Bill gates quotes
Posted in: जीवनशैली (Lifestyle)

बिल गेट्स यांनी सांगितलेल्या आणि शाळेत शिकवल्या न जाणाऱ्या 11 गोष्टी (11 Inspirational Bill Gates Quotes for students)

पालक ज्यांची लहान मुले आहेत, किंवा जी स्वतः लहान आहेत, किंवा जे लोक आता मोठे झाले आहेत पण आधी लहान मुले होती त्या सर्वांसाठी बिल गेट्स यांनी सांगितलेल्या आणि शाळेत शिकवल्या न जाणाऱ्या 11 Bill Gates Quotes, गोष्टी आहेत. ज्या शालेय अभ्यासक्रमात नसतात किंवा शाळेत शिकविल्या जात नाहीत. छान वाटणाऱ्या आणि राजकीयदृष्ट्या योग्य असणाऱ्या शिक्षणपद्धतीने एक मुलांची पिढी निर्माण केली आहे ज्यात वास्तविकता नाही आणि ही वास्तविकता नसलेली शिक्षणपद्धती मुलांच्या अपयशाला कारणीभूत ठरत असे बिल गेट्स सांगतात.

आपल्या सगळ्यांना माहितीच आहे कि आपण बिल गेट्स कोण आहेत? बिल गेट्स हे जगातील मोजक्या सर्वात श्रीमंत लोकांपैकी एक श्रीमंत उद्योजक आहेत. मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक आणि Bill & Melinda Gates Foundation या एनजीओ चे संस्थापक आहेत. चला पाहूया Bill Gates Quotes

बिल गेट्स यांचा मुलांना संदेश (Bill Gates Quotes)

१. हाताची पाच बोटे सारखी नसतात

जीवनात सगळ्याच गोष्टी चांगल्या, सुंदर किंवा आपल्या मनाप्रमाणे घडत नाही त्यामुळे याची सवय करून घ्या. जीवनात कसाही मोड येऊ शकतो. काही क्षण दुःख घेऊन येतात तर काही क्षण सुख. हाताची पाच बोटे सारखी नसतात.

२. स्वतःला सिद्ध करा

जगाला तुमच्या स्वाभिमानाशी काही काळजी नसते. आपण स्वतःला चांगले किंवा योग्य समजण्याआधी स्वतःला सिध्द करावे अशी जगाची अपेक्षा असते. आणि जेव्हा तुम्ही स्वतःला सिद्ध कराल तेव्हा जग आपोआप तुम्हाला मान देईल.

३. मेहनतीला पर्याय नाही

तुम्ही कॉलेज संपल्यानंतर लगेच वर्षाला लाखो किंवा करोडो रुपये कमवू शकत नाही. किंवा कॉलेज मधून बाहेर निघाल्यानंतर लगेच तुम्ही एखाद्या कंपनीचे किंवा संस्थेचे पदाधिकारी होऊ शकत नाहीत. जोपर्यंत वरील दोन्ही गोष्टी तुम्ही स्वतः कमावत नाही.

कोलेज मधून बाहेर पडल्या पडल्या पैसे मिळतील किंवा अमुक डिग्री घेतली म्हणजे लगेच पैशांचा पाऊस पडेल अशी अपेक्षा मार्केट कडून ठेऊ नका. मेहनतीला पर्याय नाही.

४. जेव्हा खर्या जगात जाल

जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमचे आई वडील, शिक्षक किंवा प्राध्यापक कठोर किंवा कडक आहेत, तर तुमचा बॉस येईपर्यंत थांबा. आणि बॉस किंवा मालक यांना निश्चित कार्यकाळ नसतो जसा शिक्षकांना असतो.

५. कोणतेही काम छोटे नसते

छोटे काम केल्याने प्रतिष्ठा कमी होत नसते. तुमच्या आजी-आजोबांच्या काळात छोट्या कामाला दुसरा शब्द होता – ते याला ‘संधी’ अस म्हणत. कोणतेही काम छोटे नसते. काम हे काम असते. कोणतेही काम उत्कृष्ट करण्याचा प्रयत्न करा.

Bill Gates Quotes

६. चुकांमधून शिका (Learn from your mistakes)

जर तुमच्याकडून किंवा तुमच्या जीवनात काही चूक झाली असेल, तर यात तुमच्या पालकांचा दोष नाही, म्हणून चुकांना घाबरू नका, त्यांच्याकडून शिका. चुका सगळ्यांकडूनच होत असतात. चुकांमधून शिका.

७. आई बाबांच्या कष्टांची जाणीव ठेवा

तुम्ही या जगात येण्याआधी तुमचे आई-बाबा तेवढे कंटाळवाणे नव्हते जेवढे ते आता तुम्हाला वाटत आहेत. तुमचे बिल भरून, तुमचे कपडे धुवून आणि तुम्ही किती छान आहात हे ऐकून ते तसे झाले आहेत. त्यामुळे तुमच्या पालकांच्या पिढीतील हे परजीवींपासून तुमच्या मनाचे नंदनवन वाचवण्याची वेळ येण्याआधी तुमच्या खोलीतील कपाट परजीवीमुक्त करून घ्या. (म्हणजे मनातील एक कप्पा स्वतःसाठी ठेवा आणि एखादा छंद किंवा कला जोपासा)

८. एकदा गेलेली संधी परत येत नाही – संधीचे सोने करा

तुमच्या शाळांनी कदाचित विद्यार्थ्यांना नापास करणे बंद केले असेल पण वास्तविक जीवनात असे नसते. काही शाळांमध्ये तर नापास करणे पुर्णपणे बंद केले आहे. आणि काही ठिकाणी तुम्ही जोपर्यंत उत्तीर्ण होत नाही तोपर्यंत परीक्षा देऊ शकता. पण वास्तविक जीवनात असे कधीही होत नाही. एकदा गमावलेली संधी परत मिळेल याची शाश्वती नसते.

९. आपल्या आवडीच्या गोष्टी वैयक्तिक वेळेत करा

कॉलेजनंतरचे जीवन सत्रांमध्ये विभागलेले नसते जसे ते कॉलेजमध्ये असते. इथे तुम्हाला उन्हाळी सुट्याही भेटत नाहीत. तुम्हाला नौकरी देणाऱ्या मालकांना तुमच्या आवडीच्या गोष्टीमध्ये स्वारस्य असेलच असे नाही. म्हणून या स्वतःच्या आवड असणाऱ्या पण नौकरीशी संबंध नसणाऱ्या गोष्टी स्वतःच्या वेळेत करा.

हे पण वाचा: ऍसिडिटी का होते?

१०. टीव्ही आणि विडीओ गेम या काल्पनिक गोष्टीमध्ये वेळ वाया घालवू नका

टेलिव्हिजन आणि विडिओ गेम्स हे वास्तविक जीवन नव्हे. टीव्ही सिरीयल किंवा चित्रपटातील लोक दिवसरात्र कॉफी शॉप किंवा घरात दिसतात. चांगले कपडे घालतात. चोवीस तास मेक अप मध्ये असतात. दिवसा किवा रात्री कधीही पहिले तरी सुंदर आणि मेक अप मध्ये दिसतात. पण वास्तविक जीवनात कॉफी शॉप सोडून नौकरी, व्यवसाय किंवा कामे करावी लागतात.

११. आपले Passion शोधा

एखाद्या गोष्टीचे वेड असलेल्या लोकांशीसुद्धा छान रहा. कदाचित भविष्यात तुम्हाला त्यांच्यासाठी काम करावे लागेल. कारण वेड म्हणजे Passion. Passion असलेले लोकच मोठी म्हणजेच जगात बदल घडवणारी कामे करतात.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to Top