मराठी उखाणे सौभाग्यवतीसाठी
Posted in: जीवनशैली (Lifestyle)

37 सोपे आणि छान छान नवीन मराठी उखाणे

आपण आधीही उखाण्यांबद्दलच्या पोस्ट पाहिले आहेत. त्यांना परत भेट देण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

नवरी आणि नवरदेवाची लग्नात आणि हळद, संक्रांत अशा सर्व कार्यक्रमांसाठी मराठी उखाणे

नववधू आणि सौभाग्यवती साठी मराठी उखाणे 

आता अजून काही उखाणे या पोस्टमध्ये आहेत चला तर सुरुवात करूया.

ज्योतीला मिळाली ज्योत आता वाढेल प्रकाश …………रावांच्या सहवासात मला ठेंगणे झाले आकाश

चंद्राच्या शीतल प्रकाशात मंद हास्य करिते रोहिणी, ……. रावांच्या सहवासात होईल मी आदर्श गृहिणी

सागरा तू करुणेचा देव, मनातलं सारं काही तुला सांगावं,. …….. रावांचं नाव घेते अखंड सौभाग्य मला द्यावं

वसंत ऋतुच्या पहाटे ऐकू येते कोकिळाचे मधुर कुंजन, …… रावांचा सहवास मिळवण्यासाठी केले मंगळागौरीचे पूजन..

दिलीप राजाने केले यज्ञात सर्वस्व दान, …… रावांचं नाव घेते आग्रहाने देऊन मान

कन्नड मुलींची कन्या शकुंतला, …… रावांचं नाव घेते (आडनाव) ची (स्वतःचे नाव)

श्रीकृष्णाच्या प्रीतीने रुक्मिणीला केले वेडे, ……. रावांचं नाव घेते मंगळागौरी पुढे

पत्रिका जुळल्या योग आला जुळून,. …….. रावांचं नाव घेते भाग्य थोर म्हणून.

आकाशात चमकतो तारा अंगठीत चमकतो हिरा, ……… राव माझे पती हाच भाग्योदय खरा

सोन्याच्या साखळीत खुलतात काळे मणी,. …….. राव झाले माझ्या सौभाग्याचे धनी.

यशाच्या शिखर काढण्यासाठी तुडवावी लागते खडतर वाट, ……. रावांचं नाव घेऊन सोडते मी गाठ

मोतीहून सुवर्णाच्या तबकात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन भागवावी चातकाची तहान,. ……… रावांची सुवासिनी बनवून केली सत्यनारायणाची पूजा महान

भोगापेक्षा त्यागात असते खरे समाधान, …… रावांचे नावचे कुंकू लावून वाढला माझ्या आई-वडिलांचा अभिमान

पिकल्या पानाच्या विड्यात बदाम घालते किसून, ……. रावांना विडा देते पलंगावर बसून

आई बाबा आशीर्वाद द्यावा, …… रावांचा सहवास मला जन्मभर लाभावा

विवाह प्रसंगी बांधल्या जातात रेशमाच्या गाठी, ……….रावांचं नाव घेते फक्त तुमच्यासाठी

मराठी भाषेत प्रसिद्ध आहेत अलंकार उपमा व उत्प्रेक्षा, ……. राव सुखी राहो हीच माझी अपेक्षा

ब्रह्मा विष्णू महेश तिने देव देत आहे आशीर्वाद साक्षात, …… रावांचं नाव घेते नीट ठेवा लक्षात

जाई जुई चा हार गुंफित होता माळी,. ……. रावांचं नाव घेते सायंकाळच्या वेळी

पुण्याहून आणले मोती मुंबईला केला साज, ……. रावांचं नाव घेते लग्न जमले आज

वर्तमानपत्रात छापून आली वार्ता, …… रावांचं नाव घेते फक्त तुमच्याकरता

आईची माया वडिलांची छाया, …… रावांचं नाव घेऊन पडते सर्वांच्या पाया

आईने शिकली ममता वडिलांनी दिले शिक्षण, ……… रावांची विद्या हेच माझे भूषण

कुणाची करू नये निंदा कोणाला देऊ नये दूषण, ….. राव हेच माझे भूषण

हिंदीमध्ये आरशाला म्हणतात दर्पण, …… रावांच्या चरणी करते मी स्वतःला अर्पण

जाई जुईच्या बागेत काचेचा बंगला, …….. रावांच्या संसारात जीव माझा रमला

शिवसेनेच्या मेळ्यात नाही उखाण्याची आठवण, …… रावांच्या नावाची हृदयात साठवण

रामाचे होते राज्य म्हणून भरताने नाकारले, ………. रावांच्या नावासाठी सौभाग्य पत्करले

नीलवर्णी आकाशात चंद्र दिसतो साजरा, …… रावांनी मला सौभाग्याचा गजरा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to Top