Kindle Unlimited, kindle store किंवा Amazon Kindle असा एक शब्द दिसतो ज्यावेळी आपण पुस्तकांची ॲमेझॉन वर खरेदी करण्यासाठी पाहत असतो. तर हे नेमके काय आहे आणि त्याचा वापर कसा करावा आणि त्याचे वाचकांसाठी काय उपयोग आहेत याबद्दल आपण सर्व माहिती या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.
काय आहे किंडले स्टोअर आणि किंडल अनलिमिटेड?
Amazon Kindle, Kindle Store, आणि kindle Unlimited ॲमेझॉन ची उत्पादने आहेत. अमेझॉन किंडल हे पुस्तक वाचण्यासाठी अमेझॉन ने तयार केलेले डिव्हाईस आहे. याला Kindle Ebook reader असेही म्हंटले जाते. तर किंडल स्टोर हे कींडल डिव्हाईस मध्ये किंवा Kindle Mobile app मध्ये पुस्तके विकत घेण्यासाठी स्टोअर आहे. जशी आपण इतर उत्पादने अमेझॉन वरून विकत घेतो तसेच पुस्तके या ॲप मध्ये किंवा किंडल डिव्हाईस किंवा किंडल ई बुक रीडर मध्ये ई बुक च्या स्वरूपात किंवा डिजिटल फॉरमॅट मध्ये घेऊ शकतो.
किंडल अनलिमिटेड सबस्क्रिप्शन कसे असते
किंडल अनलिमिटेड ही एक अमेझॉन ने वाचकांसाठी उपलब्ध करून सबस्क्रिप्शन सेवा आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर ही एक प्रकारची डिजिटल लायब्ररी आहे. आता आपण जेव्हा कॉलेजच्या किंवा आपल्या गावातील ग्रंथालयात एक शुल्क देऊन सदस्य होतो आणि पुस्तके घेतो, वाचतो आणि परत करतो. परत करून दुसरे पुस्तक घेऊ शकतो. त्याच प्रकारे किंडल अनलिमिटेड काम करते. यामधे 169 रुपये मासिक किंवा आपल्या इच्छप्रमाणे सहामाही किंवा वार्षिक सदस्यत्व घेऊ शकतो. या सदस्यत्वा प्रमाणे आपण ₹0 Kindle Unlimited असा ऑप्शन ज्या पुस्तकांना आहे ते आपण डाऊनलोड करून वाचु शकतो. अशी एका वेळी वीस पुस्तके घेऊन ठेवता येतात.
किंडल अनलिमिटेड हे ॲप काय आहे? त्याचा काय फायदा होतो?

एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे यासाठी आपल्याकडे किंडल रीडर असणे गरजेचे नाही. आपण ही पुस्तके किंडल मोबाईल ॲप मध्ये वाचू शकतो. डेस्कटॉप ॲप आहे त्यातही वाचता येतील. कॉम्पुटर ब्राउजर मध्ये पण Kindel Unlimited चे लॉगिन वापरून वाचता येतील. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जर आपल्याला किंडल सबस्क्रिप्शन ची गरज नसेल आणि एखादे पुस्तक वाचायचे असेल तर तेव्हढे पुस्तक आपण या ॲप मध्ये विकत घेऊन वाचू शकतो.
किंडल डिव्हाईस किंवा किंडल ई बुक रीडर
Kindle eBook reader हे उपकरण फक्त पुस्तके वाचण्यासाठी अमेझॉन द्वारे तयार करण्यात आलेले आहे. याचे वेगवेगळे फीचर असणारे डिव्हाईसेस आहेत जसे मोबाईल चे असतात. ते या अमेझॉन.कॉमच्या लिंकवर पाहता आणि विकत घेता येतील ….. . त्यामधे किमती आणि इतर सर्व माहिती आहे.

हे ही वाचा: ईलेक्ट्रिक बाईक आणि इलेक्ट्रिक स्कूटर बद्दल सतत विचारले जाणारे प्रश्न
किंडल ई रीडर मध्ये काय सुविधा आहेत?
हे पूर्णपणे kindle Unlimited ॲप सारखे चालते. याला वाय फाय आहे. त्यामुळे आपण पुस्तके डाऊनलोड करून वाचू शकतो. अजून एक गोष्ट म्हणजे जर आपल्याकडे काही पी डी एफ फाईल असेल जी किंडल स्टोअर किंवा अमेझॉन वर उपलब्ध नाही ती आपण यात टाकून वाचू शकतो.
किंडल एडिशन म्हणजे काय? (What is the meaning of Kindle edition in Marathi?)
Kindle edition हा अमेझॉनचा ई बुक फॉरमॅट आहे. म्हणजे जे पुस्तक आपण कींडल ॲप किंवा किंडल डिव्हाईस मध्ये घेऊन वाचतो ती किंडल एडिशन असते. म्हणजेच डिजिटल फॉरमॅट किंवा मोबाईल मध्ये वाचता येण्याजोगा फॉरमॅट.
ॲमेझॉन किंडल वर उपलब्ध असलेली मोफत आणि सशुल्क चांगली पुस्तके कोणती?
सगळी बेस्टसेलर पुस्तके, शालेय पुस्तके एकंदरीत सगळ्या प्रकारची पुस्तके अमेझॉन किंडल मध्ये उपलब्ध असतात. काही मराठी साने गुरुजींची पुस्तके मोफत आहेत.
अमेझॉन किंडल रीडर चे फायदे काय आहेत?
- हे ई बुक रीडर स्मार्टफोन किंवा टॅब च्या आकाराचे असते. पण वजनाला हलके असते. त्यामुळे कुठेही बॅगमध्ये नेता येते. बाहेरगावी आणि प्रवासात पुस्तके वाचण्यासाठी उत्तम पर्याय आहे
- हे डिव्हाईस नक्कीच उपयोगी आहे जर तुम्हाला वजनदार आणि आकाराला पुस्तकांचे ओझे वाटत असेल, मोठी पुस्तके घर सोडून दुसरीकडे नेण्यास अडचण होत असेल, तुम्ही डाय हार्ड वाचक आहात आणि प्रवासात किंवा रिकामा वेळ मिळेल तिथे वाचायची आवड असेल, तुमच्या अभ्यासाची पुस्तके जड आणि मोठी आहेत, वागवायला अडचण होत असेल.
- कितीही मोठी लहान पुस्तके यात एकावेळी ठेवता येतात. आणि आपण कुठेही गेलो तरी सोबत राहतात. सगळ्यांना नसेल पण सतत वाचनाची आवड असणाऱ्या व्यक्तीसाठी ही पर्वणी आहे.
- जी पुस्तके किंडल मोबाईल ॲप मध्ये असतील तीच किंडल रीडर मध्ये असतात. मोबाईल हॉटस्पॉट किंवा वाय फाय जोडून डाऊनलोड करता येतात.
- kindle Unlimited सबस्क्रिप्शन असेल तर त्यातून एका वेळी 20 पुस्तके 169 महिना फी देऊन घेऊ शकता. हे कधीही बंद करता येते. पाहिला महिना फ्री असते. सगळ्या अटी वाचून उत्पादन घ्यावे.
- किवा उत्पादन घेण्याऐवजी एखादे पुस्तक घ्यायचे असेल तरी घेता येते. ते कायम आपल्या लॉगीन वर उपलब्ध असते.
किंडल बद्दल इतर प्रश्न आणि उत्तरे
किंडल सबस्क्रिप्शन ची मासिक फी किती आहे? (Is there a monthly fee for Kindle subscription?)
हे सबस्क्रिप्शन 1-महिना – Rs 169, 6-महिने – Rs 999, आणि 12-महिने – Rs 1,799 योजनांमध्ये उपलब्ध आहे.
किंडल रीडर किती दिवस टिकते? (How long does a Kindle last?)
पाच ते सहा वर्षे. जर वापर चांगला केला तर त्यापेक्षा जास्त टिकू शकते.
किंडल रीडर ची किंमत किती आहे? (How much does Amazon Kindle cost?)
खालील लिंक वर जाऊन आजची किंमत पाहू शकता
Kindle (10th Gen), 6″ Display with Built-in Light, WiFi (Black)
All-new Kindle Paperwhite (8 GB) – Now with a 6.8″ display and adjustable warm light
Kindle Paperwhite 4G LTE (10th gen) – 6″ High Resolution Display with Built-in Light, 32GB, Waterproof, WiFi + Free 4G LTE
Kindle Oasis (10th Gen) – Now with adjustable warm light, 7″ Display, 8 GB, WiFi (Graphite)
किंडल अनलिमिटेड Amazon Prime Member साठी मोफत आहे का? (Is Kindle Unlimited free for Prime members?)
नाही.
Comment (1) on "काय आहे Amazon Kindle आणि त्याचे उपयोग याबद्दल पूर्ण माहिती (What is Amazon Kindle and its benefits to readers 2022)"