gas-in-stomach-home-remedies
Posted in: आरोग्य टिप्स (Health tips), जीवनशैली (Lifestyle)

पोटात गॅस झालेला बाहेर पडण्यासाठी घरगुती उपाय ( 5 Best home remedies hos to remove gas from stomach instantly)

आज आपण माहिती घेणार आहोत पोटातील गॅस होणे यावर घरगुती उपाय. तसे तर काही उपाय सर्वांना माहिती असतीलच. पण अजून बरेच असे सोपे सोपे पोटात गॅस झाल्यावर करण्याचे उपाय आहेत जे या dongrdarya.com वरील ब्लॉग पोस्ट वरून तुम्हाला माहिती होतील. पोटात गॅस होणे हा रोजच्या जीवनातील साधारण समस्या आहे. कधीही काहीही जीवनशैली मध्ये झालेल्या बदलामुळे हा प्रॉब्लेम होऊ शकतो. पोटात गॅस होण्याला एखादा जड पदार्थ जास्त प्रमाणात खाणे, जंक फूड आणि मैदातुक्त पदार्थांचे जास्त खाणे इत्यादी गोष्टी कारणीभूत ठरू शकतात. ती सर्व कारणे आणि लक्षणे आपण सविस्तर पाहणार आहोत.

पोटात गॅस होण्याची कारणे (Causes of gas in stomach)

जास्त प्रमाणात जंक फूड खाल्ल्यामुळे पोटात गॅस होतो

जंक फूड मध्ये प्रमुख घटक हा मैदा असतो. आणि तो पचायला जड असतो हे आपण सर्व जाणून आहोत. आणि तर पदार्थ जास्त चवदार असल्यामुळे जास्त प्रमाणांत खाण्याची इच्छा होते. आणि जरा घाईत हे पदार्थ खाल्ल्याने जास्त खाल्ले जाऊ शकतात. मैदा बरोबर मसालेदार पदार्थ किंवा साखर या गोष्टी असतातच. मैदा हा गव्हातून फायबर काढून टाकल्यावर तयार होतो. जंक फूड जसे ब्रेड, बिस्कीट, समोसा, कचोरी, इत्यादीचे जास्त सेवन केल्यामुळे गॅस समस्या होते

Table of Contents

जेवण करतानाच्या चुकीच्या पद्धती (Wrong eating habits)

आजकाल घाईमध्ये जेवण्याच्या सवयींमध्ये भरपूर बदल केले जातात. आणि कालांतराने चुकीचे काय आहे हे माहीत नसल्यामुळ किंवा लक्ष ना दिल्यामुळे त्या सवयी होऊन जातात. आणि त्याचे परिणाम म्हणजे पित्त, गॅस, पोटाच्या समस्या असतात. तर गॅस होण्याचे कारण असते, भराभर जेवणे, जेवताना अन्न नीट न चावता गिळणे. भराभर जेवल्याने अर्थातच अन्न नीट चावले जात नाही. त्यामुळेच जेवताना एक घास बत्तीस वेळा चावावा असे सांगितले जाते. जास्त वेळ चावल्याने मेंदूला पोट भरल्याचा संकेत मिळतो आणि आपण योग्य प्रमाणात जेवतो. पण भराभर लागल्याने

आपल्या शरीराचे एक घड्याळ असते. त्यात वेळा पाळल्या जातात. पण आपण त्यात रोजच्या बदलत्या जीवशैलीनुसार नेहमी बदल करत असतो. त्यामुळे गॅसचा प्रॉब्लेम उद्भवतो.

बद्धकोष्ठता समस्या (Constipation problem)

एका जागी बसून राहण्याच्या सवयीमुळे बद्धकोष्ठता होते. शारीरिक हालचालींचे प्रमाण कमी असणे आणि पाणी कमी पिणे यामुळे शौच प्रवाही होत नाही. अर्थात वेळेवर प्रेशर न येऊन पोट साफ न होणे यालाच बद्धकोष्ठता म्हणतात. पोट साफ न झाल्यामुळे गॅस निर्माण होतो.

जास्त प्रमाणात वायतुळ (वात निर्माण करणारे) अन्न खाणे

आपल्या आहारात सगळ्या प्रकारच्या पदार्थांचा समावेश असावा असे आहारतज्ञ नेहमी सांगतात. जेणेकरून आपल्याला सर्व पोषक अन्नघटक मिळतील आणि कोणत्याही vitamin ची कमी भासणार नाही. पण कधीकधी वैयक्तिक आवडीमुळे एखादा जड आणि जास्त फायबर असलेला पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ला जातो आणि पोट जग होते आणि गॅस होतो.

राजमा, हरभरा, डाळीचे तळलेले पदार्थ, मसूर यासारखे पदार्थ आणि इतर वायतुळ पदार्थ गॅस निर्माण करतात. त्यांचे प्रमाण कमी असावे लागेल. पण ते गरजेपेक्षा वाढले तर गॅसची समस्या होते.

व्यायामाचा आणि शारीरिक हालचालींचा आभाव (Lack of exercise and physical activity)

आपण वर पाहिले की बसून राहणे, जास्त खाणे, जड अन्न खाणे या गोष्टींमुळे गॅस होतो. जर याच जागी नियमित व्यायाम आणि शारीरिक हालचाल होत असेल तर यासारखा पोटात गॅस होण्याच्या समस्येवर उपाय नाही.

आपण जे अन्न खातो ते आपल्याला शक्ती देते. पण जर हेच प्रमाण गरजेपेक्षा जास्त झाले तर ते पोटाच्या समस्या निर्माण करते. कोणताही प्रकारचा पूर्ण शरीराची हालचाल करणारा व्यायाम किंवा त्या प्रकारचे एखादे काम हा गॅसच्या समस्येवर रामबाण उपाय ठरतो.

पोटात गॅस होण्याची लक्षणे (Symptoms of gas in stomach)

आता आपण या गॅसने काय काय परिणाम आपल्या शरीरावर होतो हे पाहू. पोटात गॅस असण्याची लक्षणे माहीत असेल तर लगेच निदान होऊन त्यावर उपाय केला जाऊ शकतो.

पोट गच्च वाटणे

जास्त खाण्याने पोट खूप भरलेले वाटते. किंवा गॅस निर्माण झाल्यामुळे ते गच्च वाटते. पोट गच्च असण्याचे कारण गॅस असू शकते.

अस्वस्थ वाटणे

पोटात गॅस असल्याने त्याचा परिणाम देखील चेहऱ्यावर दिसतो. एक प्रकारचा तणाव चेहऱ्यावर दिसू लागतो आणि कोणतेही काम करण्याची इच्छा होत नाही. नवीन ज्यांना पोटात वायू असण्याची समस्या आहे त्यांना कळत नाही की नेमके काय होत आहे.

अशा परिस्थितीत चिडचिड होते किंवा काहीच करावे वाटत नाही. कामात लक्ष लागत नाही. आपण जे काही करतोय तेही करू नये असे वाटत राहते. जर पण शारीरिक कामात असलो तर ते पचत जाते. पण समजा अभ्यास किंवा कॉम्पुटर वरचे काम असेल तर लक्ष केंद्रित होत नाही. आणि ज्यांना समस्या नवीन आहे त्यांना का होत आहे हेही कळत नाही.

माथा दुखणे, तणावपूर्ण वाटणे

डोके दुखल्यासारखे वाटणे किंवा ताण वाटणे हे डोक्यावर जाणवते. आणि त्यावेळी कधीकधी जाणवत नाही की हे लक्षण पोटात गॅस असल्याचे आहे. डोके दुखतेय असे वाटणे किंवा माथा कपाळ वर ताण येणे, चेहरा टवटवीत न दिसणे, कामात लक्ष न लागणे, चिडचिड होणे हे ही काही लक्षणे आहेत.

पित्त होणे, छातीत जळजळ होणे

पित्त हेही एक प्रमुख कारण आहे ज्यामुळे पोटात वायू निर्माण होतो. अपचन पण होते. पित्त किंवा Acidity याबद्दल सर्व माहिती सविस्तर येथे वाचा पित्त लक्षणे आणि पित्तावर घरगुती उपाय

तोंडाचा वास येणे

आपले पोट साफ नसेल तर तोंडाचा वास येतो. गॅस झाल्यामुळे हा गॅस तोंडपर्यंत येऊन वास येतो.

जेवण्याची इच्छा न होणे, भूक न लागणे

जेवायची वेळ झाली तरी भूक न लागणे किंवा जेवावेसे ना वाटणे हे ही लक्षण गॅसच्या असू शकते. खरतर भूक न लागणे याची इतरही कारणे असू शकतात पण जर गॅस जाणवत असेल तर हेच कारण असते.

पोटात गॅस होणे यावर घरगुती उपाय (home remedies for gas problem in marathi)

आता आपण या पोटातील गॅस समस्येवर एक एक घरगुती आणि लगेच करता येणारे सोपे उपाय पाहूया.

सकाळी उठल्यावर दोन ग्लास पाणी कोमट पाणी पिणे

जर कोमट नसेल तर साधे पाणी म्हणजे थंड नसलेले पाणी पिले तरी चालते. हे केल्यामुळे सकाळी पोट साफ होते पोटातील सर्व जुने पचलेले बाहेर जाते. आणि पोट कार्यशील होते. पित्त होत नाही. हा पित्तावर देखील उपाय आहे. आणि पोटाचे विकार पण कमी होतात.

या पाण्याबरोबर अर्धे लिंबू आणि एक चमचा मध घेतला ते अजून चांगले परिणाम मिळतात.

हा उपाय फक्त सकाळीच करावा असे नाही. तर जेव्हा गॅसची समस्या होईल तेव्हा दोन ग्लास कोमट पाणी पिऊन पोट साफ करणे हा सोपा उपाय आहे. तेव्हा हा उपाय केव्हाही करू शकता. कोमट पाणी पिल्यानंतर थोडे चालून आल्याने प्रेशर येऊन पोट साफ होते. हा उपाय इन्स्टंट रेमेडी आहे.

रोज अर्धा तास व्यायामाची सवय असणे

आपण सर्व हे जाणून आहात की व्यायाम केल्याने आरोग्याला खूप फायदे मिळतात. सारखे गॅस, पित्त, पोटाचे प्रॉब्लेम होण्यापेक्षा अर्धा तास व्यायाम किंवा योगासने करणे कधीही योग्य आहे. कारण त्यामुळे शारीरिक आरोग्य तर चांगले राहतेच पण दिवसभर उत्साही आणि कार्यक्षम वाटते. थकवा तणाव जाणवत नाही.

जेवणाच्या आणि झोपण्याच्या वेळा नियमित असणे

आपल्या शरीराचे एक घड्याळ असते. ते नियमितपणे आपल्या वेळा पाळते. आपणही शरीराच्या वेळा त्याच्या घड्याळ प्रमाणे पाळल्या पाहिजेत. तर पोटाच्या समस्या उद्भवणार नाहीत.

जंक फूड कमी खाणे किंवा बंद करणे आणि हलका आहार घेणे

जंक फूड म्हणजे प्रथम तर मैद्याचे पदार्थ असतात. आणि काही पचण्यास जड असतात. हे कमी केले आणि हलका आणि पौष्टिक आहार घेतला तर शारीरिक समस्या होणार नाहीत. आहारात हिरव्या पालेभाज्या आणि फळभाज्यांचा आणि द्रव पदार्थ यांचा समावेश असावा. ज्यामुळे पोट गच्च होणार नाही. गाजर, काकडी, बीट, कांदा, इत्यादी उपलब्ध भाज्यांचे सलाड नियमित असेल तर पोटाच्या समस्या होत नाहीत.

जेवताना भराभर न चावता खाऊ नये

भराभर जेवल्याने काय होते हे आपण वरती पहिलेच आहे. जर ही सवय बदलली तर जेवताना लाळ तयार होते ती पचनाच्या सर्व समस्या मिटवते. ही लाळ तयार व्हावी यासाठी हळू हळू चव घेऊन जेवावे आणि जेवणाचा आनंद घ्यावा.

गॅस बाहेर काढण्यासाठी करण्याची योगासने

पवनमुक्तासन – नावाप्रमाणेच शरीरातील गॅस बाहेर काढण्याचे काम हे आसन करते. झोपून एक गुडघा दोन्ही हातानी नाकाला हळूहळू टेकवावे तेव्हा ते पवन मुक्तासन होते. दोन्ही गुडघ्यांना हीच क्रिया परत करावी.

पश्र्चीमोत्तानासन – हे आसन पण गॅस बाहेर काढण्यास मदत करते. यामधे बसून पाय पसरून हातानी पायाचे अंगठे धरावे आणि डोके गुडघ्याला टेकवण्याचा प्रयत्न करावा.

आपल्या जीवनशैलीमध्ये सगळ्या आजारांचे कारण असते. आपल्या शरीराचे विज्ञान कधी कधी आपण समजतो त्यापेक्षा वेगळे असते. आपण विज्ञान जाणून घेतले आणि त्याप्रमाणे जीवनशैली मध्ये बदल केले तर अपेक्षित परिणाम मिळून आरोग्य सुधारते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to Top