Instant Healthy snacks dongardarya.com
Posted in: जीवनशैली (Lifestyle)

Nutritious and Tasty Instant Healthy breakfast and snacks Recipes in Marathi | 6 पौष्टिक आणि चवदार झटपट नाश्ता रेसिपी मराठी पाककृती, इन्स्टंट हेल्दी ब्रेकफास्ट रेसिपीज, झटपट नाश्ता रेसिपी मराठी

या नावावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल की हा ब्लॉग कशाबद्दल आहे. आपण आरोग्यदायी आहाराकडे (Healthy Diet) लक्ष दिले पाहिजे. व्यायाम पण केला पाहिजे. इतर पोस्ट जसे की घरातील प्रोटीन संपन्न पदार्थ आणि मोरींगा सुपरफुड यासुद्धा आरोग्यदायी अन्न याबद्दल चांगली माहिती दिली आहे. अशी दुर्मिळ माहिती वाचकांना मिळावी यासाठी आपल्या डोंगरदऱ्या.कॉम या ब्लॉगला भेट देत राहवे. तसेच आपल्याला इथून पुढे अशी खूप माहिती या ब्लॉगवर पाहायला मिळेल. ब्लॉगला भेट देणाऱ्यांचा रिस्पॉन्स पाहता वाचकांना माहिती आवडत आहे असे दिसत आहे. कृपया अजून काही मौल्यवान माहिती आपल्याकडे असेल तर कमेंट करून तुम्ही ब्लॉगचा उद्देशाला मदत करावी ही विनंती.

चला तर आता मुख्य विषयाकडे येऊया. काही लोक घरापासून दूर राहत असतात. काही जेवण करून खातात काहीची मेस किंवा डब्बा/टिफीन अशी काहीतरी सोय असते. पण प्रत्येक ठिकाणी दर्जा चांगला असेल नाही. खर तर दर्जा खूपच कमी ठिकाणी मिळतो. त्यातही बाहेर खाणारे लोक पैसे देऊन तर बाहेरचे खातात पण बाहेर अंदाजे नव्वद टक्के जंक फूड मिळते. जे चवदार तर असते पण त्यामुळे आपल्याला विविध छोट्या आणि मोठ्या रोगांचा सामना करावा लागू शकतो. छोटे रोग म्हणजे पोट खराब होणे, दुखणे, पित्त, खोकला इत्यादी भरपूर आहेत. बाहेर असताना आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागते कारण आपण घरापासून दूर असतो.

रेसिपीज तर युट्यूब किंवा रेसिपीज वेबसाईट वर भरपूर मिळतील. पण प्रॉब्लेम काय असतो की आपल्याकडे वेळ नसतो. आणि त्यात मग आपण काहीही जे मिळेल ते खायला चालू करतो. बाहेर मिळते फक्त जंक फूड आणि जिथ चांगले मिळते ते महाग पण असते सगळ्यांना परवडेल असे नाही. तर या ब्लॉग च उद्देश हा आहे की ज्या Instant healthy recipes आहेत त्या गरजुंपर्यंत पोहोचवणे. जे बाहेरगावी रूम करून राहतात म्हणजे विद्यार्थी नोकरी करणारे शिक्षण घेणारे किंवा ते लोक जे पौष्टिक खाऊ इच्छितात पण वेळ कमी असतो त्या लोकांसाठी खासकरून हा ब्लॉग आहे. किंवा सकाळी शाळेत जाताना मुलांना डब्यामध्ये कमी वेळेत होईल असे काय द्यावे हा प्रश्न. पडतो त्या गृहिणी किंवा काम करणाऱ्या महिलांसाठी पण उपयोगी आहे.

ओट्स उपमा रेसिपी

बरेच लोक ओट्स बद्दल जाणून असतील पण तरीही हा पदार्थ फक्त शहरात आणि ते पण आरोग्य जपणाऱ्या लोक खाताना दिसतात. बऱ्याच लोकांसाठी नवीन आहेच त्यामुळेच हा या ब्लॉग मध्ये आहे.

ओट्स हे किलोच्या भावाने सगळीकडे मिळतात. सफोला, क्वॅकर अशा अनेक FMCG कंपन्याचे ओट्स हे प्रॉडक्ट आहे. एक किलोचा पॅक घरात आणून ठेवावा लागेल. ओट्स थोडे म्हणजे छोटी वाटी घेतले तरी भरपूर होतात. आणि त्यात प्रोटीन आणि फायबर चे प्रमाण चांगले असते. आता रेसिपी पाहू.

आपण जसे रव्याचा उपमा बनवतो तसाच ओट्स च उपमा बनतो.

साहित्य

एक छोटी वाटी ओट्स, तेल किंवा तूप, जिरे, मोहरी, कांदा, शेंगदाणे लसूण, मिरची पावडर, मसाला आवडीप्रमाणे, गाजर, मटार, सोयावडी, कढीपत्ता उपलब्ध असेल तर

कृती

तेल किंवा तूप कढईत टाका. थोडे गरम झाल्यानंतर मोहरी, जिरे, कढीपत्ता टाका. आता शेंगदाणे आणि कांदा टाकून परतून घ्या. कांदा नीट परतल्यानंतर गाजर, मटार, थोडा वेळ भिजवलेली सोयाबीन वडी हे ऑप्शनल पदार्थ टाकावे. हे उपलब्ध असतील तर पौष्टिकता अजून वाढते. पण यातले काही नसेल तरी मीठ मसाला टाकलेला ओट्स उपमा पण चांगला लागतो. त्यात तिखट म्हणून मिरची पावडर आणि मसाला आपल्या आवडीनुसार टाकावा. दोन तीन वेळा चमच्याने हलवून त्यानंतर जेवढे ओट्स आणि इतर गोष्टी आहेत आहेत त्याच्या दीडपट पाणी टाकावे त्यात ओट्स टाकावे. मीठ चवीनुसार टाकावे. थोडे चमच्याने हलवावे. पाणी व्यवस्थित कमी होऊन ओट्स पाच ते दहा मिनिटं शिजतील. थोडा सूपी हवा असेल तर पाणी ठेवले तरी चांगले लागते. किंवा पूर्ण पाणी कमी करावे. नंतर आवडीनुसार तूप टाकू शकता.

ओट्स खीर

साहित्य :

ओट्स, ओट्सच्या दुप्पट दूध, काजू, बदाम, मनुके, खजूर – किंवा सुकामेवा जो उपलब्ध असेल तो.

कृती

एका भांड्यात दूध आणि सुकामेवा टाकून पाच मिनिट उकळू द्यावे. नंतर त्यात ओट्स टाकावे आणि चांगले मिश्रण करावे. आवडीप्रमाणे घट्ट होईपर्यंत आटु द्यावे. आपली खीर तयार आहे. थंड किंवा गरम खाण्यास घ्यावी.

सॅलड्स किंवा कोशिंबिरी

साहित्य

गाजर, काकडी, बीट, टोमॅटो, कांदा, पालक, मेथी, ब्रोकोली, पत्ताकोबी, मुळा, इत्यादी यापैकी ज्या भाज्या उपलब्ध असतील त्या सलाड साठी चालतात.

कृती

सगळ्या भ्याज्या आणि पालेभाज्या धुवून चिरून घ्याव्या. त्यात मिठ, मसाला, तिखट, आवडीप्रमाणे घालावे. चांगले मिसळून घ्यावे. सलाड तयार आहे.

यात शेंगदाणे, फुटाणे घालता येतील. मोड आलेली मटकी, हरभरे, मटार, मूग किंवा इतर कडधान्य पण घालता येतील.

सॅलड्स भेळ

कोशिंबीर किंवा सॅलड ची कृती आपण वर पाहिलेली आहे. ती करून त्यात मुरमुरे, फरसाण, चिवडा, भडंगयापैकी गोष्टी टाकून भेळ तयार. लिंबू किंवा चिंचेचे पाणी पाणी टाकून ही भेळ चवदार आणि पोषणतत्वांनी परिपूर्ण असते. आवडीप्रमाणे मसाला, लिंबू किंवा दही टाकून बाहेर मिळणाऱ्या जंक फूड पेक्षा चांगली भेळ मिळते.

रोस्टेड सॅलड्स

आपण जी कोशिंबिरीचा कृती वर पाहिली. जर थंड कोशिंबीर नको असेल आणि थोडे भाजलेले किंवा गरम खायचे असेल तर कोशिंबीर घेऊन तुपात फोडणी देऊन थोडे भाजून घेतले तर खूप चविष्ट लागते. या कोशिंबिरी किंवा सॅलड्स अगदी पटकन होणारी इन्स्टंट पाककृती आहेत. त्याबरोबरच त्या पोषक पाककृती सुद्धा आहेत.

सोया फ्राय किंवा सोयावडी फ्राय

साहित्य

सोयाबीन वड्या, फोडणीचे साहित्य- तेल किंवा तूप, कढीपत्ता, अद्रक लसूण पेस्ट, मसाला, सॉस

कृती

सोयावड्या पाच दहा मिनिट पाण्यात भिजवून ठेवाव्या. पूर्णपणे भिजल्यावर गटाने दाबून त्यातले पाणी पिळून काढावे. कढई मध्ये एक चमचा तेल किंवा तूप गरम करावं. त्यात मोहरी जिरे कढीपत्ता इत्यादी टाकून फोडणी द्यावी आणि सोयावड्या टाकाव्या. चांगल्या खरपूस कडक होईपर्यंत भाजावे. वरून कडक भाजल्या गेल्यानंतर त्यात मसाला, मीठ, कोथिंबीर, कांदा, आवडीप्रमाणे चिली सॉस, टोमॅटो सॉस टाकून मिसळून खायला घ्यावे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to Top