इलेक्ट्रिक बाईक आणि इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Bike or Electric Scooter) विक्री 240% टक्क्यांनी वाढली आहे. हे आकडे 2021 म्हणजे मागच्या वर्षातील आहेत. मागील वर्षामध्ये मध्ये इलेक्ट्रिक वाहन उद्योग हा 27 बिलियन डॉलर्स ची इंडस्ट्री होती आणि आता विक्री वाढत आहे त्यामुळे इलेक्ट्रिक वाहन इंडस्ट्री (EV industry) अजून मोठी होत आहे. इलेक्ट्रिक बाईक आणि स्कूटर ची मागणी वाढल्यामुळे हो वाढ होत आहे.
वर्तमानात इलेक्ट्रिक वाहनांचा वाढता ओढा
एका वेबसाईट सर्वे मध्ये लोकांना प्रश्न विचारण्यात आला होता की तुमच्याकडे इलेक्ट्रिक बाइक आहे का? किंवा तुम्ही इलेक्ट्रिक बाइक (Electric Bike)घेणार आहात का? तर त्यामध्ये 85% लोकांनी हो असे उत्तर दिले आहे की, “हो, मी इलेक्ट्रिक बाईक घेणार आहे किंवा इलेक्ट्रिक स्कूटर घेणार आहे” आणि उरल्या 15 टक्के लोकांनी उत्तर दिले की “मी आत्ताच इलेक्ट्रिक बाईक घेणार नाही.” असे उत्तर दिले आहे. तर यावरून समजते की भारतीय लोक इलेक्ट्रिक दुचाकी घेण्यास उत्सुक आहेत आणि याचे मुख्य कारण आहे पेट्रोलच्या वाढत्या किमती आणि इलेक्ट्रिक वाहनांचे पेट्रोल आणि डीझेल वाहनांपेक्षा असणारे फायदे (Advantages of electric vehicles).
सध्या मोठ्या शहरांमध्ये हिरो इलेक्ट्रिक बाईक, Revolt RV400, Bajaj Chetak, TVS iQube 2022, Hero Photon, Bounce Infinity E1, Simple One, Hero Eddy इत्यादी इलेक्ट्रिक बाईक आणि इलेक्ट्रिक स्कूटर उपलब्ध आहेत.
Table of Contents
इलेक्ट्रिक बाईक घेणे फायदेशीर आहे का? (Is electric bike good to buy? )
एक साधे गणित जर केले तर इलेक्ट्रिक बाईक (Electric Bike) आपले किती पैसे वाचवू शकते ते लक्षात येते. समजा आपण एखादी पेट्रोल बाईक वापरता आहात तिचे मायलेज एक लिटर पेट्रोल मध्ये 50 किलोमीटर आहे. एक लिटर पेट्रोल ला लागतात समजा 105 रुपये. आणि तोच विचार जर ई बाईक किंवा ई स्कूटर यांच्या बाबतीत केला तर एका चार्ज मध्ये वीज लागते 3 ते 4 युनिट. एक युनिट जास्तीत जास्त 8 रुपये मानुया. तरी आपल्याला 32 रुपये पडतात. सध्या उपलब्ध असलेल्या इलेक्ट्रिक बाईक ची रेंज असते 70 ते 120 किमी. म्हणजे 30 ते चाळीस रूपयात आपल्याला शंभर किलोमीटर मायलेज मिळते. आहे की नाही पैसे वाचविणारी गोष्ट.
इलेक्ट्रिक बाईक कशी काम करते (How does Electric bike works?)
इलेक्ट्रिक वाहनांचा उद्योग मोठा होण्याचे कारण म्हणजे पेट्रोल किंवा डिझेल वाहने जेवढे गुंतागुंतीचे डिझाईन (Complex Design) असलेले आहेत तेव्हढे इलेक्ट्रिक वाहने (Electric Vehicles- (Electric Bike)) यांचे डिझाईन तुलनेने साधे आहे त्यामुळे बाईक आणि कार मध्ये इतर सुविधा पुरवणे उत्पादकांना सोपे जाते. इलेक्ट्रिक बाईक मध्ये ऊर्जेचा स्रोत असतो लिथियम आयन बॅटरी (Lithium ion battery). चार्जिंग द्वारे वीज बॅटरी मध्ये साठवली जाते हे आपल्याला माहितीच आहे.
ही ऊर्जा मोटरला दिल्याने प्राप्त झालेली गती त्याच प्रकारे टायर्स ना दिले जाते जशी पेट्रोल गाड्यांमध्ये दिली जाते. फक्त फरक एवढाच असतो की त्यामधे आयसी इंजिन (Internal Combustion engine) असते आणि इकडे त्यासाठी इलेक्ट्रिक मोटर असते. पेट्रोल गाड्यांमध्ये ऊर्जा वहनासाठी चेन ड्राईव्ह किंवा चैन वापरली जाते आणि इलेक्ट्रिक बाईक किंवा स्कूटर मध्ये बेल्ट ड्राईव्ह वापरले जातात. हे जसे मोटर द्वारे पिठाची गिरणी मध्ये होते त्याच प्रकारे होते.
याच बॅटरी द्वारे वाहनाच्या सर्व सिस्टम कार्यरत केल्या जातात. जसे हेडलाईट, इंडिकेटर, रियर लाईट इत्यादी. बऱ्याच बाइक्स आणि स्कूटर्स मध्ये मोबाईल चार्जिंग ची सुविधा पण दिली जात आहे.इलेक्ट्रिक बाइक घेताना कोणत्या गोष्टी तपासाव्या (Electric bike buying guide in Marathi)इथे बरेच असे मुद्दे एकत्रित केले आहेत की जे वाचून तुम्हाला एक योग्य इलेक्ट्रिक बाइक निवडण्यासाठी मदत होईल.
इलेक्ट्रिक बाईक (Electric Bike)साठी उपलब्ध असलेले पर्याय
सध्या इलेक्ट्रिक दुचाकी दोनच पर्याय उपलब्ध आहेत. एक म्हणजे बाईक आणि स्कूटर. आणि त्यामधे प्रसिद्ध असलेले ब्रँड म्हणजे रिव्हॉल्ट (Revolt), हिरो इलेक्ट्रिक, बजाज, अथर ( Ather), ओला इलेक्ट्रिक (Ola Electric) इत्यादी. त्यात लोकांमधे रिव्हॉल्ट बाईक, ओला स्कूटर, बजाज चेतक स्कूटर या दिसत आहेत. यात रिव्हॉल्ट या कंपनीने चांगल्या सुविधा असलेली बाईक आणली आहे ती म्हणजे Revolt RV400.
ब्रँड किंवा उत्पादक कंपनी (Electric vehicles brands)
बरेचसे नवीन ब्रँड या क्षेत्रात निर्माण होत आहेत. पण काही जुने ब्रँड पण इलेक्ट्रिक वाहन (electric vehicles 2022) क्षेत्रात आपली उत्पादने आणत आहेत. नावाजलेले ब्रँड आहेत जसे हिरो इलेक्ट्रिक आणि बजाज यांना लोक जास्त प्राधान्य देतील. पण रिव्हॉल्ट सारखी नवीन कंपनी पण उत्तम बाईक आणत असल्यामुळे सगळ्या फीचर चा अभ्यास करून इलेक्ट्रिक बाईक (Electric Bike) घेणे फायद्याचे ठरेल.
बॅटरी संबंधी गोष्टी (Battery related things in e-bike)
इलेक्ट्रिक वाहनात बॅटरी हा ऊर्जेचा मुख्य स्त्रोत असल्यामुळे बॅटरीचा पूर्ण अभ्यास करून बाईक घ्यावी. कारण कमी जास्त असलेली गोष्ट नंतर त्रास देऊ शकते. बॅटरी कपॅसिटी किती आहे त्यावरून हे ठरवता येईल की गाडी किती अंतर तेवढ्या बॅटरी मध्ये पार करू शकते. हे अंतर कंपनीने दिलेले आणि एखाद्या खरेदी केलेल्या ग्राहकाने निरीक्षण केलेले नेहमी वेगळे असते. जसे की मायलेज कंपनीचे आणि वापरकर्त्यांचे वेगवेगळे येते तसेच. अशा बऱ्याच बॅटरी संबंधित गोष्टी पहाव्या लागतील त्या सर्व मुद्द्यांवर आपण स्वतंत्र चर्चा या Dongardarya.com वरील ब्लॉगमध्ये करणार आहोत.
बॅटरीचा प्रकार आणि क्षमता (Battery Capacity and type)
सध्या सगळ्या इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये लिथियम आयन बॅटरी पॅक असणार. लिथियम आयन बॅटरी मोठ्या काळात म्हणजे 5 वर्षापेक्षा जास्त काळामध्ये टिकाऊ सिद्ध झाल्या आहेत.
दूसरी गोष्टी म्हणजे ज्या इलेक्ट्रिक बाईक मध्ये बॅटरी असणार आहे त्यात ती काढून दुसरी टाकता येण्याजोगी (Removable battery) असणार आहे की कायम (non-removable) असणार आहे ते सर्वात आधी पहावे लागेल. जर रीपलेसेबल बॅटरी असेल तर ती काढून घरात चार्ज करता येईल. पार्किंग च्या जागी चार्जिंग लावण्यास सुविधा नसेल तर त्या ठिकाणी या गोष्टीचा फायदा होईल.
अजून एक गोष्ट म्हणजे जर त्या कंपनीची बॅटरी स्वापिंग सिस्टीम असेल तर डिस्चार्ज झालेली बॅटरी बदलून पूर्ण चार्ज असलेली बॅटरी टाकता येईल. या सुविधेचे अजून काही कमतरता मुद्दे आहेत ते पण लक्षात घ्यावे लागतील. ते आपण प्रत्येक बाईक ची माहिती देणाऱ्या ब्लॉग्ज मध्ये पाहणार आहोतच.
काही स्कूटर मध्ये दोन बॅटरी पण आहेत त्यातील एक फिक्स आणि दुसरी बदलता येण्यासारखी आहे जसे की सिंपल वन ची स्कूटर.
बॅटरीची वॉरंटी (Battery Warranty)
इलेक्ट्रिक बाईक घेताना बॅटरी वॉरंटी कशी आहे ही माहिती अवश्य घ्यावी लागेल. कारण लिथियम आयन बॅटरीची किंमत जास्त असते. जर वॉरंटी कमी असेल आणि त्यानंतर बॅटरी खराब झाली आणि बदलायची वेळ आली तर बँक अकाउंटला खड्डा पडू शकतो.
चार्जिंग साठी लागणारा वेळ आणि मिळणारी रेंज
किती किलोवॉट बॅटरी आहे त्यावर ती किती वेळात चार्ज होईल आणि त्यामधे किती रेंज मिळणार आहे हे पहावे लागेल. टू व्हीलर साठी हा वेळ 4 ते 5 तास असू शकतो. यामध्ये फास्ट चार्जिंग चार्जर असेल तर कमी होऊ शकतो.
हे ही वाचा – घरातील १० सर्वोत्तम शाकाहारी प्रोटीन (Protein ) संपन्न अन्नपदार्थ
बॅटरी लाईफ
लिथियम आयन बॅटरी (Lithium-ion battery rechargeable) पॅक इतर लेड असिड बॅटरी पॅक पेक्षा जास्त लाईफ असलेल्या आणि टिकाऊ सिद्ध झाल्या आहेत. त्यामुळे या लीथियम आयन प्रकारची बॅटरी आहे हे तपासून पुढे जावे.
स्पीड रेंज किलोमीटर आणि टॉप स्पीड (E bike range and top speed)
नवीन ज्यावेळी इलेक्ट्रिक स्कूटर आल्या होत्या तेव्हा अगदी कमी स्पीड असलेल्या होत्या. पण आता जास्त स्पीड असलेल्या पण आहेत. आपल्याला जर जास्त गतिमान बाईक किंवा स्कूटर हवी असेल तर कमाल स्पीड किती आहे ते पाहणे योग्य ठरेल. आता कमाल गती 100 km/hr असलेल्या स्कूटर आणि बाईक fastest e bike पण आल्या आहेत.
पुर्ण चार्ज नंतर मिळणारे मायलेज (How far can an electric bike go on a charge?)
बॅटरी फुल चार्ज असल्यानंतर बाईक किती किलोमीटर जाईल. आणि कोणता स्पीड मोड वापरल्यानंतर किती किलोमीटर जाऊ शकते याचा हे तपासावे. कारण आता इलेक्ट्रिक स्कूटर्स आणि बाइक्स वेगवेगळ्या स्पीड मोड सोबत येत आहेत. जे मोड आपण बाईक चालवताना बदलू शकतो
इलेक्ट्रिक बाईकची किंमत (Electric bike price in India, electric scooter price)
सगळ्यात महत्वाचा भाग असतो किंमत. आपण कोणत्या सुविधा असलेली बाईक घेतोय त्यावर किमती कमी जास्त होतात. कमी स्पीड असलेली बाईक किंवा स्कूटर असेल तर पन्नास हजार पासून किंमत चालू होते. पण जास्त स्पीड हवी असेल तर एक ते दोन लाख लागू शकतात.
देखभालीसाठी लागणारा खर्च (How much does it cost to service an electric bike?)
इलेक्ट्रिक बाईक आणि इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये हलणारे पार्ट कमी असतात त्यामुळे देखभाल खर्च (Electric bike maintainance cost) विष्यी जास्त विचार करायची आवश्यकता नाही.
बांधणीची गुणवत्ता (Build Quality – best built electric bike)
बांधणी कशी आहे हे पाहण्यासाठी निर्णय घेण्याआधी एक टेस्ट राईड घेऊन पहावी. कोणत्या सिस्टीम साठी कोणते मटेरियल वापरले आहे ते पहावे वाटल्यास सेल्स पर्सनला विचारावे.
चार्जिंग चे पर्याय (Electric bikes charging options in India)
गाडीला चार्जिंग चे पर्याय कोणकोणते आहेत ते पहावे. आता उपब्धते चार्जिंग चे पर्याय आहेत गाडीला चार्जर लावून चार्ज करणे, बॅटरी काढून घरात चार्जिंग करणे. काही ब्रँड पार्किंग मध्ये चार्जिंग ची सुविधा पण करून देतात. तर यापैकी काय काय उपलब्ध आहे ते पहावे. पार्किंग मध्ये आपण स्वतः एक बोर्ड बसवून चार्जिंग साठी वापरू शकतो.
चार्जिंग स्टेशन (Charging stations available in your area)
सध्या पुणे, मुंबई, बेंगळुरू, दिल्ली सारख्या मेट्रो सिटीमध्ये चार्जिंग स्टेशन मोठ्या प्रमाणावर तयार होत आहेत. आपण हे गुगल map वर सर्च करून पाहू शकता. त्यामुळे आपल्या लक्षात येईल कि चार्जिंग आपल्या भागात किती चार्जिंग स्टेशन्स (Electric bike charging stations)आहेत. इलेक्ट्रिक बाइक शोरूम पण ठीकठिकाणी उभारले जात आहेत.
इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी वर शासनाचे अनुदान (Government Subsidy for Electric bike)
केंद्र आणि राज्य सरकार कडून इलेक्ट्रिक वेहिकल निर्मिती आणि वापरासाठी प्रोत्साहन जात आहे. जर तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटर किंवा बाईक घेण्याचा इच्छित असाल तर किंमत पहा. त्यासोबतच त्यावर किती FAME I आणि FAME II सबसिडी दिली जात आहे हे देखील जाणून घ्या. त्यामुळे तुम्ही घेत असलेली इलेक्ट्रिक बाइक ऑन रोड प्राइस कमी होईल. आणि ती कशी मिळेल याची विचारणा शोरुम किंवा त्या कंपनीच्या कस्टमर केअर ल संपर्क करून विचारून घ्यावे. सरकारी वेबसाईट वर पण माहिती उपलब्ध असेल. अधिक माहितीसाठी या लिंकवर जा.
Comments (4) on "इलेक्ट्रिक बाईक (Electric Bike – E-bike) बद्दल माहिती असायला हव्यात या सर्व गोष्टी (Everything you need to know before buying an Electric Bike or Electric Scooter 2022)"