check vehicle insurance details online
Posted in: Tips and tricks, सतत विचारले जाणारे प्रश्न - FAQs

आपल्या गाडीचा इन्शुरन्स ऑनलाइन कसा चेक कराल (How to check vehicle insurance details online? 2022)

चला पाहुयात आपल्या गाडीचा इन्शुरन्स ऑनलाइन कसा चेक करायचा (check vehicle insurance details online). बऱ्याचदा काय होते आपण एकदा गाडीचा इन्शुरन्स काढतो आणि नंतर वर्षभर आहे म्हणून विसरून जातो की आपल्या इन्शुरन्स ची वैधता (validity) कधी संपणार आहे. मग ज्यावेळी गाडीला काही अपघात होतो तेव्हा आपल्या इन्शुरन्स ची validity संपलेली नसेल तर फायदा होतो. पण तीच जर संपली असेल तर नुकसान होऊ शकते आणि इन्शुरन्स ल पैसे भरूनही वर गाडी दुरुस्तीला भुर्दंड लागू शकतो.

अजून एक गोष्ट म्हणजे जर ट्राफिक पोलिसांनी आपल्याला अडवले आणि त्यावेळी आपल्या इन्शुरन्सची वैधता संपलेली असली तर दंड भरावा लागू शकतो. आपण जेव्हा सेकंड हांड गाडी खरेदी करत असतो त्यावेळी पण चेक करून माहिती घेऊ शकतो.

या समस्येचे समाधान असे आहे की आपल्याला आपल्या फोनमध्ये ऑनलाईन इन्शुरन्स ची डिटेल माहिती चेक करता येते. ही माहिती चेक करण्याचे भरपूर मार्ग आहेत. चला तर आपण प्रत्येकाची माहिती या ब्लॉग मध्ये पाहणार आहोत.

NextGen mParivahan ॲप चा वापर करून गाडीचा इन्शुरन्स चेक करा (check vehicle insurance status online parivahan using mParivahan app)

NextGen mParivahan मोबाईल ॲप द्वारे आपला इन्शुरन्स चेक करणे खूप सोपे आहे.यासाठी प्ले स्टोर मधून हे ॲप इंस्टाल करावे लागेल. त्यानंतर पुढील स्टेप फोलो करा.

आपले आधीपासून यावर अकौंट असेल तर साईन इन करा. नसेल तर Create Account वर क्लिक करा. पुढील पेज वर मोबाईल नंबर टाका आणि Generate MPIN वर क्लिक करा.

check vehicle insurance details online Nextgen mparivahan appcheck vehicle insurance details online Nextgen mparivahan app

आपला लक्याषात राहील असं सहा अंकी MPIN टाका. नंतर स्टेट, पूर्ण नाव, आधी सेट केलेला MPIN आणि इमेल आयडी ही विचारलेली माहिती भरा. Submit वर क्लिक करा.

check vehicle insurance details online Nextgen mparivahan appcheck vehicle insurance details online Nextgen mparivahan app

Enter vehicle number मध्ये आपण आपल्या मोबाईल नंबर ला रजिस्टर असलेल्या वाहनाचे इन्शुरन्स डीटेल्स पाहू शकता. NextGen mParivahan मोबाईल ॲपमध्ये आपल्याला आपले डिजिटल स्वरूपातील ड्रायविंग लायसेन्स आणि RC पण पाहता येईल.

हे ही वाचा : इलेक्ट्रिक बाईक किवा इलेक्ट्रिक स्कूटर घेताना बद्दल माहिती असायला हव्यात या सर्व गोष्टी 

Vahan NR eServices सरकारी वेबसाईट वरून इन्शुरन्स ऑनलाइन चेक करा (check vehicle insurance details online using Vahan NR eServices website)

Vahan NR eServices हे वाहनासंबधित सर्व माहिती जाणून घेण्यासाठी सरकारने उपलब्ध करून दिलेले संकेतस्थळ आहे. यावर आपल्याला आपल्या बाईक, कार, ट्रक, ट्रक्टर इत्यादी वाहनाविषयी माहिती मिळते. त्यासाठी काही स्टेप्स आहेत.

 • स्टेप 1: सर्वप्रथम वर दिलेल्या Vahan eServices च्या वेबसाईट लिंक वर क्लिक करा. पेज ओपन झाल्यावर तिथे Know Your Vehicle Details असा एक पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
  • गाडीचा इन्शुरन्स ऑनलाइन चेक करा
 • स्टेप 2: आपल्याला सर्वप्रथम Account create करावे लागते. एक विंडो येईल ज्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर टाकण्यासाठी एक बार दिसेल. त्यामध्ये आपला तो मोबाईल नंबर टाका जो गाडी रजिस्टर करताना दिला होता. आणि Next वर क्लिक करा.
  • गाडीचा इन्शुरन्स ऑनलाइन चेक करा
 • स्टेप 3: पुढच्या विंडोमध्ये आपला नंबर जर आधीपासून रजिस्टर असेल तर लॉगीन करावे लागते किवा नसेल तर Create Account वर क्लिक करा.
 • स्टेप 4: आपला मोबाईल नंबर आणि इमेल आयडी टाका आणि Generate OTP वर क्लिक करा. मोबाईल वर एस एम एस द्वारे एक OTP येईल. तो टाका.
  • गाडीचा इन्शुरन्स ऑनलाइन चेक करा 5
 • स्टेप 5: पुढील पेज वर उर्वरित माहिती भर जसे नाव, पासवर्ड आणि Create Account वर क्लिक करा. नंतर त्याच मोबाईल नंबर आणि पासवर्ड ने लॉगीन करायचे आहे.
 • स्टेप 6: लॉगीन केल्यानंतर Vahan Search वर क्लिक करा. येथे तुमच्या नावावर रजिस्टर असलेल्या वाहनाचा नंबर टाकायचा आहे. जसे MH12NM1234 याप्रकारे.
  • गाडीचा इन्शुरन्स ऑनलाइन चेक करा 5
 • Vahan Search वर क्लिक केल्यानंतर आपल्या वाहनाचे इन्शुरन्स डीटेल्स दिसतील.

इन्शुरन्स ऑनलाइन चेक करण्याचे इतर मार्क (Other ways to Check Vehicle Insurans Online)

अजून काही मार्गांनी गाडीच्या विमाबद्दल माहिती मिळेल. आपण इन्शुरन्स कंपनीच्या कस्टमर केअर ला संपर्क साधूनही आपल्या विमाचे डीटेल्स जाणून घेऊ शकता. कस्टमर केअर नंबर तुम्हाला गुगल सर्च करून मिळेल. RTO कार्यालयात जाऊनही आपल्याला माहिती मिळू शकते पण त्यापेक्षा ऑनलाइन इन्शुरन्स चेक करण्याचे मार्ग सोपे आहेत.

Comments (2) on "आपल्या गाडीचा इन्शुरन्स ऑनलाइन कसा चेक कराल (How to check vehicle insurance details online? 2022)"

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to Top
How to cure acidity at home? 5 acidity remedies at home…. Top protein rich veg foods must have at home Moringa powder powerful health benefits for males and females How breakfast habits linked to Mental health? प्रधानमंत्री आवास योजना शहरी (PMAY-U)