How to reduce the stress on the eyes and body while working online in Marathi
Posted in: आरोग्य टिप्स (Health tips), जीवनशैली (Lifestyle)

ऑनलाईन काम करताना डोळ्यांवर व शरीरावर आलेला ताण थकवा दूर करण्यासाठी काय करावे 2023?

How to reduce the stress on the eyes and body while working online in Marathi – नमस्कार मित्रांनो, सध्या ऑनलाईन क्लासेससाठी, मोबाईल गेम, व्हिडिओ पाहण्यासाठी लहान मुलांचा पण स्क्रीन टाईम खूप प्रमाणात वाढून कॉम्प्युटर हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनत चालला आहे.

तुमच्यापैकी बरेच जण दिवसातला बराच वेळ कॉम्प्युटर समोर घालवत असाल, मग ते करमणुक असो वा काम करण्यासाठी, या क्रियेला स्क्रीन टाईम असे म्हणता येईल.

पण सतत स्क्रीनवर पाहिल्याने नकळत आपल्या डोळ्यावर अतिरिक्त ताण येत असतो. हा ताण वाढत जाऊन काही जणांना चष्मा देखील लावावा लागतो. तर काहींना पाठ व मानेवरचा ताण सहन करावा लागतो.

तुमच्यापैकी बरेच जण ऑनलाईन काम करत असेल. तर ते न टाळता येण्यासारखे आहे. पण आपण शरीरावर आणि डोळ्यावर येणारा ताण नक्कीच कमी करू शकतो.

यासाठी कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही नियम अंगीकृत करावे लागतील. ज्यामुळे हा ताण कमी करून आपली उत्पादकता व काम करण्याची क्षमता वाढल्यास मदत होईल.

या लेखातून आपण ऑनलाईन काम करताना डोळ्यांचे आरोग्य निरोगी कसे राखावे (How to reduce the strain on the eyes and body while working online in Marathi) याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

ऑनलाईन काम करताना डोळ्यांचे आणि शरीराचे आरोग्य निरोगी कसे राखावे (How to reduce the stress on the eyes and body while working online in Marathi)

How To Improve Eyesight In Marathi

मित्रांनो, ऑनलाईन काम करताना डोळे, मान आणि पाठीवर अतिरिक्त ताण येत असतो. हा ताण कमी करण्यासाठी नियमितपणे चांगल्या अवस्थेत बसण्याची सवय लावून घ्यावी.

यासाठी लॅपटॉप किंवा डेस्कटॉप वर काम करताना टेबल आणि खुर्ची वापरावी लागते. पण जर आपण बेड वर किंवा गादीवर बसलो तर स्क्रीन आपल्या डोळ्यांच्या सरळ रेषेत राहील अशा प्रकारे लॅपटॉप छोट्या टेबल वर ठेवला पाहिजे. किंवा तशा अवस्थेत जास्त वेळ बसू नये.

टेबल खुर्ची चांगल्या प्रतीची असावी. आपले शरीराचे सर्व सांधे (जॉइंटस) काटकोनात राहतील अशी टेबल खुर्ची असली तर ताण येणार नाही.

स्क्रीन किंवा मॉनिटर डोळ्यांच्या सरळ रेषेत किंवा किंचित खाली असावा. त्यामुळे गळ्यावर आणि मानेवर ताण येणार नाही.

लॅपटॉपवर सलग किती वेळ काम करावे? (Simple Steps for Improving Your Eyesight)

अर्धा किंवा एक तासाच्या वर एकाच जागी बसून राहू नये. यामुळे अपचन आणि इतर पोटाचे त्रास होऊ शकतात. हालचाल कमी झाल्यामुळे चरबी पण वाढू शकते. यासाठी मधून मधून उठावे आणि उभे राहावे. शक्य असेल तर स्टॅण्डीग डेस्क म्हणजे उभे राहून काम करण्याचा टेबल वापरू शकता. पण हे सर्वांना शक्य नसते म्हणून थोडे उभे राहणे कधीही चांगले.

ऑनलाईन काम करताना ताण कमी करण्यासाठी पाणी भरपूर प्यावे (Drink plenty of water to reduce body and eye stress while working online)

पाण्याची पातळी कमी होऊन डोक्यावर ताण येतो. डोकेदुखी होऊ शकते. थकवा आणि ताण घालवण्यासठी पाणी पिणे सर्वात योग्य पर्याय आहे. पाणी आपल्या शरीराला उत्साही ठेवते. ताण कमी जाणवतो. पाणी पिताना देखील बसून आणि हळू हळू प्यावे.

ऑनलाईन काम करताना छोटे ब्रेक घ्या (Take frequent breaks)

अर्धा तास किंवा जास्तीत जास्त एक तासानंतर उठून एक ब्रेक घ्यावा. आपल्या स्नायूंवर आलेला ताण आणि पाठीवर येणारा थकवा निघून जातो. डोळ्यांवर आलेला ताण देखील जातो. काही पावले चालून यावे. मसल्स रिलॅक्स होण्यासाठी मदत होतो. काही छोटे छोटे व्यायाम पण करता येतात. ते आपण पुढे पाहणारच आहोत.

शक्य असेल तर हे खाद्यपदार्थ डेस्कवर ठेवावे जे ताण कमी करण्यास मदत करतील (Snacks to reduce the stress on the eyes and body while working online Marathi Tips)

बसल्या बसल्या काही तोंडात टाकले तर ताण कमी होतो. त्यासाठी सुकामेवा (ड्रायफ्रूटस), शेंगदाणे, फुटाणे, असे बरेच प्रोटीन युक्त पोषक पदार्थ छोट्या डब्यात ठेवू शकता. काही ठिकाणी हे पदार्थ खाणे सामान्य आहे पण काही ठिकाणी आपल्या कार्यालयाची परवानगी असेल तरच हे करता येईल.

तेलकट किंवा जंक फूड जसे चिप्स, बिस्कीट इत्यादी गोष्टी ठेऊ नये. कारण त्यामुळे वजन वाढणे आणि पोट वाढण्याची शक्यता वाढते. लठ्ठपणा वाढतो. त्यामुळे पौष्टिक आणि कोरडे पदार्थ असतील याची काळजी घ्यावी. कोरडे यासाठी की ओले किंवा तेलकट आपल्या लॅपटॉप किंवा कीबोर्ड वर सांडू नये आणि तेलाचे हात त्याला लागून धूळ चिकटवून बसू नये.

ऑनलाईन काम करताना आलेला शरीरावर आणि डोळ्यावर आलेला ताण घालवण्यासाठी टिप्स (Tips reduce the stress on the eyes and body while working online In Marathi)

कधी कधी कामात आपण पूर्णपणे तल्लीन होतो. किंवा पटकन काम संपवून पुढे पाठवायचे असते. अशा वेळी वर दिलेल्या सगळ्या गोष्टी करणे शक्य होत नाही किंवा लक्षात येत नाही. बराच वेळ एका जागी बसून काम केल्यामुळे डोळ्यांवर, डोक्यावर ताण येतो. पाठीचा कणा आणि मानेवर ताण येतो. खूपच वेळ एका जागी बसून काम केल्याने कंबर पाठ दुखू शकते. पोटाचे विकार पण होऊ शकतात. आपण जेव्हढे अन्न खातो तेव्हढे शारीरिक हालचाली साठी वापरले जात नाही म्हणून पचन होण्यासाठी वेळ लागतो. यामुळे एक जागी जास्त वेळ बसणे शक्यतो टाळावे.

जर एका जागी किंवा कॉम्पुटरवर बसावेच लागत असेल तर आलेला ताण घालविण्यासाठी काही पटकन करता येणारे स्ट्रेचिंग किंवा शरीराचे भाग ताणून काही व्यायाम करावे. त्यामुळे शारीरिक हालचाल होईल आणि ताण पण निघून जाईल. बसून शरीरावर आलेला ताण कमी करणाऱ्या काही टिप्स पाहूया.

शरीरावरचा ताण कमी करण्यासाठी व्यायाम आवश्यक (Start exercising today to reduce screen stress – Marathi Health Tips)

थोडक्यात रोज व्यायाम केला तर त्यासारखे फायदे नाहीत. अर्धा तास किंवा पंधरा मिनिटांचा शारीरिक सोपे व्यायाम करण्याची रोज जर सवय लावली तर त्यासारखे दीर्घकालीन शारीरिक आणि मानसिक फायदे दुसऱ्या कशानेही मिळणार नाहीत. रोज पंधरा ते वीस मिनिटे एखादा मैदानी खेळ पण असेच परिणाम देईल.

व्यायामाचा किंवा मैदानी खेळांचा फायदा हा आहे की शारीरिक तक्रारी कमी होतात. मेंदूची कार्यक्षमता वाढते कारण ताण कमी होतो. उत्साह कायम राहतो. एकदा प्रयोग करून पहा अर्धा तास शारीरिकरित्या सक्रिय राहून काम करा. तुम्ही त्या दिवशी अगदी प्रभावीपणे काम कराल आणि ताण पण कमी येईल. कामाचा थकवा कमी जाणवेल. हेच जर रोज केले तर थकवा येणारच नाही.

स्क्रीनवर काम केल्याने ताण न येण्यासाठी हा व्यायाम करा (Daily exercises to reduce the stress on the eyes and body while working online in Marathi)

  • सगळे सांधे 10 ते 15 वेळा गोल फिरवणे. व्यायामाच्या सुरुवातीला Warm Up म्हणून करावे.
  • धावणे (Running)
  • दोरीवरच्या उड्या (Skipping rope)
  • जोर काढणे (Push ups)
  • उठाबशा काढणे (squats)
  • योगासने जसे पश्चिमोत्तानासन, हलासन, भुजंगासन, शीर्षासन, ताडासन इत्यादी
  • सूर्यनमस्कार
  • प्राणायाम – भस्रिका, अनुलोम विलोम, कपालभाती, भ्रामरी प्राणायाम आणि ध्यान

आता हे झाले ताण येऊ नये यासाठी पण बसून काम केल्याने ताण आला तर काय करावे हे पाहूया

मानेचा व्यायाम – मानेला दोन्ही बाजूने गोल फिरवणे. मान चारही दिशांना म्हणजे उजवीकडे, डावीकडे, पुढे, मागे वळवून काही सेकंदासाठी त्या दिशेला ठेवणे पुन्हा जागेवर आणणे. हे दोन मानेचा ताण कमी करणारे व्यायाम तुम्ही बसल्या जागी पण करू शकता.

हात ताणणे – हातांना बोटे एकमेकांत गुंफून तळवे वर करून ताणून धरावे. असेच तळवे पुढे करून करता येईल. हे दोन्ही स्ट्रेचिंग एक्सरसाईज बसल्या जागी करता येणारे व्यायाम आहेत.

पाठीचा ताण कमी करण्यासाठी व्यायाम – जागेवरून उठल्यावर उभे राहून हातांना एकमेकात धरून एका बाजूला काही सेकंद आणि दुसऱ्या बाजूला काही सेकंद कंबरेतून वळवावे.

कंबरेचे स्ट्रेचिंग – कंबरेवर मागे दोन्ही हातानी धरून डोके, मान आणि पाठ कंबर कवून मागे वळवावी

डोळ्यांचा ताण कमी करण्यासाठी – प्रत्येक दहा ते वीस मिनिटे सतत स्क्रीन वर पाहिल्याने ताण येतो. त्यामुळे काही सेकंद दर दहा वीस मिनिटांनी अंदाजे वीस फूट किंवा एखादी लांबची गोष्ट पाहावी. लगेच डोळ्यांवरचा ताण कमी झाल्याचे जाणवू लागेल.

यासोबत डोळ्यांची बुबुळे गोल गोल फिरवून सिद्ध डोळ्यांवरचा ताण लगेच कमी होतो.

एवढे पटकन करता येणारे व्यायाम केले तरी शरीरावर आलेला ताण निघून जाईल आणि काही सेकंदात तणावमुक्त वाटायला लागेल. हे करताना लाजू नये कारण हे व्यायाम किंवा Quick streching exercises आपण आपल्या स्वास्थ्यासाठी आणि तणाव घालवण्यासाठी करत आहोत. आजकाल बऱ्याच ऑफिसेस मध्ये असे व्यायाम दाखवणारे मार्गदर्शक चित्रे लावलेली असतात.

वरील उपाय प्रत्यक्षात वापरून आपण आपल्या शरीरावर आणि डोळ्यांवर येणार ताण घालवू शकतो. रोज व्यायाम करण्याची सवय लावण्याचा प्रयत्न सर्वांनी करावा. रोज शारीरिकरित्या सक्रिय असणारे लोक कधीही जास्त यशस्वी होतात हे आलं सर्वांनी पाहिले आहे.

मित्रानो पोस्ट कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आपल्या जवळच्या लोकांना जरूर शेअर करा. जर यापेक्षा अजून चांगले काही माहिती असेल तर टिप्पणी करून नक्की शेअर जरा म्हणजे इतर लोक तेही वाचून अमलात आणतील आणि त्याचा फायदा सर्वांना होईल.

हेही वाचा

पित्त का होते? किंवा Acidity होण्याची 9 कारणे….

घरात असणारे शाकाहारी प्रोटीन संपन्न अन्नपदार्थ

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to Top