ ब्रह्मा-विष्णू-महेश,_______ रावांचे नाव घेऊन करते हो गृहप्रवेश
सुख समाधान तेथे लक्ष्मीचा वास, _______ रावांना देते मी जिलबीचा घास
पदस्पर्शाने लवंडते उंबरठ्यावरलं माप, _______ रावांची सौभाग्यवती म्हणून गृह प्रवेश करते आज
घराला असा व अंगण अंगणात डोलावी तुळस, _______ रावांच्या जीवनात चढवीन आनंदाचा कळस
नवरदेवासाठी मराठी उखाणे
आंबा गोडच गोड त्याहीपेक्षा _______ चे नाव आहे अमृतापेक्षा ही गोड
चंद्र आहे रोहिणीचा सांगाती, _______ आहे माझी जिवनसाथी
सायंकाळच्या आकाशाचे निराळे रंग, _______ पण असते घरात कामात दंग
आंबेवनात कोकिळा गाते गोड, _______ आहे माझ्या तळहाताचा फोड
शंकरासारखा पिता अन गिरीजेसारखी माता, _______ राणी मिळाली स्वर्गाला हाता
निळे पाणी निळे डोंगर हिरवे हिरवे रान, _______ चे नाव घेतो राखून सर्वांचा मान
बशीत बशी कप बशी, _______ ला सोडून बाकी सगळ्या म्हशी
इंग्रजी भाषेला महत्त्व आले फार, _______ ने फुलवला माझा संसार
सिते सारखे चरित्र रंभे सारखे रूप, _______ मला मिळाली आहे अनुरूप
सह्याद्रीची शिल्पे आहेत खूप सुंदर,_______ आहे माझी सर्वांपेक्षा सुंदर
पुरुषांसाठी मराठी उखाणे
गणेशाच्या भेटीसाठी गौरी येते नटून, _______आली माझ्या संसारात आणि मी गेलो फुलून
रुक्मिणीने पण केला कृष्णाला वरीन, _______ च्या साथीने आदर्श संसार करीन
कृष्णाच्या लीलांचा राधेला लागला ध्यास, _______ ला देतो मी बर्फीचा घास
पाण्याने भरला कलश त्यावर आंब्याची पाने फुले,_______ चे नाव घेतल्यावर चेहरा माझा खुले
सोन्याची सुपली मोत्यानं गुंफली, _______ माझी राणी घरकामात गुंतली
हिमालय पर्वतावर शंकर-पार्वती ची जोडी, _______ च्या जीवनात आहे मला गोडी
चांदीच्या पाटावर अमृताचा कलश,_______ आहे माझी खूप सालस
दही चक्का तूप, _______ आवडते मला खूप
मस्तकावरील वरील फुल घेतले दुधा-तुपात बुडविले, _______ च्या कपाळी कुंकुमतिलक लावले
जोडीने आंबा शिंपला आता निघेल वरात, _______ च्या साथीने केली संसाराची सुरुवात
श्रीगणेशाच्या भेटीसाठी गौरी येते नटून, _______ च्या नावाने आले सुख माझे फुलून
हे ही वाचा : मुलांमध्ये अभ्यासाची गोडी कशी लावावी?
मराठी उखाणे – डोंगरदऱ्या.कॉम
Comments (2) on "कोणत्याही कार्यक्रमात नाव घेण्यासाठी मराठी उखाणे, लग्नातील उखाणे, नवरीचे उखाणे (Marathi ukhane for any Marathi cultural occasion) 2023"