13-questions-to-ask-a-girl-in-arranged-marriage-fiirst-meeting-marathi
Posted in: जीवनशैली (Lifestyle)

लग्नाआधी Arranged Marriage मध्ये पहिल्या भेटीत मुलीला विचारावेत असे 13 प्रश्न…. (13 questions to ask a girl in arranged marriage marathi)

13-questions-to-ask-a-girl-in-arranged-marriage-fiirst-meeting-marathi

लग्न हा प्रत्येक तरुण आणि तरुणींच्या आयुष्यातील असा सोहळा असतो ज्यामुळे त्यांचे आयुष्य बदलते. मग ते Arranged Marriage असो किवा Love Marriage. दोन्हीमध्ये मुलगा आणि मुलगी दोघांच्या आजूबाजूचे लोक बदलतात. एक जोडीदार मिळतो जो पुढील जीवनभर कायम आपल्यासोबत राहील.

त्यामुळे आजच्या काळात हा जोडीदार नीट पारखून निवडावा लागतो. जेणेकरुन भविष्यात पश्चाताप करावा लागणार नाही. त्यासाठी वयात आलेली मुले मुली आणि त्यांचे पालक आपल्या अपेक्षा ठरवतात आणि त्यात बसणार जोडीदारासाठी शोध चालू करतात.

जेव्हा आपण यात नवीन असतो म्हणजे वधुसंशोधन चालू करणार असतो. तेव्हा नवीन नवीन अशा कांदेपोहे कार्यक्रमात मुलींसोबत कसे बोलवे, मुलीला काय प्रश्न विचारावेत हे कळत नाही. आणि मग आपण काही बोललो नाही तर आपण त्या गोष्टीत रस घेत नाहीत. असा समोरच्या पार्टीचा समज होऊ शकतो. आपण आपल्या वर्तुळात खूप बोलके असतो.

पण नवीन लोकांमध्ये गेल्यावर आणि याचा काहीही विचार केलेला नसल्यावर आपल्याबद्दल गैरसमज समोरचा माणूस करवून घेऊ शकतो. म्हणून या पोस्ट मध्ये अरेंज्ड मॅरेज मध्ये पहिल्या भेटीत मुलीला विचारावेत असे 13 प्रश्न घेऊन आलो आहोत …. (13 questions to ask a girl in arranged marriage first meeting marathi)

स्वतःच्या पायावर उभे राहिलेल्या आणि कुटुंबाची जबाबदारी उचलण्यासाठी समर्थ असलेली मुले जेव्हा लग्न करण्याचा निर्णय घेतात तेव्हा मुलगी पाहायला जाताना मनात अनेक प्रश्न असतात. पण काय होतं आजकाल अशा कार्यक्रमात मुलगा आणि मुलीला थोडा वेळ एकमेकांशी बोलण्यासाठी दिला जातो.

आपल्यासोबत असतील ते म्हणतात, ” या दोघांना थोडं एकांतात बोलु द्या.. “.

आणि मग कुणीतरी दोघांचे सख्खे भाऊ बहीण किंवा मित्र दोघांना घेऊन घरातील एकांतातील जागेत घेऊन येतात आणि म्हणतात बोला तुम्ही आम्ही जातो. आता नवीन असले तर पाच एक मिनिटं शांततेत जातात मग मुलालाच सुरुवात करावी लागते आणि प्रश्न विचारावे लागतात.

मग अशा वेळी ज्यांचा विचार केला आहे तेवढे प्रश्न विचारावे लागतात. पण मग परत आल्यावर चर्चा होते काय काय विचारलं आणि काय काय सांगितलं. मग लक्षात येते की, अरे आपण अमुक अमुक महत्वाचा प्रश्न विचारलाच नाही. विसरला. विचारायला हवं होतं असं वाटत.

त्यासाठी मी पहिल्या भेटीमध्ये मुलीला काय काय प्रश्न विचारले पाहिजे आणि का अशी लिस्ट देत आहे ती वाचा आणि म्हणजे काय प्रश्न विचारावे लागतील आणि का या गोष्टी स्पष्ट होतील. आणि त्या मुलीच्या अपेक्षा के आहेत तेही कळेल. मग तुम्ही त्यावर नीट विचार करून निर्णय घेऊ शकता. तर पाहुयात असे काय प्रश्न असतील.

काही वेळा शहरात मुलगा आणि मुलगी बाहेर कॉफीशॉप किंवा हॉटेलमध्ये मध्ये एकमेकांना भेटतात. त्यावेळीही मुलामुलींनी याचा विचार करून ठेवावा की काय काय विचारायचं आहे आणि जाणून घ्यायच आहे.

आता बहुतेक ठिकाणी मुलांनाच सुरुवात करावी लागते. आणि बहुतेक मुलींनीही अशीच अपेक्षा असते की मुलाने सुरुवात करावी. पण तसं काही नाही कुणीही सुरुवात करू शकत.

संभाषण चालू करताना कशाबद्दल करावं असं प्रश्न बऱ्याचदा पडतो. काही वेळा ते आपोआपच चालू होतं. पण जर ते चालू करावं लागतं असेल तर तुम्ही मुलीच्या एखाद्या गोष्टीची स्तुती करून करू शकता. जसे की तुमचे घर खूप छान आहे. किंवा मुलगी सुंदर असेल व्यवस्थित तयार झाली असेल तिला मुलगा पाहायला येणार म्हणून तर मुलीला तुम्ही म्हणू शकता की तू खूप छान दिसत आहेस. किंवा तू छान दिसत आहेस. तुमचे शहर छान आहे.

अशा प्रकारच्या एखाद्या हलक्या फुलक्या विषयाने सुरवात करावी जेणेकरून वातावरणात नवखेपणामुळे आलेला तणाव कमी होईल. मग तुम्ही प्रश्न विचारायला चालू करू शकता. तुम्ही जर काय विचारायचे याचा आधीच विचार करून आला असेल तर अवघड जाणार नाही. आणि काही विचारायचे राहणार नाही. मग आता एक एक प्रश्न विचारायला चालू करा.

Table of Contents

1. संभाषण सुरू करणारे प्रश्न


अशा प्रकारच्या प्रश्नांना ICE BREAKER QUESTIONS पण म्हणतात. संभाषण सुरू करण्यासाठी आणि मुलीला बोलतं करण्यासाठी असे प्रश्न वापरावे. पहिल्यांदा तिच्या वैयक्तिक आणि हलक्या फुलक्या गोष्टींची माहिती घ्या. आधी घरचे कसे सगळे कसे आहेत? आणि कोण कोण असत घरी ते विचारा.

2. तिच्या जीवनशैली बद्दल जाणून घ्या


तिच्या आवडीनिवडी छंद याबद्दल विचारा तिला मोकळ्या वेळेत काय करायला आवडते. ती आपला मोकळा वेळ कसा उपयोगात आणते. आवडती डिश कोणती आहे. त्याबद्दल माहिती घ्या म्हणजे तिच्या आवडीनिवडी कशा आहेत त्याबद्दल अंदाज येईल.

3. तिला कसे कपडे घालायला आवडतात ते विचारा


कांदे पोह्याच्या कार्यक्रमाला मुली पारंपरिक किंवा साधारण चारचौघात वावरावे असे कपडे घालतात. किंवा घरचे साडी किंवा सलवार सूट परिधान करायला लावतात. त्यामुळे त्या अगदीच साधारण असतात. पण आजकाल उच्च शिक्षित मुली त्यांना कम्फर्टेबल वाटेल असे कपडे घरात किंवा बाहेर घालणे पसंत करतात. त्यामुळे कपड्यातील त्यांची आवड तुमच्या आवडीशी जुळते का ते पाहून निर्णय घेण्यास सोपे जाईल.

4. तिच्या कुटुंबाविषयी माहिती घ्या


तिच्या कुटुंबातील लोकांचे शिक्षण, व्यवसाय, नौकरी याबद्दल विचारा. म्हणजे तुम्हाला कुटुंबाविषयी व्यवस्थित माहिती होईल. आणि त्यावरून

शिक्षणा बद्दल प्रश्न विचारा.


तिचे कुठपर्यंत शिक्षण झाले आहे. ते पूर्ण झाले आहे का? पूढे शिकायचे आहे का. अजून पुढे शिक्षण बाकी आहे का त्याची कल्पना येईल. आणि त्यानुसार तिच्या करिअर बद्दल कल्पना येईल

6. करिअर बद्दल विचारा


तिचे करिअर कसे चालू आहे. भविष्यात करिअर चे काय नियोजन आहे. तिचे करिअर मध्ये काय ध्येय आहे. यावरून ती आयुष्यकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहते ते कळते. आणि जर लग्नानंतर शहर बदलणार असेल आणि तिची नौकरी तिच्या गावात असेल तर ती सध्याची नौकरी सोडून तुमच्या शहरात नवीन नौकरी शोधण्यास काही अडचणी आहेत का आणि त्यासाठी काय नियोजन असेल त्याबद्दल बोला.

7. आई वडिलांबद्दल काय विचार केला आहे?


तिने तिच्या पालकांबद्दल लग्नानंतर काय विचार केला आहे ते विचारा. मुली आपल्या आई वडिलांची काळजी घेणाऱ्या असतात. काही ठिकाणी मुलींवर त्यांच्या आई वडिलांची आर्थिक जबाबदारी असू शकते. आणि लग्नानंतरही ती तिच्यावर असू शकते. त्यामुळे त्यांची लग्नानंतर काळजी घेण्याबद्दल तिने काय ठरवले आहे ते विचारा.

या वेबसाईटवर हेही वाचा : आम्लपित्त का होते

8. तुझा लाईफ पार्टनर कसा असावा असे तुला वाटते?


होणाऱ्या जोडीदाराकडून तिच्या काय अपेक्षा आहेत ते विचारा.
हे बहुतेक मुलींनी ठरवलेलं असत की त्यांना जोडीदार कसा हवा. त्याची कमाई कशी असावी. त्याचा नौकरी किंवा व्यवसाय कसा हवा. शहरातला हवा की ग्रामीण भागात चालेल. अशा बऱ्याच गोष्टींचा मुलींनी विचार केलेला असतो. या अपेक्षा विचारल्याने त्यात आपण कितपत बसतो त्याचा अंदाज येईल. त्याबरोबर ती मुलगी तुम्हालाही तुमच्याबद्दल विचारेल त्यामुळे तुम्हीही याचा विचार करून ठेवायला हवा. आणि मुलीलाही आपल्या अपेक्षा सांगायला हव्या.

9. तिला एकत्र कुटुंब पद्धती आणि विभक्त कुटुंब पद्धतीबद्दल तिचे मत विचारा


आजकाल काही मुली लग्नाआधीच ठरवून टाकतात की फक्त नवरा आणि त्या स्वतः असा राजराणीचा संसार हवा. पण सगळ्याच मुलांना हे जमेल असे नाही ना. कारण लग्नाच्या वयात आलेल्या मुलांचे आईवडिल साहजिकच वृध्द असणार मग त्यांची जबाबदारी मुलांवर असते. आणि आशा परिस्थितीत त्यांना आपल्या आईवडिलांना सोडून वेगळे राहणे मानसिक आणि आर्थिक रित्या मान्य असू शकणार नाही. आणि अशा प्रश्नाने जर दोघांचे एकमत झाले तर संसार नक्कीच सुखाचा होईल. पण जर मुलीला एकत्र राहणे मान्य नसेल तर निर्णय घेण्यात अडचण येणार नाही.

10. स्वयंपाक करायला आवडतो का?

असा प्रश्न विचारून तुम्हाला तिला स्वयंपाक येतो का याचेही उत्तर मिळेल. पण काय होत आपले आई वडील यापैकी कुणीतरी हा प्रश्न विचारतात. पण तुम्हीही विचारावा. कारण काही मुलींना कामाची सवय नसते.

11. शाकाहारी किंवा मांसाहारी अन्न याबद्दल मत घ्या


प्रत्येकीच्या घरातील अन्न ग्रहण करण्याच्या पद्धती विविध असतात. त्या राहण्याच्या ठिकाणावर अवलंबून वेगळेपण असू शकते. काही घरात अजिबात मांसाहार चालत नसतो. त्यामुळे या गोष्टीबद्दल सवयी आणि आवडीनिवडी जाणून घेणे आवश्यक आहे. समजा तुम्हाला मांसाहार आवडतो पण मुलगी शाकाहारी कुटुंबातील असेल तर तिला अडचण होऊ शकते. त्यामुळे हे विचारून घेतलेले चांगले.

12. कुणाच्या दबावाखाली येऊन Arranged Marriage किंवा लग्नासाठी तयार झाली आहे का ते विचारा


आजकाल काही मुलींचे करिअर किंवा शिक्षण चालू असते व काही विशिष्ट कारणांमुळे पालक लग्न करण्याचा आग्रह धरतात. त्यांची इच्छा म्हणून मुलींना लग्नासाठी तयार व्हावे लागते. तसे असेल तर लग्नानंतर अडचणी येऊ शकतात. म्हणून ती मुलगी कुणाच्या दबावाखाली येऊन तर लग्नासाठी तयार झाली नाही तर स्वतःहून लग्नासाठी तयार आहे का हे विचारून घ्या.

13. जेव्हा काही गोष्टींमुळे वादविवाद किंवा भांडणं होतात तेव्हा तू ते कसे दूर करतेस?


जीवन हे अडचणींनी भरलेले असते. वादविवाद कोणासोबतही होतात. पण तो माणूस अशा कशा पद्धतीने सोडवतो त्यावरून शांततेत जीवन जगू शकतो हे ठरते. आणि तिचा स्वभाव कसा आहे हे पण कळेल या प्रश्नामुळे.

मित्रानो तुमच्या वैयक्तिक अपेक्षेनुसार तुम्हीही अनेक प्रश्न विचारू शकता. फक्त काही गोष्टी अशाही असतात की ज्या Arranged Marriage मध्ये विचारू नयेत. त्यासाठी एक स्वतंत्र पोस्ट येईलच. आणि हे प्रश्न निवांतपणे विचारा, त्या मुलीबरोबर चर्चा करा. ती मुलगी एकंदरीत कशी आहे आपला लाईफ पार्टनर बनण्यासाठी योग्य आहे की नाही हे तुम्हाला समजेल. आणि मुलीही अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. तर तुम्हीही आपली उत्तरे विचार करून तयारी करून ठेवा. धन्यवाद.

Comments (3) on "लग्नाआधी Arranged Marriage मध्ये पहिल्या भेटीत मुलीला विचारावेत असे 13 प्रश्न…. (13 questions to ask a girl in arranged marriage marathi)"

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to Top
How to cure acidity at home? 5 acidity remedies at home…. Top protein rich veg foods must have at home Moringa powder powerful health benefits for males and females How breakfast habits linked to Mental health? प्रधानमंत्री आवास योजना शहरी (PMAY-U)