Posted in: जीवनशैली (Lifestyle)

सिनौली (Secrets of Sinauli) या उत्तर प्रदेशातील गावात पुरातत्व उत्खननात सापडलेल्या गोष्टीमुळे उलगडणार आहेत नवीन प्राचीन रहस्य -Sinauli discovary, Uttar Pradesh village Archaeological Site Excavations Ancient India History Secrets of Sinauli- 2021

Secrets of Sinauli

नमस्कार मित्रांनो. काही दिवसांपूर्वी डिस्कवरी चानल पाहताना एक जाहिरात पाहण्यात आली. ‘सिक्रेट्स ऑफ सिनौली’ ‘Secrets of Sinauli’ अस नाव होतं. एक डिस्कवरीने केलेल्या एका डॉक्युमेंटरीची जाहिरात होती. जी फक्त Discovery Plus या डिस्कवरीच्या app वर होती. आपण उत्पखननात हडप्पा, मोहनजोदारो, ढोलवीरा येथे अवशेष सापडलेले शाळेत असताना किवा इतर ठिकाणी वाचलेले होते. म्हणजे त्याबद्दल माहिती होती. पण सिनौली हे नाव पहिल्यांदाच ऐकल्यासारखे वाटत होते. आधी कधी उल्लेखही कुठ आढळला नव्हता.

आणि ‘Secrets of Sinauli‘ या डॉक्युमेंटरीच्या ट्रेलर मध्ये मनोज वाजपेयी (Manoj Vajpayee) हा शो होस्ट करणार आहेत असे कळले. ‘The Family Man’ हि वेब सिरीज आणि अनेक चित्रपट जसे सत्यमेव जयते, नाम शबाना, आय्यारी, गंग्स ऑफ वासेपूर या मध्ये मनोज वाजपेयींनी उत्कृष्ट अभिनय केला आहे. आणि ते हा शो होस्ट करणार आणि म्हणल्यावर नक्कीच चांगला असणार असे वाटले. मग सिनौली हे नाव सर्च केले तर येथे इतिहास उलगडनार्या रहस्यमय गोष्टी उत्खननात सापडल्या आहेत असे वाचनात आले. खरंच कुतूहल जागृत करणाऱ्या गोष्टी आहेत या. मग माहिती मिळवण्यास सुरुवात केली. ती मी या लेखात सादर केली आहे.

सिनौली मधील जे शोध (discovery of sinauli) आहेत ते खूप इतिहासातील पाने उलगडण्यासाठी खूप महत्वाचे आहेत. भारतात कुठल्याही पुरातत्त्व उत्खननात रथ सापडला नव्हता. सिनौली ही पहिलीच अशी पुरातत्त्व उत्खनन दृष्य आहे की जिथे रथ सापडला आहे. पुरातत्व शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत की या रथाचा चालक किंवा मालक कोण होता. ज्यामुळे इतिहासातील महत्वाच्या गोष्टी उलगडू शकतात. या रहस्यांमुळे प्राचीन भारताचा इतिहास बदलू शकतो. सिनौली ही पहिली भारतातील अशी जागा आहे जिथे तांब्याच्या वस्तू किंवा तांब्याचे फलक (Copper hoards) सापडले आहेत.

सिनौली येथे 2005 साली 116 ऐतिहासिक अंतेष्टी स्थळे burial sites सापडले आहेत. जे प्राचीन भारतीय संस्कृती आणि सभ्यता यांनी भरलेले आहेत. सिनौली उत्खननाची एक वेगळी कथा आहे. सिनौली हा उत्तर प्रदेशातील, बागपत जिल्यातील गाव आहे. दिल्लीपासून सिनौली 67 किलोमीटरवर आहे. या भागात उत्खनन करण्याआधी शेती केली जात होती. ज्या शेतकऱ्यांचे हे शेत होते ते आपल्या शेताची लेव्हलिंग करत होते. लेव्हलिंग साठी शेत शेत खोदताना शेतकऱ्यांना तांब्याचे भांडे, हाडांचे सापळे, स्त्रियांचे दागिने सारख्या दिसणारे सोन्याचे आणि इतर तांब्याच्या वस्तू जसे की तांब्याचे फलक copper hoards सापडल्या होत्या. Secrets of Sinauli या शो मध्ये याची माहिती दिली आहे.

ज्यां शेतकऱ्यांना या वस्तू सापडल्या त्याना वाटलं की आपल्याला खजिना सापडला आहे आपण मालामाल झालो. ही गोष्ट वनव्यासारखी गावात पसरली. त्यांना वाटले हे सर्व आपल्या शेतात सापडले म्हणजे हे आपले झाले. ते सामान ते शेतकरी घरी घेऊन गेले. आणि शेतात खजिना आहे असे समजून सगळीकडे खोदणे चालू केले. ही गोष्ट प्रशासनापर्यंत जेव्हा पोहोचली तेव्हा त्यांनी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला (Archeological Survey of India or ASI) कळवले.

ASI ने त्वरित त्या जागेला सुरक्षित केले. आणि डॉ. डी व्ही शर्मा यांच्या नेतृत्वाखाली उत्खननाचे काम चालू झाले. ASI ला या ठिकाणी 116 अंतेष्टी स्थळे (Burials) उत्खननात सापडली. एवढी जास्त अंतेष्टी स्थळे किंवा समाधी याआधी कुठेही सापडलेली नव्हती. त्यामुळे या जागेला आशियातील सर्वात मोठी प्राचीन दफनभूमी (Largest Ancient Burial Site in Asia) मानले गेले.

या तांब्याच्या वस्तू सापडल्या त्या हडप्पा, मोहेंजोदारो, गंगा यमुना दोआब (Ganga-Yamuna Doab) येथे सापडलेल्या वस्तूंपेक्षा भिन्न होत्या. कारण सिनौली हा भाग पण गंगा यमुना दोअब चाच भाग आहे.

सिनौली इथे सापडलेल्या वस्तू इतक्या वेगळ्या आणि मग यानंतर शास्त्रज्ञांच्या मनात प्रश्न यायला चालू झाले. कि हे जे समाधी स्थळे आहेत त्यात जे लोक आहेत ते कोणत्या संस्कृतीचा भाग आहेत? हे कोण होते? कोणत्या काळातील होते? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पुन्हा २०१८ मध्ये उत्खनन केले गेले. Secrets of Sinauli

Horizontal digging technique चा वापरत करून डॉक्टर मंजूल यांनी उत्खनन केले. त्यात त्यांना एका विशिष्ट आकाराचे तांब्याचे तुकडे सापडले. त्यांना हि नेमकी कोणती वस्तू आहे हे समजले नाही. मग त्यांनी एक जिथे ते तुकडे सापडले तिथे मार्क करायला सुरुवात केली.

त्या मार्किंगने आयताकार घेतला. मग डॉ मंजुल यानु Vertical Digging Technique वापरायला सुरुवात केली. मग त्यांना हाडांचे सापळे मिळायला सुरुवात झाली. त्यात तीन वेगवेगळ्या शवपेट्या होत्या. एकमध्ये वस्तू होत्या. एकमध्ये हाडांचा सापळा होता. आणि तिसऱ्यामध्ये हाडांचे तुकडे होते.

येथे जया शवपेटया सापडल्या होत्या त्या पाहिल्यावर डॉ. मंजुल यांच्या मनात प्रश्न पडला कि एवढ्या वर्षांनंतरही या शवपेट्या जशास तशा का आहेत. Secrets of Sinauli उघड करण्यात त्रयांना खूप मेहनत घ्यावी लागली. लाकडी शवपेट्या विघटन होऊन मातीमध्ये बदलतात. पण या खाटेसारख्या दिसणाऱ्या शवपेट्या जाशात तशा आहेत. मग यांना तसेच राहण्याचे कारण काय असेल? तर या अन्तेष्टी स्थळासाठी वापरलेल्या शवपेटया सुद्धा वेगळ्या पद्धतीच्या होत्या. याच्या सगळ्या भागावर तांब्याच्या पत्र्याचा मुलामा होता. त्यामुळे यांच्या आकारामध्ये जास्त बदल झालेला नव्हता.

हे हि वाचा : मुंबईतल्या मरीन ड्राईव्ह वरील दिसणारे दगड टेट्रापोड्स अशा आकाराचे का आहेत?

एका अशीही जागाही सापडली कि ज्यात विटांच्या भिंती होत्या. यात ज्या विटा सापडल्या त्यांची तुलना हडप्पा येथील विटांशी शास्त्रज्ञांनी करून पाहिली. तर हडप्पा मधल्या विटांचा आकार सिनौली मधल्या विटा पेक्षा भिन्न होता. त्यावरून सिनौली येथे हडप्पा पेक्षा वेगळी संस्कृती नांदत होती असा निष्कर्ष काढण्यात आला. आणि हे जे विटांचे बांधकाम होते ते अंत्यसंस्कार करण्याचे ठिकाण असावे असा शास्त्राज्ञांचा कयास आहे.

एका समाधीमध्ये त्यांना भांडे, C आकाराच्या तांब्याच्या नळ्या (copper channels), आणि तलवारी (Antenna swords) सापडल्या. त्यात एक तलवारीची मुठहि होती. या मुठी इतक्या वर्षांनंतरही त्यांच्या योग्य आकारात राहण्याचे कारण म्हणजे या मुठींवर तांब्याच्या तारा गुंडाळलेल्या होत्या. या उत्कृष्ट आणि युद्धामध्ये शत्रूला घातक ठरणारी डिझाईन असलेल्या तलवारी हे दर्शवतात कि हे जे अन्तेष्टी स्थळे आहेत ती योध्यांची आहेत. आणि या तलवारी योद्ध्यांच्या शौर्यगाथा सांगण्यासाठी तिथे ठेवल्या असाव्यात. Secrets of Sinauli या कार्यक्रमात खूप विस्तृत चर्चा केली आहे.

या उत्खनन साईट वर तीन स्त्रियांचीही अन्तेष्टी स्थळे सापडले आहेत. आणि त्यातही तलवारी सापडल्या आहेत. म्हणजे या स्त्रियापण योद्धा होत्या हे समजते. यांच्या हाडांमधून DNA घेतला गेला आणि त्याची टेस्ट. केली गेली तर जया स्त्री ची ही हाडे होती टी स्त्री शारीरिक दृष्ट्या फिट होती. तिला कोणताही आजार नव्हता. आणि तो DNA भारतीय वंशाचाच आहे हे स्पष्ट झाले.

सिनौली येथील उत्खननात अजून एक उत्कृष्ट, अद्वितीय अशी गोष्ट सापडली आहे कि जी भारतात कुठल्याही उत्खननात आजपर्यंत सापडलेली नाही. ती म्हणजे रथ. आतापर्यंतच्या इतिहासात असे सांगितले गेले आहे कि जेव्हा आर्यन भारतात आले तर ते येताना रथ घेऊन आले. पण हा जो इतिहास आपण शिकलो आहोत ते अर्धवट आहे आणि सिनौली मध्ये सापडलेल्या रथामुळे तो खोटा ठरत आहे. शास्त्रज्ञांचे असे मत आहे कि आपल्याला आतापर्यंत इंग्रजांनी खोटा इतिहास सांगितला. आणि आपल्या पूर्वजांबद्दल या गोष्टी लपवून कल्पित गोष्टी इतिहास म्हणून सांगितल्या गेल्या.

हे रथ चालवण्यासाठी घोडे वापरले जात होते हे या रथांची डिझाईन सांगते. घोडा रथ या गोष्टी आर्य बाहेरून भारतात घेऊन आले हि इंग्रज इतिहासकारांनी मांडलेली थेरी यासमोर खोटी ठरते. हे रथ बनवताना लाकूड वापरले आणि यांना मजबूत करण्यासाठी जागोजागी तांबे या धातूचा वापर केलेला शास्त्रज्ञांना आढळला. या आधी मेसोपोटामिया आणि सुमेरिया येथेही रथ सापडले पण ते सिनौली येथे सापडलेल्या रथा इतके परिपूर्ण नाहीत. हा रथ दोन माणसांसाठी बनवला असावा. आणि तो वेगवेगळ्या उद्देशासाठी वापरला जात असावा. हा रथ वेदांमध्ये वर्णन केलेल्या रथाप्रमाणेच आहे असे शाश्त्रज्ञ सांगतात.

सिनौली मध्ये सापडलेली अजून एक आश्चर्य करणारी गोष्ट किवा कलाकृती म्हणजे ‘ढाल’. आधी शास्त्रज्ञाना एक आकार सापडला ज्याच त्यांनी CT स्कॅन केले. आणि त्यांना कळले कि हि एक ढाल आहे. आणि या ढालीची डिझाईन पण अद्वितीय आहे.

नऊ नंबरच्या शवपेटीच्या ठिकाणी शास्त्रज्ञांना एक धनुष्यबाण आणि काही बाण सापडले आहेत. म्हणजेच ही योद्धा स्त्री होती टी कुशल धनुर्धारी होती. म्हणजे प्राचीन भारतीय स्त्रिया परावलंबी नव्हत्या आणि मागासलेल्याही नव्हत्या. त्या स्वतःचे रक्षण स्वतः करू शकत होत्या. त्या तलवारबाजी आणि धनुर्विद्या मध्ये पारंगत होत्या. आणि त्या युद्धातही भाग घेत होत्या.

येथे सापडलेल्या तलवारी, ढाली, तांब्याच्या कलाकृती यावरून हे स्पष्ट होते कि हे लोक कुशल योद्धा होते. कौशल्यवान धातुतज्ञही होते. आणि यात स्त्रियाही योद्धा होत्या. यात एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आजपासून चार हजार वर्षांपूर्वी जे भारतात लोक होते त्यात स्त्रियाही योद्धा होत्या.

एक राजाची समाधी वाटावी असे बरीअल (Burial) सापडले आहे. ज्या शव पेटीवर मानव वंश शास्त्रीय (Anthropomorphic) आकार
सापडले आहेत. या शवपेटी जवळ दोन रथ तलवार, ढाल, मातीचे आणि तांब्याचे भांडे आणि एक छडीचे दोन्ही बाजुचे टोक वाटावे असे काहीतरी, या वस्तू सापडल्या आहेत. तो छडीसारखा दिसणारा राजदंड असावे असा कयास आहे. आणि या शव पेटीच्या आतल्या भागात काय आहे त्यावर शास्त्रज्ञ संशोधन करणार आहेत.

पुढेही करोनाचे संकट गेल्यावर या स्थळी अजून उत्खनन होईल. त्यावेळी जी रहस्ये उलगडणे बाकी आहे ती उलगडतील. आपली प्राचीन संस्कृती आणि लोक त्यांची जीवनशैली याबद्दल अनेक गोष्टी माहित होतील कि ज्या अजून रहस्यच आहेत. असे शास्त्रज्ञांचे मत आहे. धन्यवाद.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to Top
How to cure acidity at home? 5 acidity remedies at home…. Top protein rich veg foods must have at home Moringa powder powerful health benefits for males and females How breakfast habits linked to Mental health? प्रधानमंत्री आवास योजना शहरी (PMAY-U)