उन्हाळ्यात थंड आणि कसे रहाल How to Stay Cool and Healthy in Summer
Posted in: आरोग्य टिप्स (Health tips), जीवनशैली (Lifestyle)

उन्हाळ्यात थंड आणि कसे रहाल – गरमीच्या मोसमात ताजेतवाने राहण्यासाठी आरोग्य टिप्स (How to Stay Cool and Healthy in Summer – Health Tips to Stay Cool in Hot Season) 2024

उन्हाळ्यात सुरुवातीला येणारा होळीचा आणि रंगपंचमीचा सण झाला आणि मार्च महिना पण संपत आला आहे. रंग खेळत असताना पाणी अंगावर पडल्यावर मस्त गार गार वाटते ना? सकाळी दहा बाहेर गेलो सुट्टीच्या दिवशी तरी घामाच्या धारा वाहू लागतात. पाणी पाणी होऊ लागते. आशा ऋतु मध्ये आपले शरीर आणि डोके थंड ठेवले तर आपले आरोग्य चांगले राहते. कोविड 19 च्या परिस्थितत आपण अनुभवले की बऱ्याच आरोग्यविषयक गोष्टी आपल्याला माहिती नसतात. त्यामुळेच आपण कडक उन्हाच्या सीझन मध्ये आपल्या आरोग्याची थोडीशी जरी काळजी घेतली तरी आपण आजारी न पडता राहू शकतो. या कडक उनाच्या ऋतु मध्ये घामाच्या धारा वाहत असताना उष्णतेवर मात करून थंड कसे राहावे ही माहिती एक्सप्लोर करण्यासाठी ही छोटीशी ब्लॉग पोस्ट आपल्या सर्वांसाठी..

उन्हाळ्यात आरोग्य

हायड्रेशन: उन्हाळ्यात भरपूर पाणी प्यावे, पण किती?

हायड्रेशन म्हणजे आपल्या शरीरात जे पाणी घामाने बाहेर जाते त्याची पातळी योग्य राहावी म्हणून जास्तीचे पाणी पिणे. उन्हाळ्याच्या निरोगीपणाचा आधारस्तंभ म्हणून काम करते. दररोज दिवसभरात आठ ते दहा ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. यासाठी इतर थंड पेये पण पिय शकतो जसे लिंबू पाणी, नारळपणी इत्यादि. जर कुठे दूर जाताना पाणी कमतरता भासणार असेल तर पाणी सोबत ठेवावे. उन्हाळ्यात उन्हातून आले की लगेच पाणी पिऊ नये पाच मिनिट थांबून प्यावे. पाणी पिताना बसून आणि सावकाश प्यावे.

उन्हाळ्यात कोणते कपडे वापरावे?

उन्हाळ्यात हवेशीर, वजनाने हलके, सैल, ओलावा शोषणारे कपडे उत्तम ठरतात. यात सूती किंवा लिनेन कापड असलेले कपडे असतील तर आणखी चांगले असते. कारण ते उष्णता वाढवत नाहीत. शक्यतो जास्त गडद रंगाचे किंवा काळ्या रंगाचे नसतील तर खुप छान कम्फर्ट देतात. उन्हाळ्यात कुल आणि स्टायलिश दिसण्यासाठी फिक्कट रंगाचे कपडे ट्रेंडी लुक देतात.

कडक उन्हाच्या वेळी सावलीत राहण्याचा प्रयत्न करावा

उन्हाळ्यात शक्यतो कुणीही उनात फिरणे पसंत करीत नाही. पण तरी काही कारणाने उन्हात जावे लागू शकते ज्यात उष्माघाताची (Heatstroke) शक्यता वाढते. त्यात डोके दिवसभर दुखणे , चक्कर येणे, थकवा, अशक्तपणा आणि आजारी पडण्याची शक्यता ही असते. उष्माघात होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे ते पाहू.

  1. जास्तीत जास्त कामे सकाळी कमी उन्हाच्या वेळी किंवा संध्याकाळी निपटवित.
  2. उन्हात जावे जरी लागले तरी झळा लागू नये म्हणून टोपी किंवा मोठा रुमाल डोक्याला आणि कानाला जास्त ऊन लागू नये यासाठी वापरावे
  3. जास्तीत जास्त सावलीत राहण्याचा प्रयत्न करावा.
  4. पाण्याची सोय नसेल आशा ठिकाणी जाताना पाणी सोबत घेऊन जावे.
  5. दुपारी बारा ते तीन-चार पर्यन्त बाहेर उन्हात जाणे टाळावे.

उन्हाळ्यात व्यायाम कोणता करावा?

कोणताही ऋतु असल तरी उत्तम आरोग्यासाठी व्यायाम किंवा शारीरिकरित्या सक्रिय राहणे महत्वाचे असते. मैदानी खेळ खेळल्याने व्यायाम होतो आणि आपले मानसिक आरोग्यही सुधारते. पण गरमीच्या मोसमात व्यायाम करताना अतिश्रम होऊ अतिरिक्त ऊर्जा खर्च होऊ नये म्हणून काही खबरदारी घेणे आवश्यक ठरते. त्यामुळे या दिवसात ज्यावेळी हवेत थोडा थंडावा असेल तेव्हा व्यायाम करावा, म्हणजे पहाटेच्या वेळीच. शक्यतो मैदानी खेळ पण पहाटे ऊन कमी असेपर्यंत खेळावे. पोहणे, सायकलिंग, आणि चालणे ही व्यायाम उत्तम आहेत. उष्णतेमुळे होणारे आजार टाळण्यासाठी योग्य विश्रांती घ्यावी आणि भरपुर पाणी प्यावे.

उन्हाळ्यातील आहार कसा असावा ?

गरमीच्या दिवसात सर्वात उत्तम आहार म्हणजे हंगामी फळे आणि फळभाज्या. जसे आंबा काकडी टोमॅटो. इत्यादि. आंब्याचा रस किंवा कैरी सर्वाना आवडेलच पण याबरोबर काकडी, टोमॅटो, बीट, गाजर, कांदा , पालेभाज्या इत्यादि भाज्या चिरून त्यांची कोशिंबीर किंवा सॅलड केले तर उत्तम राहील. यामध्ये सर्व अन्नघटक असतील आणि पाणीही भरपूर असेल.

ताक आणि दही यासारखे Pro -biotic पदार्थ पण नियमित आपल्या आहारात असावे. दुपारी जेवताना ग्लासभर ताक मसाला मिरची कोथिंबीर टाकून मिळाले तर कोणाला आवडणार नाही? आवर्जून प्यावे.

बाटली बंद पेये जसे पेप्सी कॉल वगैरे थंड तर असतात पण त्यात अतिरिक्त कॅलरी पण असतात. म्हणून ते टाळलेले उत्तम. त्यापेक्षा लिंबू पाणी, जलजिरा, कैरी पन्हे, नारळपाणी, उसाचा रस, कोकम सरबत ही पेये शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढतात आणि ताजेपणा आणतात. यातील उपलब्ध असेल ते प्यावे. किंवा पाणी भरपूर पिले तरी भरपूर फायदा होतो.

याबरोबर जेवताना हलका आहार घ्यावा. आपला भारतीय आहार म्हणजे भाकरी, चपाती, विविध भाज्या, चटणी, कोशिंबीर इत्यादि सर्व ऋतूंमध्ये उत्तम असतो. त्यात जास्तीत जास्त भाज्यांचा समावेश असावा.

हे ही वाचा: पौष्टिक आणि चवदार झटपट नाश्ता रेसिपी मराठी पाककृती

उन्हाळ्यात घ्यावयाची काळजी याविषयी सतत विचारले जाणारे प्रश्न (frequently asked questions – FAQs about summer health)

उन्हाळ्यात हायड्रेटेड राहण्यासाठी मी किती पाणी प्यावे?

गरमीच्या दिवसात दररोज किमान 8-10 ग्लास म्हणजे 4-5 लिटर पाणी प्यावे. Hydrated राहण्यासाठी एवढे पाणी पिण्याचे ध्येय ठेवा. हे प्रमाण ज्या त्या व्यक्तीच्या शरीराच्या गरजेनुसार कमी जास्त होऊ शकते.

उन्हाळ्याच्या दिवसातील गरम हवामानात शरीराला थंड ठेवण्यास मदत करणारे काही पदार्थ आहेत का?

नक्कीच आहेत! आपल्या आहारात पाणी जास्त असणारे पदार्थ जास्त सेवन केल्याने पाण्याची नष्ट होणारी पातळी वाढवण्यास मदत होते आणि शरीराचे तापमान पाण्यामुळे नियंत्रित राहते.

यामध्ये टरबूज, काकडी, लिंबूवर्गीय फळे, स्ट्रॉबेरी आणि हिरव्या पालेभाज्या हे पदार्थ आहेत. याव्यतिरिक्त, हलके, ताजेतवाने जेवण जसे की सॅलड्स आणि पचायला हलके असणारे पदार्थ सेवन करावेत.

त्वचेचे सूर्यप्रकाशाच्या तीव्रतेमुळे आणि अतिनील किरणांच्या हानीपासून प्रभावीपणे कसे संरक्षण करू शकतो?

उन्हाळ्यात शक्यतो कडक उन्हात फिरणे टाळावे. जर जावे लागत असेल तर आपले डोके टोपी किंवा रुमाल, स्कार्फ यांनी झाकावे. सन ग्लासेस म्हणजे काळा गॉगल शक्य असेल तर वापरावा. जास्तीत जास्त सावलीत राहण्याचा प्रयत्न करावा.

उष्मा-संबंधित आजारांची किंवा उष्माघाताची लक्षणे कोणती आहेत आणि उष्माघात होणे कसे टाळता येईल?

उष्णतेसंबंधित आजार जसे की थकवा आणि उष्माघातामुळे आरोग्यास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, म्हणून लक्षणे ओळखणे आणि प्रतिबंधात्मक उपाय करणे आवश्यक असते.

लक्षणांमध्ये जास्त घाम येणे, चक्कर येणे, मळमळ, जलद हृदयाचे ठोके यांचा समावेश असू शकतो.

उष्णतेशी संबंधित आजार टाळण्यासाठी, हायड्रेटेड राहा, जास्त उष्णतेच्या वेळी शारीरिक कष्टाची कामे टाळा, आवश्यक असेल तेव्हा सावली किंवा वातानुकूलित जागा शोधा आणि हलके आणि हवेशीर कपडे घाला.

उन्हाळ्याच्या दिवसांत काय खाऊ नये किंवा खाणे टाळावे?

उन्हाळ्यात नॉनव्हेज किंवा मांसाहार टाळावा. चहा कॉफी किंवा उष्ण आणि उष्णता वाढवणारे पदार्थ टाळावे. खूप गरमागरम जेवण करू नये कारण यामुळे जास्त घाम येतो आणि शरीरातील पाण्याचं ह्रास होतो.

फ्रीजमध्ये थंड केलेलं पाणी पिऊ नये. हे पाणी कधी कमी थंड कधी जास्त थंड असे असते त्यामुळे शरीराला तापमान नियंत्रण करण्यास जास्त ऊर्जा खर्च करावी लागू शकते. ज्यामुळे प्रतिकारशक्ती कमी होऊन सर्दी किंवा इतर आजार होऊ शकतात.

या सर्व उन्हाळ्यातील आरोग्याची कशी काळजी घेतली पाहिजे याबद्दल आरोग्य टिप्स आणि प्रश्नोत्तरे तुम्हाला उन्हाळ्यात आपले आरोग्य उत्तम राखण्यासाठी नक्कीच मार्गदर्शक ठरतील. या टीप्स नक्की फॉलो करा आणि आपल्या मित्र व प्रियजनांना नक्की शेअर करा.

Back to Top