Posted in: जीवनशैली (Lifestyle)

काय आहे ओपन AI चे चॅट जीपीटी आणि बिंग AI? आणि दैनंदिन जीवनात आपण Chat GPT चा उपयोग कसा करू शकतो 2023 (what is chat GPT and how to use capabilities of chat GPT in daily life)

चॅट जीपीटी म्हणजे नेमकं काय?

मित्रांनो आज आपण आजकाल आपण रोजच्या Chat GPT हे नाव सोशल मीडियावर पाहत असतो त्याबद्दल वाचत असतो आणि इतर लोकांबरोबर चर्चा मध्ये ते ऐकत असतो. चॅट जीपीटी हाय एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडल आहे जे Open AI या कंपनीने तयार केले आहे. हे ओपन AI चॅटबॉट म्हणूनही ओळखले जाते. चॅट जीपीटी यामध्ये आपण त्याला प्रश्न विचारू शकतो याची उत्तरे ते इंटरनेटवरचा सर्व डाटा, पुस्तके, वेबसाइट्स यावर उपलब्ध असलेल्या माहितीवरून परिणाम दर्शवते.

तर आजचा आपला विषय हाच आहे की आपण कसा चॅट जीपीटी चा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनातील समस्या सोडिण्यासाठी कसा करू शकतो. दैनंदिन जीवनात आपल्याला बऱ्याच विषयावर माहिती पाहिजे असते किंवा आपल्याला खूप प्रश्न पडतात ज्याची उत्तरे आपण चॅट जीपीटी कडून त्याला योग्य त्या कमांड देऊन मिळू शकतो. चला तर मग याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

Table of Contents

काय आहे Bing AI?

चॅट जीपीटी 4 हे मायक्रोसॉफ्ट ने दहा अब्ज डॉलर गुंतवणूक करून विकत घेतले आहे आणि आपल्या बिंग सर्च या ॲप मध्ये आणले आहे. ते बिंग सर्च या ॲप मध्ये साईन इन करून वापरता येईल.

दैनंदिन जीवनातील समस्या सोडवण्यासाठी चॅट जीपीटी चा प्रभावीपणे उपयोग

लेखन आणि संपादन मध्ये चॅट जीपीटी चा उपयोग

योग्य तो प्रश्न विचारून लेखन करण्यात उपयोग करता येतो. सर्व प्रकारच्या सामग्री आपण लिहू शकतो. लेखनामध्ये चॅट जी पी टी काय काय करू शकते याची यादी आपण करूया

 • चॅट जी पी टी प्रश्न विचारून एक ईमेल लिहून घेऊ शकतो
 • एखादा उतारा तुम्हाला हवा तसा संपादित करून घेऊ शकतो
 • एखाद्या सामग्रीचा ग्रामर आणि स्पेलिंग तपासण्यासाठी उपयोग करता येतो
 • मोठ्या उताराचा सारांश संपादित करून घेता येतो
 • एखादी एखादी माहिती तुम्हाला संक्षिप्त रूपात हवी असेल तर तो उतारा तुम्ही चॅट जीपीटीला देऊन त्यावर संक्षिप्त उतारा तयार करून घेऊ शकतो
 • एखाद्या विषयावरील निबंध लेखनासाठी सामग्री प्रश्न विचारून मिळवता येते
 • निबंध ही एखाद्या विषयावर निबंध ही आपण chat gpt कडून लिहून घेऊ शकतो

एखादी भाषा शिकण्यासाठी चॅट gpt चा उपयोग (Use ChatGPT for learning a foreign language)

नवीन भाषा शिकताना त्या भाषेतील शब्दांचे अर्थ, वाक्यात उपयोग, विविध वाक्यांचे भाषांतर, निबंध लेखन, उच्चार यासाठी प्रभावीपणे उपयोग करता येईल. एखाद्या विषयावरील संवाद जर हवा असेल तर तोही चॅट जीपीटी तुम्हाला तयार करून देईल त्यातून तुम्ही त्या भाषेतील संवाद वाचून आपले भाषा सामर्थ्य वाढवू शकता. हे खरंच भारी आहे!

रिसर्च किंवा संशोधनामध्ये चॅट जीपीटीचा उपयोग

संशोधन मे चॅट जीपीटी खूप मोठं काम करते आणि कामे सोपे ही करते. समजा एखाद्या विषयावर संशोधन करायचे आहे. तर तुम्ही सर्व उपलब्ध माहिती घेण्यासाठी यावर आपला प्रश्न टाकून माहिती मिळू शकता.

समजा तुम्हाला एका मोठ्या उताऱ्याचा सारांश लिहायचा आहे तर तुम्ही तो उताराच्या जीपीटी सर्च मध्ये टाकून सारांश लिहायला सांगू शकता मग तुम्हाला तयार करून देईल. पण तो एकदम मशीनच्या भाषेमध्ये असेल तो तुम्हाला स्वतःच्या भाषेमध्ये थोडेसे बदल करून आपल्या रिसर्चमध्ये वापरता येईल.

एखाद्या गोष्टीची सत्यता पडताळून पाहण्यासाठी चॅट जीपीटी चा उपयोग (ChatGPT Uses for Fact check)

यामध्ये सहजपणे तुम्ही चॅट जीपीटीला एखादी गोष्ट खरी आहे किंवा नाही हे विचारून पाहू शकता. पण चॅट जी पी टी हे फक्त इंटरनेटवरच्या माहितीच्या आधारे तुम्हाला परिणाम दर्शवते त्यामुळे निष्कर्षावर येण्याआधीआणखी स्रोत पडताळून पहावे लागतील. ही एक चाट जी पी टी मधली मर्यादा आहे.

संभाषण कौशल्य वाढवण्यासाठी चॅट जीपीटीचा उपयोग (ChatGPT helps in improving Communication skills)

आपण चॅट जी पी टी ला आपल्या कम्युनिकेशन स्किल्स अजून चांगल्या करण्यासाठी वापरू शकतो. जसे एखाद्या मुलाखती मध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचे उत्तर कसे द्यावे. एखादी गोष्ट इतर भाषेमध्ये कशी विचारावी किंवा बोलावी. एखादे संभाषण कसे करावे तसे प्रश्न विचारून आपण चड्डी काढून संभाषणातील परिणाम घेऊ शकतो.

कोणत्याही प्रश्नाचे पटकन उत्तर मिळवण्यासाठी चॅट जीपीटी चा उपयोग (Use Chat GPT to get quick answers)

ChatGPT वर प्रश्न कसा विचारावा? जसे आपण गुगल ला प्रश्न विचारतो आणि गुगलमध्ये आपल्याला एखाद्या वेबसाईटवर जाऊन ती माहिती मिळवावी लागते पण त्यात थोडासा वेळ जास्त लागतोच. हेच काम आपण चॅट GPT काही क्षणात करू शकतो. जे आपल्याला प्रश्न पडतात ते सगळे चॅट जीपीटी मध्ये विचारावेटी लगेच तुम्हाला उपलब्ध डाटा वरून परिणाम देईल

विविध विषयात वैयक्तिक सल्लागार म्हणून उपयोग (ChatGPT as a personal assistant)

समजा तुम्हाला एखाद्या विशिष्ट विषयावर सल्ला हवा असेल जसे “what are the some best Sci-Fi books to read?” “What are some Bollywood horror movies in 2020?” तर मग चॅट जी पी टी यावर विविध पुस्तकांचे नाव चित्रपटच्या नावांचे परिणाम दर्शवेल.

आरोग्य आणि व्यायाम यामधे वैयक्तिक प्रशिक्षक म्हणून उपयोग (Chat GPT as a personal trainer)

आजकाल लोकांचा आरोग्य जपण्याकडे आणि फिट राहण्याकडे कल वाढत आहे. त्यासाठी योग्य प्रशिक्षण घ्यावे लागते. फिटनेस ट्रेनर लागतो. जो आपण बाहेर शोधायला गेलो तर त्याची फिस द्यावी लागते. चॅट जी पी टी हे काम अगदी सहजपणे करून देते.

यासाठी आपले आरोग्याचे धेय्य (fitness goal) जसे वजन कमी करणे, शरीरसौष्ठव बनवणे असे ठरवून त्याबद्दल योग्य प्रश्न विचारावे लागतील. ते म्हणजे वजन कमी करण्यासाठी कोणते व्यायाम करावे. आहार कसा घ्यावा. त्यात जर प्लॅन हवा म्हणून प्रश्न केला तर तुम्हाला डाएट प्लॅन, फिटनेस प्लॅन पण मिळेल.

हेही वाचा: काय आहे अमेझॉन किंडल आणि त्याचे उपयोग?

ChatGPT ऑनलाइन मोफत आहे का?

हो. मोफत उपलब्ध आहे यासाठी तुम्हाला ईमेल वापरून साइन अप करावे लागेल.

Chatgpt चा वापर कसा करू शकतो?

साइन अप केल्यानंतर तुमचे अकाउंट व्हेरिफाय होईल. त्यानंतर या ब्लॉगमध्ये सविस्तर सांगितल्याप्रमाणे तुम्ही चॅट जीपीटीचा वापर करू शकता.

ChatGPT चे मोबाईल ॲप उपलब्ध आहे का?

चॅट जीपीटीचे मोबाईल ॲप उपलब्ध नाही. क्रोम ब्राउजर मध्ये साईन इन् करून वापरता येते.
आता ChatGPT 4 मायक्रोसॉफ्ट ने विकत घेतले आहे. आणि ते आपल्या बिंग सर्च ॲप मध्ये आणले आहे. बिंग सर्च हे ॲप स्टोअर्स मध्ये उपलब्ध आहे. त्यावर आपण बिंग ai मध्ये chatGPT वापरू शकतो. त्यासाठी मायक्रोसॉफ्ट एज हे ब्राउजर ॲप पण घ्यावे लागते.

मी मोबाईलवर ChatGPT वापरू शकतो/शकते का?

हो मोबाईल वर वेब ब्राउजर मध्ये लॉगिन करून चॅट जीपीटी वापरता येईल

चॅट जीपीटी आणि Bing AI मध्ये काय फरक आहे

चॅट जीपिटी मध्ये फक्त 2021 आधीच्या माहितीवर आधारित परिणाम मिळतील. आणि बिंग एआय मध्ये सर्वात अलीकडील परिणाम मिळतील. बिंग ए आय सरस ठरते

ओपन AI चॅट जीपीटी वापरण्याचे फायदे

 • 24 तास उपलब्ध आहे.
 • आपला खूप वेळ वाचवते
 • लेखनकौशल्य, संभाषणकौशल्य, भाषा कौशल्य वाढवते.
 • बऱ्याच प्रकारच्या अडचणी सोडवण्यास पटकन मदत करते
 • ज्या लोकांना मोबाईल वापरणे अवघड जाते त्यांच्यासाठी खूप सोयीचे आहे
 • ओपन AI चे API (Application programming interface) वापरून खूप वैयक्तिक आणि व्यासायिक गोष्टींमधे पुरेपूर उपयोग करून वेळ वाचवता येतो.

चॅट जी पी टी मध्ये असलेल्या मर्यादा

 • चॅट जीपीटी सध्या फक्त 2021 च्या आधी उपलब्ध असलेल्या इंटरनेटवरचा डाटा अनालाईज करून परिणाम देते
 • कधी कधी हे टूल चुकीची माहिती देऊ शकते.
 • 2021 नंतर घडलेल्या घडामोडींची माहिती सोडून त्या आधीच्या माहिती वर परिणाम देते
 • इंग्रजी सोडून इतर भाषांमध्ये योग्य परिणाम देण्यासाठी अजून ट्रेन झालेले नाही त्यामुळे मराठीत येणारे परिणाम बऱ्याच वेळा योग्य नसतात.

तर मित्रांनो चॅट जी पी टी हे खूप उपयोगी असे टूल आहे जे वापरून आपण आपल्या दैनंदिन जीवनातल्या समस्या अगदी सहजपणे सोडून आपली उत्पादकता वाढू शकतो किंवा आपल्या व्यवसायाची कंपनीची उत्पादकता देखील वाढवू शकतो आजच्या काळात या तंत्रज्ञानाचा प्रत्येकाने उपयोग करावा असे तंत्रज्ञान आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to Top