वधू वरांसाठी मराठी उखाणे
पत्रिका योग जुळून आला जुळून राव पती मिळाले भाग्य थोर म्हणून
आई-वडिलांच्या आशीर्वादाने याला भाग्याचा दिवस राव पती मिळाले म्हणून कुलदेवतेला केला नवस
आकाशात चमकतो तारा अंगठीत चमकतो हिरा,——राव पती मिळाले हाच भाग्योदय खरा
सोन्याच्या साखळीत खुलतात काळे मणी ——राव झाले माझ्या सौभाग्याचे धनी
गरिबीची करून आनंदा श्रीमंतीचा करणे करता __रावांच्या नावांमध्ये अर्पिले जीवन सर्व
मनोभावे प्रार्थना करून पूजला गौरीहर __रावांच्या सहवास लाभो जन्मभर
उंबरठ्यावरचे माप पायाने लोटते —-राव यांच्या घरात भाग्य आणि प्रवेश करते
थोरकुळात जन्मले सुसंस्कारात वाढले ___रावांच्या जीवावर भाग्यशाली झाले
दाराच्या चौकाटीला गणपतीचे चित्र __रावांच्या मुळे मिळाले सौभाग्याचे प्रमाणपत्र
अंबाबाईच्या देवळासमोर हळदी कुंकवाचा सडा __रावांच्या नावावर भरते लग्नचा चुडा
जीवनात ही गाडी अशीच राहू दे—- रावांची प्रीती फुल असेच असू दे
वृंदावनी कोणी बाई तुळस लावली —-रावांच्या संसारात आहे शितल सावली
निळ्या नभावर असे कर्तुत्वाचा रुपेरी ठसा —–रावांसह करीत आहे संसाराचा श्री गणेशा
पूजेच्या साहित्यात उदबत्तीचा पुडा ___रावांच्या नावाने भरला सौभाग्याचा चुडा
राम लक्ष्मणाची जोडी अमर झाली जगात __रावांचे नाव घेते —-च्या घरात
आत्मरूपी करंडा देहरूपी झाकण __रावांचे नाव घेऊन बांधते मी कंकण
देवासमोर काढले रांगोळी मोराची __रावांचे नाव घेते स्नुषा थोराची
लावीत हिते कुंकू त्यात सापडला मोती, —-राव पती म्हणून मिळाले भाग्य मानू किती
सत्यभामाने श्रीकृष्णाची केली सुवर्णतुला ___रावांचे नाव घेते आशीर्वाद द्यावा मला
पूजेच्या साहित्यातून अगरबत्त्तीचा पुडा __रावांच्या नावाने भरला सौभाग्याचा घडा
छत्रपती शिवरायांसारखा पुत्र, धन्य जिजाउंची ची कुशी, —— रावांचं नाव घेते लग्नाच्या दिवशी
मला नको हिरे मानके, नको आकाशातले तारे, —–राव हेच माझे अलंकार खरे
समुद्राला कोणी म्हणे सागर कुणी म्हणे रत्नाकर,—– राव आहेत माझे जन्मोजन्मीचे प्रियकर
कोजागिरी पौर्णिमेचा चंद्र आणि शरदाचे चांदणे, आमचे —–राव आहेत सर्वामध्ये देखणे
आनंदाने भरला दिन हा लग्नाचा,—–रावांना घास घालते गोड जिलेबीचा
गोपाळ कृष्णाला आहे बासरीचा छंद ___रावांच्या जीवनात मलाही आनंद
कात,चुना, लवंग, पानाचा विडा —–रावांच्या नावावर भरते लग्नाचा चुडा
रजनीचे भांडार शांततेच्या दारी खुलेश, माझे मानस मंदिर —रावांनी जिंकले
राम लक्ष्मण सीता तीन मूर्ती साक्षात __रावांचे नाव घेते नीट ठेवा लक्षात
कमलांच्या फुलांचा हार लक्ष्मीच्या गळ्यात रावांचं नाव घेते सुवासिनीच्या मेळ्यात
अश्रू पूर्ण डोळ्यांनी माहेरचा निरोप घेते___रावांच्या बरोबर मी गृहप्रवेश करते
यज्ञ धर्म कीर्ती ऐश्वर्य आणि संपत्ती __रावांचे नाव हेच माझ्या मनाची तृप्ती
पाण्याने भरला कलश त्यावर आंब्याची पाने फुले __रावांचे नाव घेतल्यावर चेहरा माझा खुले
नव्या दिशा नव्या अशा नव्या घरी पदार्पण __ रावांच्या जीवनात माझे सर्वस्व अर्पण
पौर्णिमेच्या चंद्राची उज्वल प्रभा —-राव हेच माझ्या सौभाग्याची शोभा
विवाहाच्या सोहळ्यात अत्तर गुलाबाचा थाट __रावांचे नाव घेऊन सोडते भाऊ भावजयीची गाठ
दशरथ राजाने पुत्रासाठी केला नवस —— रावांचं नाव घेते हळदी कुंकवाचा दिवस
बालपण गेले माता-पिताच्या पंखाखाली, तारुणाच्या वाटेवर मिळाली मैत्रीची साथ, संसाराच्या वेळेला मिळाला ___रावांचा प्रेमळ हात
नाही मोठेपणाची अपेक्षा नाही दौलतीची इच्छा __रावांच्या संसारी आपणा सर्वांच्या शुभेच्छा
डोंगरदऱ्या मध्ये तरुण लता वेली __रावांनी दिली गुलाबाची मोहक कळी
अजून अशाच सुंदर उखाण्यांसाठी या लिंक वर क्लिक करा – मराठी उखाणे
Comment (1) on "नववधू आणि सौभाग्यवती साठी मराठी उखाणे (Marathi Ukhane)"