मित्रांनो जमाना बदलला आहे. इलेक्ट्रिक बाईक आणि इलेक्ट्रिक स्कूटर Electric Bike FAQ or Electric Scooter रस्त्यावर दिसत आहेत. जे 2000 सालाच्या आधीचे जन्म असलेले आहेत त्यांना आठवत त्यांना आठवत असेल की त्यांच्या लहानपणी पेट्रोल किंवा डिझेल वाहन असले म्हणजे खूप मोठी गोष्ट असायची. पण आता सर्वजण इलेक्ट्रिक वाहनांकडे स्विच होत आहेत कारण पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढलेल्या आहेत.
पण मुळात इलेक्ट्रिक वाहने या गोष्टी सर्वांसाठीच नवीन आहेत त्यामुळे त्याबद्दल अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न पडणे साहजिक आहे म्हणूनच या ब्लॉग पोस्टमध्ये आपण हे सर्व प्रश्न आणि त्यांचे उत्तरे पाहणार आहोत जेणेकरून आपल्याला बाईक निवडताना जास्त त्रास होणार नाही. चला तर मग पाहूया यांच्या बद्दल सतत विचारले जाणारे प्रश्न कोणते आहेत आणि त्यांची उत्तरे काय आहेत. हे माहिती सर्वांना बद्दल निर्णय घेण्यास नक्की मदत करील.
Table of Contents
1. सध्या भारतात कोणत्या इलेक्ट्रिक स्कूटर उपलब्ध आहेत? (Which electric bike is best in India?)
Revolt RV400
Ather 450 Gen 3
Ather 450
Hero Electric Optima
Hero Electric Photon HX
Bajaj Chetak
Ola Electric S1
Atumobile Atum 1.0
TVS Icube
Okinawa Praise
Simple Energy One
Tork Kratos
2. आजच्या काळात इलेक्ट्रिक वाहने का वापरावी? (Why should I use Electric bike or Electric Scooter?)
पेट्रोल, डिझेल आणि CNG यांच्या किमती वाढलेल्या आहेत
त्यामानाने विजेची किंमत कमी आहे. आणि वीज आपल्या घरात उपलब्ध आहे.
देखभालीचा खर्च (Maintenance cost of Electric bike) हा पेट्रोल बाईक पेक्षा कमी आहे.
सगळीकडे चार्जिंग स्टेशन उभे राहत आहेत. ज्यामुळे चार्जिंग घरी आणि बाहेर दोन्ही ठिकाणी होणार आहे
इलेक्ट्रिक बाईक आणि इलेक्ट्रिक स्कूटर यांच्यामधे पेट्रोल बाईक पेक्षा जास्त सुविधा आहेत. जसे मोबाईल चार्जिंग, मॅप नेवीगेशन, सुधारित डॅशबोर्ड, रिमोट कंट्रोल इत्यादी
बाईक कंट्रोल करण्यास मोबाईल ॲप ही आणखी एक उत्तम सुविधा आहे.
3. सध्या उपलब्ध असलेल्या इलेक्ट्रिक बाइक आणि इलेक्ट्रिक स्कूटर च्या किमतीची रेंज काय आहे? (What is electric bike price in India?)
सध्या मिळणाऱ्या इलेक्ट्रिक दुचाकी मध्ये कंपनी जास्तीत जास्त 150 किलोमीटर इतकी रेंज सांगत आहे. त्यामध्ये वापरकर्त्यांनी सांगितल्याप्रमाणे 100 ते 120 रेंज मिळते. सिंपल एनर्जी वन (Simple Energy One) 236 किमी रेंज सांगितली आहे.
5. इलेक्ट्रिक दुचाकी सुरक्षित आहेत का? (Are electric bike and electric scooter safe?)
इ बाईक आणि स्कूटर नक्कीच सुरक्षित आहेत. कारण यात पेट्रोल बाईक पेक्षा कमी मुविंग पार्टस आहेत. चालविण्यास सोपी आहे. फक्त ॲक्सलरेटर आणि ब्रेक आहेत. गिअर नाहीत. त्यामुळे स्त्रिया आणि पुरुष दोघांनाही सुरक्षित आहे.
6. इलेक्ट्रिक दुचाकी आणि चार चाकी वापरण्याला कायदेशीर मान्यता आहे का? Are Electric bikes and electric scooters legal in India?)
इलेक्ट्रिक वाहनाना कायदेशीर मान्यता आहे. भारत सरकार इलेक्ट्रिक वेहिकल्स च्या वापरला प्रोत्साहन देण्यासाठी सबसिडी पण देत आहे. फक्त जर 60 km/hr पेक्षा जास्त वेग देणारी गाडी असेल तर आरटीओ प्रोसेस करावी लागेल. ते शोरुम वाले करून देतात.
7. इलेक्ट्रिक दुचाकी वापरण्यासाठी सोप्या आहेत का? (Are Electric bikes easy to ride?)
इलेक्ट्रिक बाईक आणि स्कूटर या गिअर नसलेल्या आहेत. म्हणजे मोपेड जशी ॲक्सलरेटर वर गतिमान होते तशाच प्रकारे ही वाहने चालतात. त्यामुळे आपण म्हणून शकतो की या बाईक वापरण्यास खूप सोप्या आहेत.
8. इलेक्ट्रिक दुचाकी कसे काम करतात? (How does the Electric bike or Electric Scooter works?)
इलेक्ट्रिक बाईक आणि इलेक्ट्रिक स्कूटर चे कार्य कसे चालते हे जाणून घेण्यासठी या लिंकवर जा तिथे आपल्याला इलेक्ट्रिक बाईक आणि स्कूटर बद्दल इतरही भरपूर माहिती दिलेली आहे
9. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या इ बाइक विश्वसनीय आहेत का? (Are Electric bikes available in the market reliable?)
सध्या पुणे आणि मुंबई सारख्या शहरात जागोजागी चार्जिंग स्टेशन आहेत त्यामुळे बॅटरी डाऊन झालीच तर गुगल मॅप वर आपल्या जवळ चार्जिंग स्टेशन कुठे आहे हे “Charging stations near me” असे सर्च करून शोधू शकतो. आणि तिथे जाऊन चार्जिंग करू शकतो. अजून एक उपाय बॅटरी रीमोवेबल असेल तर काढून घरात किंवा ऑफिस मध्ये, किंवा ओळखीच्या घरी चार्जिंग करू शकतो. पण तरी एक गोष्ट बोलता येईल की जर आपले येण्याजाण्याचं अंतर कमी असेल म्हणजे इलेक्ट्रिक वेहिकल च्या रेंज मध्ये बसत असेल तर इलेक्ट्रिक बाईक, इलेक्ट्रिक स्कूटर इलेक्ट्रिक कार या सर्व विश्वसनीय आणि किफायती आहेत.
10. रोजच्या येण्या जाण्यासाठी इ बाइक आणि इ स्कूटर चांगल्या आहेत का? (Is electric bike good for daily use?)
एका चार्ज मध्ये 70 ते 100 रेंज मिळते. रोजचे येणे जाणे या रेंज मध्ये बसत असेल तर नक्कीच या ई बाइक्स फायदेशीर आहेत. फक्त लांब प्रवास करण्यासाठी म्हणजे 100 किलोमीटर पेक्षा जास्त अंतरासाठी तेव्हाच वापरता येतील जेव्हा सगळीकडे फास्ट चार्जिंग स्टेशन उभे राहतील.
हे हि वाचा : महाराष्ट्रातील जागतिक वारसा ठरलेली पर्यटन स्थळे
11. ई बाइक आणि इलेक्ट्रिक स्कूटर वापरल्यामुळे पैसे कसे वाचवता येतील? (How to save money on buying electric scooter and electric bike?)
पेट्रोल का आपण ढोबळमानाने 50 किलोमीटर साठी 100 रुपये खरच करतो. पण इलेक्ट्रिक बाईकला 100 किलोमीटर साठी 30 रुपये लागतील. अशा प्रकारे पैसे वाचतील.
12. इलेक्ट्रिक बाइक किंवा इलेक्ट्रिक स्कूटर चार्ज करण्यासाठी किती खर्च येतो? (How much does it cost to charge an electric scooter?)
बॅटरी पूर्ण चार्ज करण्यासाठी 20 ते 40 रुपये लागतात. जर बॅटरी पूर्ण डिस्चार्ज झाली तर अंदाजे 40 रुपये लागतील.
13. ई बाइक चार्ज करण्यासाठी किती वेळ लागतो? (How much time it will take to charge a electric bike or electric scooter?)
घरात चार्जिंग करत असू तर पूर्ण चार्ज चार ते पाच तास लागतात Electric Scooter Charging Time. पण चार्जिंग स्टेशन वर फास्ट चार्जिंग ची सुविधा असेल तर अजून कमी वेळ लागेल. समजा 50% बॅटरी डिस्चार्ज आहे तर अर्धा वेळ लागेल.
14. ई बाइक बनवणारे भारतातील चांगले ब्रँड कोणते आहेत? (Which is the best electric bike to buy?)
Revolt Electric Bike, बजाज, TVS, Hero Electric, Ola Electric, Ather Energy, हे सध्या इलेक्ट्रिक स्कूटर बाइक बनवणारे नावाजलेले ब्रँड आहेत. सिंपल एनर्जी (Simple Energy) हा नवीन ब्रँड आहे.
15. पावसामध्ये ई बाइक वर प्रवास करू शकतो का? (can we use electric scooter in rain)
हो नक्कीच. ही वाहने बनवताना पावसाचा विचार करून डिझाईन केलेली असतात. त्यामुळे पावसाळ्यातही वापरू शकतो. सध्या बरेच लोक इलेक्ट्रिक वाहने पावसातही चालवताना शहरातील रस्त्यावर दिसत आहेत. काही दिवसांनी ग्रामीण भागातही दिसतील.
16. ई बाइक जास्तीत जास्त किती वेगाने चालवली जाऊ शकते? (what is the top speed of Electric bikes)
Revolt RV400 रेसिंग मोड ला 90-100 Km/Hr स्पीड देते. Hero Electri Scooter 85 Km/Hr वेग देते. Bajaj Chetak आणि TVS iCUBE या 80 Km/Hr स्पीड देतात.
17. सध्या कोणत्या कारणांमुळे इलेक्ट्रिक बाइक विकत घेणे फायद्याचे आहे? (Why should we buy electric scooter or electric bike?)
नवीन पेट्रोल बाईक घेण्यासाठी जेवढे पैसे लागतात तेव्हढ्या पैशात नवीन इलेक्ट्रिक स्कूटर किंवा बाईक येते. आणि पेट्रोल बाईकला जेवढे पेट्रोल लागते त्यापेक्षा अर्धा खर्च इलेक्ट्रिक गाडीला लागतो. अर्थात इलेक्ट्रिक वाहनांमध्ये खर्च कमी आहे आणि सुविधा जास्त आहेत.
18. ई बाइक किंवा इलेक्ट्रिक स्कूटर वापरण्यासाठी लायसन्स ची गरज आहे का? (Does an electric scooter need a license in India?)
जर 50 Km/Hr पेक्षा जास्त स्पीड देणारी गाडी असेल तर लायसेन्स ची गरज आहे. आजच्या काळात गरज जास्त स्पीड वाल्या इलेक्ट्रिक गाड्याची आहे आणि आता त्या उपलब्ध पण होत आहेत. म्हणजे सगळ्या RTO प्रक्रिया पूर्ण कराव्या लागणार ज्या पेट्रोल बाईक ला होत्या. इलेक्ट्रिक वाहनांना नंबर प्लेट आणि रजिस्ट्रेशन असणार.
19. वजनदार माणसांसाठी इ बाइक घेणे योग्य आहे का? (Can overweight people ride e-bikes?)
या बाईक आणि स्कूटर 100 कीलोग्राम पेक्षा जास्त वजन असलेल्या माणसासाठी बनवलेल्या असतात. त्यामुळे नक्कीच काही अडचण नाही.
Comments (2) on "इलेक्ट्रिक बाईक आणि इलेक्ट्रिक स्कूटर बद्दल सतत विचारले जाणारे 20 प्रश्न (Frequently Asked Questions electric two wheeler, Electric Bike FAQ or Electric Scooter FAQ)"