Posted in: आरोग्य टिप्स (Health tips), जीवनशैली (Lifestyle)

पित्त लक्षणे आणि पित्तावर घरगुती उपाय -5 Acidity Home remedies in Marathi 2023

मित्रानो पित्त का होते (What causes Acidity) आणि आम्लपित्त होण्याची कारणे खूप आहेत. आपण सगळे पित्त लक्षणे या गोष्टीशी परिचित आहोत. पण आज पित्तावर घरगुती उपाय पाहू. दैनंदिन जीवनात अनेक सवयी असतात ज्या शरीरातील पित्ताचे प्रमाण वाढवण्यासाठी कारणीभूत ठरतात. त्यासाठी आम्लपित्त का होते? या लिंकवर जाऊन अजून विस्तृत माहिती घेऊ शकता. या पोस्टमध्ये आपण पित्तावर घरगुती उपाय काय आहेत (How to cure acidity at home) पाहुया .

पित्तावर-घरगुती-उपाय-पित्त-लक्षणे

आज आपण या पोस्टमध्ये पित्त Acidity झाल्यावर काय उपाय आहेत ते पाहणार आहोत. सामान्यतः पित्त हे काही चुकीच्या आहारामुळे किंवा एखादा पदार्थ कमी-जास्त खाल्ला गेल्यामुळे होत असते. जेव्हा छातीत जळजळ व्हायला लागते तेव्हा समजते की पित्त झाले. पित्ताशय म्हणजेच जठरातील पाचक रसाचे प्रमाण वाढते. मग लगेच पित्तावर उपाय म्हणून एक एंटासिड ची गोळी घेतली जाते. ही गोळी शरीरातील ऍसिड कमी करते आणि त्यामुळे आराम मिळतो. एक पित्त झाल्यावर उपाय हा ठीक आहे. पण तुम्हाला सारखेच पित्त होत असेल तर सारख्या पित्ताच्या गोळ्या घेण्यामुळे त्याचे वाईट परिणाम शरीरावर होऊ शकतात.

जेव्हा एखादा आजार असतो तेव्हा आपण फॅमिली फिजिशियन कडे किंवा डॉक्टर कडे जातो. त्यांना औषध म्हणून अशा गोळी द्यावा लागतात ज्यांनी शरीरातील पित्त वाढते. तेव्हा ते या गोळी औषधाबरोबर एंटासिडच्या गोळ्याही देतात. जेणेकरून पित्त होऊ नये. पण काही लोकांना जेव्हा दुसरा काहीही आजार नसताना सारखे पित्त होते आणि ते पित्तावर उपाय Acidity home remedy म्हणून एंटासिडची गोळी घेतात. हे जर परत परत घडत असेल तर याचे दुष्परिणाम होतात.

मग जर असे पित्तावर घरगुती उपाय असेल तर तो आनंदाने कराल. आणि काही अशाही सवयी आहेत की ज्या तुम्ही अंगी बाणल्या तर हाच पित्तावर रामबाण उपाय असेल. तुम्हाला या गोळ्या वगैरे घेण्याची काहीही गरज पडणार नाही. कारण हे उपाय केल्याने पित्तच होणार नाही तर उपाय करत बसण्याची काय गरज आहे. आणि हे उपाय केल्यावर पित्त नैसर्गिकपणे संतुलित केले जाईल. आणि त्यामुळे तुम्हाला काहीही खाण्यावर बंधने येणार नाहीत. चला तर मग पाहुयात पित्ताची लक्षणे आणि पित्तावर घरगुती उपाय.

पित्ताची लक्षणे Acidity symptoms

जेव्हा छाती आणि पोट यांच्या मधल्या भागामध्ये जळजळ होते तेव्हा पित्त झाले आहे हे समजावे. थोड्या प्रमाणात मळमळ ही होत असते. यावर जर त्वरित काहीही केले नाही ही जळजळ वाढते. मळमळ हिते आणि उलटी ही होते. ज्या उलटी मध्ये अर्धवट पचन झालेले जेवण ही बाहेर येते. हे असे का होते आणि पित्ताची उलटी होऊ नये यासाठी काय करावे ते आपण पूढे पाहणारच आहोत.

काही लोकांचे पित्तामुळे डोके दुखते. पित्त व डोकेदुखी होते तेव्हा जळजळ जास्त होत नसते पण माथा फाटेल इतके डोके दुखते. चक्करही येते. काही लोकानी तर ठरवून टाकलेले असते की आता पित्त झाले की उलटी करा आणि आराम मिळवा. पण हा उपाय नक्कीच नाही. काही वेळा अंगावर लालसर रंगाच्या गांध्या किंवा फोड येतात. त्यांना खाज सुटते. तेव्हा आपण पित्त आंगावर उठले असे म्हणतो.

हे पण वाचा : पित्त का होते?

पित्तावर घरगूती उपाय Acidity remedies at home

  1. पित्त झाले आहे किंवा छातीत जळजळ होत आहे असे वाटत असेल तर. थोडे पाणी पिऊन एक मिनिटं तोंडात धरा. एक मिनिटांनंतर हे पाणी गिळून टाका किंवा बाहेर काढून फेकून द्या. फरक पडलेला असेल. याचे शास्त्रीय कारण म्हणजे आपल्या तोंडात तयार होणारी लाळ ही पित्ताचे प्रमाण कमी करते. आता एक जागी बसून हळूहळू पाणी व्यवस्थित तोंडात घोळवून प्या. गटागटा पाणी पिऊ नये. त्याचे इतरही दुष्परिणाम आहेत.
  2. पाणी भरपूर प्यायची सवय असणाऱ्या लोकांना पित्ताचा त्रास कमी असतो. आणि सकाळी उठल्या उठल्या त्वरित दोन ग्लास कोमट पाणी पिण्याची सवय लावा. कधीही पित्ताचा त्रास होणार नाही. पोट साफ राहण्यासाठी पण सकाळी दोन ग्लास कोमट पाणी पिलेले फायदेशीर ठरते. आणि उठल्या उठल्या पिल्याने प्रेशर येऊन पोट रिकामे होते. आणि त्यामुळे भूकही वेळेवर लागण्यास मदत होते. कोमट पाण्यात जर लिंबू आणि मध टाकून पिले तर उत्तमच. पचनक्रिया सुधारण्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणून अनेक वैद्य कोमट पाण्यात लिंबू आणि मध टाकून सकाळी उठल्यावर पिण्याचा सल्ला देतात. याचा फायदा शरीरातील अतिरिक्त चरबी वितळून जाण्यासही होतो
  3. पित्त प्रकृती आहार मध्ये फळांचा समावेश असावा. फळांमध्ये असणारे अल्कलियुक्त घटक पित्त नियंत्रित करण्यास मदत करतात. आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश भरपूर असावा. मसालेदार पदार्थांसोबत मसालेदार नसलेले पदार्थही खावेत. त्यामुळे ऍसिडिटी कमी होईल.
  4. पित्त त्वरित कमी करण्यासाठी थंड दूध हा देखील एक चांगला आणि लगेच उपलब्ध होणारा पित्ताचा उपाय आहे. एक ग्लास थंड दूध हळू हळू सेवन केल्याने पित्ताने होणारी जळजळ लगेच कमी होते. थंड म्हणजे फ्रीज मधले नव्हे. दूध हे पित्तनाशक असते. आणि दुधाला पूर्णान्न मानले गेले आहे. कारण दुधामध्ये ते सगळे घटक असतात जे आपल्या शरीरासाठी उपयुक्त आहेत.
  5. आवळा पण एक पित्ताला कमी करणारा पदार्थ आहे. पण आवळा सहज उपलब्ध होत नाही पण आपण आपल्या घरात आवळा ज्यूस तर नक्कीच आणून ठेऊ शकतो. जो पित्त झाल्यास उपयोगात येऊ शकतो. यासाठी एक ग्लास पाण्यात एक टोपण आवळा ज्यूस आणि काळे मित टाकून हलवून एक एक घोट सावकाश प्यावे लागेल.

मित्रांनो पित्त जाणवल्या नंतर लगेच करावेत असे हे उपाय आहेत. जे केल्यावर तुम्हाला लगेच आराम मिळेल. नक्की पित्त नियंत्रित करण्यासाठी यांचा उपयोग करा. आणि ज्यांना ऍसिडिटी चा त्रास आहे त्या आपल्या प्रियजनांनाही शेअर करा. धन्यवाद.

Comment (1) on "पित्त लक्षणे आणि पित्तावर घरगुती उपाय -5 Acidity Home remedies in Marathi 2023"

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to Top
How to cure acidity at home? 5 acidity remedies at home…. Top protein rich veg foods must have at home Moringa powder powerful health benefits for males and females How breakfast habits linked to Mental health? प्रधानमंत्री आवास योजना शहरी (PMAY-U)