Thoughts -From-Chanakya-Neeti-marathi
Posted in: जीवनशैली (Lifestyle)

‘ चाणक्य नीती ‘ एक अभिनव मार्गदर्शन – चाणक्य नीती सुविचार (Thoughts From Chanakya Neeti) -1

नमस्कार मित्रांनो. ‘ चाणक्य नीती ‘ बद्दल आपण सर्व काही ना काही वाचत असतो. ‘आर्य चाणक्य ‘ हे सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांच्या दरबारातील राजगुरू होते. त्यांनी लिहिलेला ‘ चाणक्य नीती ‘ हा ग्रंथ जगात प्रसिद्ध आहे. नितीशास्त्रावरील हा ग्रंथ किंवा असे म्हणले तरी अतिशयोक्ति ठरणार नाही की पाटलिपुत्र राज्याचा सम्राटपद चंद्रगुप्त मौर्य यांना विष्णुगुप्त किंवा आर्य चाणक्य यांच्या कृपेने मिळाले होते. चाणक्य ही नीतिशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयातील प्रकांडपंडित होते. ते एक महान कुटनीतिज्ञ होते. कूटनीती ही कोणतेही साम्राज्य किंवा देशावर राज्य करण्यासाठी अत्यावश्यक असते. सम्राट चंद्रगुप्त मौर्यांचा एक सामान्य सैनिक ते सम्राट हा प्रवास केवळ चाणक्य यांच्यामुळे शक्य झाला. अर्थात चंद्रगुप्त ही त्यायोग्य होते म्हणून चाणक्यांनी त्यांची निवड केली असावी. चाणक्यांचे लेखन ‘चाणक्य नीती’ म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांचे लेखन एक अभिनव मार्गदर्शन आहे.

चाणक्य यांचे लेखन

चाणक्यांनी लिहिलेले ‘कौटलीय अर्थशास्त्र’ हा ग्रंथ भारतासह अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांसाठी मार्गदर्शक म्हणून वापरला जातो. ‘ चाणक्य नीती ‘ वाचून आपण सांसारिक जीवनातील महत्वपूर्ण कार्य सफलतापूर्वक करू शकतो. अनेक भाषांमध्ये या ग्रंथाचे भाषांतर झालेले आहे. चला तर पाहूया ‘ चाणक्य नीती ‘ मधील काही महत्वपूर्ण वचने..

आर्थिक नियोजन यावर चाणक्यांचे मार्गदर्शन

चाणक्य म्हणतात की संकटकाळी किंवा आपत्तिकाळात उपयोग करण्यासाठी धनाची म्हणजे पैशांची व्यवस्था केली पाहिजे. कारण ज्यांच्याकडे धन आहे त्यांच्यासाठी आशा संकटांना तोंड देणे कठीण नसते.

आज आपण पाहतो आहोत कोरोना विषाणू मुळे सगळ्या जगावर संकट आलेले आहे. बऱ्याच लोकांच्या आर्थिक उत्पन्नावर त्याचे परिणाम झालेले आहेत. या संकटकाळी वापरण्यासाथी जर धन बाजूला ज्यांनी काढून ठेवले असेल त्यांना त्याचा फायदा होत आहे. आजच्या ‘पर्सनल फायनान्स’ मध्ये यापद्धतीने साठवलेल्या पैशांना ‘Emergency fund’ अशी संज्ञा आहे.

सतत उद्योगी किंवा काम करणारा व्यक्ति कधी दरिद्री होत नाही.

जो देवाचे नाव घेत राहतो त्याची पापे धुतली जातात.

मौन राहिल्याने भांडण तंटे होत नाहीत.

आणि जो व्यक्ति सतर्क राहतो त्याला कोणत्याही प्रकारचे भय नसते.

लोकांकडून काम कसे करून घ्यावे

चाणक्यांनी ‘ चाणक्य नीती ‘ मध्ये व्यक्ति व्यवस्थापन या विषयांबद्दलही सांगितले आहे. प्रत्येक व्यक्तीला आपले कार्य पूर्ण करण्यासाठी इतर लोकांकडून मदत घ्यावी लागते. लोभी व्यक्तीला जर ध्यान दिले तर त्याला वश करता येते. स्वाभिमानी व्यक्तीसमोर हात जोडून आपला कार्यभाग साधता येतो. सर्वात महत्वाचे म्हणजे मूर्ख व्यक्तीकडून आपले काम करून घ्यायचे असेल तर त्या व्यक्तीच्या ईच्छेनुसार कार्य करावे लागते. आणि विद्वान मनुष्याला खरे बोलून वश करता येते.

चाणक्यांच्या मते या गोष्टी कोणालाही सांगू नयेत

बुद्धिमान व्यक्तिने कधीही कोणाला सांगू नयेत आशा बऱ्याच गोष्टी आर्य चाणक्यांनी सांगितल्या आहेत. ते म्हणतात की जर व्यक्तीला कोणत्याही प्रकारे धन नष्ट झाले असेल किंवा कुठे पैशाचे नुकसान झाले असेल तर अगदी कोणालाही सांगू नये.

आपल्या मनात कशाचे दुःख असेल, तुमच्या घरात काही त्रुटि, कमतरता असतील, कुणाकडून फसवणूक झाली असेल आणि कुठे आपला अपमान झाला असेल तर ह्या गोष्टी कुणालाही सांगू नयेत. कारण ह्या गोष्टी सांगून तुम्हाला काहीही लाभ होणार नाही. ह्या गोष्टीचा उपयोग लोक आपल्या पाठीमागे आपल्यावर हसण्यासाठी करतात.

हे पण वाचा: मुलगी पाहायला गेल्यावर विचारा हे प्रश्न

नाती जपण्याबद्दल चाणक्य वचने

ज्या लोकांवर म्हणजे जवळच्या लोकांवर तुम्ही प्रेम करता त्यांच्या मनाला दुखवू नका. करण जर ते तुमच्याकडून दुःखी जरी झाले तर तुम्हाला दुःखी तर करणार नाहीत पण कायमचे सोडून जाऊ शकतात. नातेसंबंध बलवान करण्यासाठी ही ‘ चाणक्य नीती ‘ मध्ये भरपूर वचने आहेत.

मलाच सगळे कळते मलाच सगळं माहीत आहे असे मी मी करणारे लोक विहिरीतल्या बेडकाप्रमणे असतात. ज्याला विहिरीबाहेरच काही माहिती नसतं. आणि ती विहिरीच जग आहे असत वाटत.

नाते कधीही तोडले नाही पाहिजे. पण जिथे नात्याची कदर होत नाही तिथे निभावायचेही नसते.

जर काही चुकीचे घडले आणि तुमचे मन तुटत असेल तर कोणाला समजू देऊ नका की तुम्ही आतून तुटला आहात.कारण तुटलेल्या घराच्या विटा सुद्धा लोक उचलून नेतात.

चाणक्य म्हणतात की शक्तिशाली लोकांसाठी कोणतेही कार्य कठीण नसते. व्यापाऱ्यांसाठी कोणतेही स्थान दूर नसते. व्यापारी व्यापारासाठी जगभर प्रवास करू शकतात. सुशिक्षित व्यक्तींसाठी कोणताही देश विदेश नसतो आणि जी व्यक्ति माधुरभाषी म्हणजे गोड बोलणारी आहे त्या व्यक्तीसाठी कोणीही परके नसते. आपल्याला वाचल्यावर लगेच समजते की चाणक्यांना समाजातील छोट्या छोट्या गोष्टींबद्दलही किती अचूक ज्ञान होते. ते त्यांनी ‘ चाणक्य नीती ‘ मध्ये भविष्यातील लोकांसाठी लिहून ठेवले आहे. आपण त्यांची नीती वचणे आत्मसात करून स्वतःच्या आयुष्यात त्यांचा वापर करू शकतो.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to Top