चेटकीण नारायण धारपांची प्रसिध्द कादंबरी किंवा भयकथा, रहस्यकथा ज्यांनी वाचली असेल त्यांना तर ही कथा काय आहे ते माहीतच असेल. वाचक मित्रानो तुम्ही ही पोस्ट वाचताय म्हणजे तुम्ही मराठी पुस्तके, मराठी कादंबरी, मराठी कथा या सगळ्या मराठी साहित्याचे रसिक आहात हे स्पष्ट होते. पण ज्यांना नारायण धारप आणि त्यांच्या उत्कृष्ट कादंबऱ्या कथा माहीत नाहीत त्यांना या लेखातून नक्की कळेल.
Table of Contents
लेखक परिचय – चेटकीण नारायण धारप
नारायण धारप हे नाव बऱ्याच मराठी वाचकांना माहीत नसेल. हे साठच्या दशकातील प्रसिद्ध लेखक आहेत. आपण सगळे जरी आजच्या नव्या पिढीतील असलो तरी एक गोष्टी वाखाणण्याजोगी आहे. ती म्हणजे असे म्हणतात लोक नारायण धारपांची पुस्तके मिळण्यासाठी लायब्ररी बाहेर रांगा लावत. नारायण धारप यांच्या रहस्यकथा अशा आहेत की उत्कंठा वाढत जाते. सस्पेन्स असा असतो की माणूस एका बैठकीत पुस्तक वाचून काढतो. आणि जर काही कारणामुळे खंड पडला तरी ती कथा पूर्ण वाचल्याशिवाय चैन पडत नाही.
आता तुम्हाला वाटेल की साठच्या दशकातील लेखक म्हणजे यांचे लेखन जुन्या काळातील आहे. काही लोकांना जुने गाणे आवडत नाहीत ना तसंच या कथेबद्दल वाटू शकतं. पण नारायण धारप हे एक दूरदृष्टी असलेले लेखक होते. त्यांच्या सगळ्या कथांमध्ये ते तात्विक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन, संकल्पना यांचाही उल्लेख आहेच. तो तुम्हाला वाचताना लक्षात येईल. त्यांच्या एक एक कादंबऱ्या हॉलिवूडच्या हॉरर चित्रपटांना लाजवतील अशा आहेत. इतका सस्पेन्स निर्माण करणाऱ्या कादंबऱ्या क्वचितच आहेत.
चेटकीण नारायण धारप कादंबरी माहिती
नाव: चेटकीण
लेखक: नारायण धारप
प्रकाशन: साकेत प्रकाशन
पृष्ठसंख्या: 250
रेटिंग: 5 स्टार
अमेझॉन लिंक : Buy here
चेटकीण या कादंबरीतील आवडतील अशा गोष्टी
चेटकीण नारायण धारपांची कथा कोकणातील श्रीवर्धन च्या जवळ असलेल्या एका समुद्रकिनाऱ्यावरील वाडी असते तिथली आहे. कोकण म्हणजे निसर्ग सौंदर्याने नटलेला आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध असा भाग. त्यामुळे कोकणातील निसर्ग सौंदर्याचे वर्णन आलेच. आणि कोकण हा भाग भुताखेतांच्या कथांसाठी प्रसिद्ध आहे.
या कथेतील नायिका सोनाली ही मुळातील कोकणातील असते. पण तिचे बालपण ते तारूण्य पुण्यात गेलेलं असते. आणि जेव्हा कथा चालू होते तेव्हा ती अमेरिकेहून परत आलेली असते. पण ती आपले घर आणि आपला देश विसरलेली नसते.
तुम्ही वाचताना तुमचा सस्पेन्स जाईल असे काही मी सांगणार
आणखी एक महत्वाचा मुद्दा मला नमूद करावासा वाटतो की कादंबरीचे नाव ‘चेटकीण’ आहे. हे नाव ऐकले की एक परिकथेतील लांब नाकाची, टोकदार टोपी घातलेली, झाडूवर उडणारी म्हातारी डोळ्यासमोर येते. पण पूर्ण कथेमध्ये ‘चेटकीण’ हा शब्द सुद्धा नाही. पूर्ण कथा वाचल्यावर तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे नक्की मिळतात की चेटकीण म्हणजे काय, कथेमध्ये चेटकीण कोण आहे आणि का आहे.
या कथेला दोन नायिका आहेत. एक तर तुम्हाला मी वर सांगितली आहे. तर दुसरी नायिका कोण? या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला वाचताना मिळेल.
सर्व मानवी पात्रांचा ज्या काळ्या शक्तींशी सामना दशकानू दशके होत आलेला असतो. ही वाईट शक्ती कोणकोणाचा बळी घेते. त्या शक्तींशी नायिका कशी तोंड देते आणि तिला मार्गदर्शन कोण आणि कसे करते. आणि या सगळ्या प्रवासात कोणकोणत्या रहस्य उलगडतात. हा सिक्वेन्स ज्या पद्धतीने दिला आहे त्यामुळे आपल्याला कथा पूर्ण वाचल्याशिवाय राहवत नाही.
या विश्वात बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या गूढ आणि अगम्य आहेत. आणि जशा वाईट शक्ती आहेत ताशा चांगल्या कल्याणकारी शक्तीही मानवाला सहाय्य करतात.
हे पण वाचा : भयकथा लेखक नारायण धारप यांच्या नक्की वाचाव्यात अशा कादंबरी
कोणी वाचावे
ज्यांना गूढ आणि रहस्यमय गोष्टी वाचायला आवडतात त्यांच्यासाठी ही कथा एक पर्वणी आहे. चेटकीण – नारायण धारप यांची ही कादंबरी एक भयकथा आहे. जी वाचल्यानंतर भीती वाटू शकते. दिवसा ठीक आहे. पण रात्री वाचल्यानंतर टॉयलेट ला जाताना डोक्यात या कथेतील निगेटिव्ह गोष्टी डोळ्यासमोर येऊन भीती वाटू शकते. माणूस अंधारात किंवा लाईट गेल्यावर बाहेर पडायला तेव्हढ्यापुरता घाबरू शकतो. त्यामुळे ज्यांचे मन खंबीर आहे. त्यांनी वाचायला हरकत नाही.
आणि जे लोक या हॉरर गोष्टीला चॅलेंज करू इच्छितात त्यांनी वाचून बघा तुम्हाला भीती वाटते का. मीही याच उद्देशाने वाचली होती पण दोन तीन प्रसंग असे आहेत की अंगावर काटा आला होता.
ज्यांना कोकणातील मराठी सस्पेन्स, थ्रिलर, हॉरर कथेचा आस्वाद घ्यायचा आहे त्यांनी नक्की वाचावी. या कथेसमोर भले भले चित्रपट, वेब सिरीज मार खातील.
काळजी करू नका शेवटी हॅप्पी ऐंडिंग आहे. त्यामुळे ही भीती जास्त काळ टिकणार नाही. मला आश्चर्य वाटते आहे की यावर अजून एखादा भयपट किंवा चित्रपट का आला नाही.
कोणी वाचू नये
खरतर लेखाची गरज म्हणून मी हा मुद्दा टाकत आहे. खरतर ही कथा वाचनाची, भय आणि रहस्यकथा, अंगावर काटा आणणाऱ्या कथांची आवड असलेल्या सर्वांनी वाचावी अशीच आहे. पण ज्यांना या गोष्टींची खरच भीती वाटते आणि ज्यांच्या मनावर परिणाम होऊ शकतो त्यांनी फक्त वाचन टाळावे. पण जे कादंबऱ्यांचे डाय हार्ड फॅन आहेत ते नक्कीच वाचतील.
नारायण धारप यांच्या कादंबऱ्यांचे वाचक तर वाचल्याशिवाय राहणार नाहीत. चेटकीण ही कादंबरी नारायण धारप यांचा मास्टरपीस आहे.